Site icon InMarathi

तुमचा मेंदू आणखी तल्लख करायचा असेल तर या टीप्स वाचायलाच हव्यात!

maths 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फिटनेस हा आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. फिट राहण्यासाठी काही लोक सकाळी फिरायला जातात, काही जिम मध्ये जातात. काहीजण दिवसातून दोन वेळेसच जेवतात, पण या सगळ्याने तुमचं शरीरच व्यायाम करत असतं. तुमच्या मेंदूला सुद्धा व्यायामाची गरज असते.

याचं महत्व आपल्यापैकी फार कमी जणांना कळतं, पण मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी त्यालाही व्यायामाची गरज असते.

तुमच्या मेंदूला फ्रेश आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे पुरेशी झोप, सकस आहार आणि व्यायाम. त्याही पुढे जाऊन अशा काही गोष्टी आहेत, ज्या नियमित केल्याने आपण स्वतःच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतो :

१. सतत काहीतरी नवीन शिका:

 

 

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे जास्त वेळ आहे असं वाटेल, तेव्हा एक छंद निवडा आणि त्यामध्ये कसं प्राविण्य मिळवता येईल याकडे लक्ष द्या.

हा छंद एखादं वाद्य शिकणं असू शकतो किंवा एखादी नवीन भाषा शिकणं असेल.

एखादी कला असेल जी की तुम्ही खूप वर्षांपासून शिकण्याची इच्छा बाळगून आहात. पण, वेळे अभावी तुम्हाला ते शक्य झालं नसेल तर आता मनावर घ्या आणि तुमच्या मेंदू ला ते एक नवीन खाद्य द्या. आता तर हे सगळेच क्लासेस ऑनलाईन सुद्धा अटेंड केले जाऊ शकतात.

 

२. स्मरणशक्तीचा वापर करा:

 

 

सध्या सगळे नंबर्स, रस्ते हे आपल्याला मोबाईल मध्येच सापडतात. सोयीसाठी वस्तु वापरण्यात काही गैर नाहीये, पण त्यामुळे मेंदूला चालना देणं अगदीच बंद करू नये.

ब्रेन एक्सपर्ट सांगतात, की तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी निदान एक दोन लोकांचे तरी नंबर पाठ असायला हवेत. काही गोष्टी वारंवार वाचल्याने सुद्धा लक्षात राहू शकतात. तो प्रयत्न करावा.

३. दुसऱ्याच्या बाजूने विचार करायला शिका:

कधी कधी एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गाडी चालवतांना ‘कट’ मारला, तर आपण लगेच गैरसमज समज करून घेतो, पण समोरच्या व्यक्तीकडे पर्याय नसल्याने सुद्धा तो तसा वागला असावा ही विचार करण्याची पद्धत स्वतःमध्ये वृद्धिंगत करा.

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्यातील दुसरी बाजू बघायला शिका.

 

४. मल्टी टास्किंग करण्याचे प्रयत्न थांबवा:

 

 

मल्टी टास्किंग काम हे फक्त android करु शकतो आपण नाही हे स्वतःला सांगा. आपल्या मेंदूची रचना ही एकावेळी एक काम परफेक्ट करण्यासाठीच झाली आहे. खूप काम एकाच वेळी करून आपण मेंदूची गती कमी करत असतो.

त्यापेक्षा एकावेळी एक काम करा आणि मोठ्या कामाला छोट्या भागांमध्ये विभागून ते पूर्ण करा. अधूनमधून ब्रेक घ्या.

 

५. नियमित वाचन करा:

 

“Reading is to the brain, what exercise is to the body” असं एक वाक्य आहे जे खूप खरं आहे. वाचनाने तुमची भाषा तर सुधारतेच. त्यासोबत, प्रत्येक ओळीसोबत मेंदूला सतत नवीन शब्द वाचण्याचं आणि अर्थ शोधण्याचं काम मिळत असतं.

एकाग्रता वाढवायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाहीये.

६. पझल, शब्दकोडे सोडवणे:

 

 

कोणतेही पझल किंवा शब्दकोडे सोडवल्याने मेंदूला चालना मिळते. कधीकधी तुम्हाला उत्तरं सापडणार नाहीत, पण ते प्रश्न स्वतःला विचारत रहा. रोज थोडावेळ का होईना ही गोष्ट कराच.

७. ध्यानधारणा:

 

 

ध्यान केल्याने तुमच्या मेंदूला एक शांतता मिळते आणि जागेपणी चालू असलेल्या सततच्या विचारांना थोडा स्वल्पविराम मिळतो.

ध्यान केल्याने तुमच्या मनाचा आणि मेंदूचा एक संवाद होत असतो आणि त्याद्वारे पुढील कामासाठी एक दिशा मिळत असते.

८. बदल करत रहा:

 

 

आपल्याला आपलं रुटीन फार आवडत असतं. आपण जर का एक काम एकाच पद्धतीने करत राहिलो, तर आपल्या मेंदूला काही विचार करण्याची गरजच पडत नाही. त्यापेक्षा अधूनमधून बदल करून मेंदूला चालना द्या.

कधी ऑफिसला जायचा रस्ता बदलून बघा, कधी घरातील वस्तूंची रचना बदलून बघा. बदल करत राहिल्याने मेंदूला सवयींमध्ये अडकण्याची सवय राहणार नाही.

आपल्या मेंदूला सतत कार्यरत ठेवल्याने तो अजून कार्यशील होतो. वरील टिप्स वापरल्या, तर फायदाच होईल आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मेंदूची मदत होईल.

आपल्या प्रगतीसाठी मेंदूला “most unused brain” पासून “most used brain” कडे नेण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करूयात.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version