Site icon InMarathi

थरारक चित्रपटापेक्षाही रोमांचक, जगातील या जबरदस्त “स्पेशल फोर्सेस”

special-forces-usa-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

कोणत्याही कठीण परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देशाचे सैन्य तैनात असतात, पण काही संकटे इतकी भयंकर असतात की त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी गरज असते स्पेशल फोर्सेसची! जी केवळ ठराविक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि त्यांवर सहज विजय मिळवण्यासाठी संघटीत केली जातात.

जगातील बहुतांश बलाढ्य देशांकडे वेगवेगळ्या दर्जाची स्पेशल फोर्सेस आहेत. आज आपण जगातील काही सर्वश्रेष्ठ आणि जबरदस्त स्पेशल फोर्सेस बद्दल जाणून घेऊया.

 

GIGN, फ्रान्स

 

www.pinterest.com

 

Groupe d’intervention de la Gendarmerie nationale अर्थात GIGN या फ्रान्सच्या स्पेशल फोर्सचा तेव्हा अधिक बोलबाला झाला जेव्हा १९७९ साली त्यांनी थेट मक्का शहरात जाऊन Masjid al-Haram या मशिदीला गराडा घातला होता.

मशिदीमध्ये ठाण मांडून बसलेल्या कट्टरवाद्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी सौदी अरेबियाच्या लष्करासोबत हात मिळवणी केली होती. परंतु मक्का शहरात मुस्लीम धर्मीय नसलेला कोणताही व्यक्ती प्रवेश करू शकत नाही. या कारणामुळे या फोर्स मधील तीन जणांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि कट्टरवाद्यांना जन्माची अद्दल घडवली होती.

देशप्रेमाने भारलेलं हे फोर्स देशावरील कोणत्याही संकटासाठी त्वरेने धावून जातं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्पेशल फोर्सेस, अमेरिका

 

www.pinterest.com

 

अमेरिकेच्या या स्पेशल फोर्सेसची संपूर्ण जगभरात स्तुती केली जाते. त्यांना Green Berets म्हणून देखील ओळखले जाते.

या स्पेशल फोर्सेसमधील सैनिक अतिशय खतरनाक असून त्यांच्या मनात दयामायेचा भाव मुळात नसतोच! त्यांना जे आदेश देण्यात आले असतील ते आदेश पाळल्याशिवाय ते परतत नाहीत. या फोर्सेसमधील बंदूकधारी हे जगातील सर्वोत्तम शुटर आणि हत्यारे म्हणून ओळखले जातात.

त्यांचा कधीही न चुकणारे नेम त्यांची खास ओळख आहे. देशात शांतता प्रस्थापित राहावी म्हणून या फोर्सेसची खास स्थापना  करण्यात आली आहे.

सईरेत मत्काल, इस्राईल

http://www.020mag.com/

 

दहशतवाद्यांना चिरडून टाकण्यासाठी इस्राईलने या स्पेशल फोर्सची स्थापना केली होती. या स्पेशल फोर्समधील सैनिक जेवढे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असतात तेवढेच त्यांची बुद्धी देखील अचाट असते. ते शक्ती दाखवण्यापेक्षा युक्तीने काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

डॉक्टर्स आणि मनोवैज्ञानिकांचे त्यांना असे काही प्रशिक्षण दिले जाते की ते कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये आपल्या मनावर ताबा मिळवू शकतात.

या फोर्स मधला एक सैनिक १० दहशतवाद्यांना सहज चीतपट करू शकतो हे विशेष!

 

जोइंट फोर्स टास्क 2, कॅनडा

 

http://deadliestfiction.wikia.com

 

अवघा २७ वर्षांचा इतिहास लाभलेले हे स्पेशल फोर्स अवघ्या कमी वेळात देखील बरेच प्रसिद्ध पावले आहे. ते विविध देशांतील स्पेशल फोर्सेस सोबत मिळून काम करतात आणि जगातील आजवरच्या अनेक महत्त्वांच्या ऑपरेशन्समध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे’.

सध्या हे फोर्स अफगाणिस्तानमध्ये कार्यरत आहे. या फोर्सेसमधील सैनिकांचे चेहरे हे नेहमी झाकलेले असतात. ज्यामुळे त्यांना फेसलेस हे नवीन नाव देखील पडले आहे. फोर्सबद्दलच काय तर स्वत:बद्दल एकही अवाक्षर न काढता अगदी सफाईदारपणे आणि गुप्तपणे ते आपलं काम करतात.

 

ब्रिटीश स्पेशल एयर सर्विस, ब्रिटन

 

southfront.org

 

जगातील सर्वात पहिले स्पेशल फोर्स म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक देशांचे स्पेशल फोर्सेस याच स्पेशल फोर्सेसच्या अभ्यासानुसार उभे करण्यात आलेले आहेत.

जगातील सर्वात हुशार स्पेशल फोर्स म्हणून ब्रिटीश स्पेशल एयर सर्विसचे नाव घेतले जाते. फक्त एकच नाही तर सर्व प्रकारच्या संकटाना तोंड देण्यासाठी ते नेहमी सज्ज असतात. त्यांचे ब्रीदवाक्य आहे ‘Who dares wins’ म्हणजेच ‘जो हिंमत दाखवतो तोच जिंकतो’.

त्यांच्याशिवाय जगातील बरीचशी महत्त्वाची ऑपरेशन्स पूर्ण होणे अशक्य होते असे खुद्द अमेरिका देखील म्हणते.

 

नेव्ही सील्स, अमेरिका

 

www.forbes.com

 

अमेरिकेचे अजून एक स्पेशल फोर्स आणि अमेरिकेन नौसेनेची शान म्हणजे नेव्ही सील्स होय.

२ मिनिटांमध्ये ४२ पुश अप्स, ५० उठाबशा, ११ मिनिटांमध्ये १.५ मैलाचे धावणे यांसारख्या असामान्य दिव्यांतून पार पडल्यावरच यांचे खरे प्रशिक्षण सुरु होते. या नेव्ही सील्सच्या ८ टीम्स असून पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणांवर लढण्याचे कसब त्यांना अवगत असते.

जगातील सर्वच अत्याधुनिक शस्त्रे या स्पेशल फोर्सकडे पाहायला मिळतात.

GIS, इटली

 

http://discovermilitary.com

 

Gruppo di Intervento Speciale हे इटालियन भाषेतील GIS चे पूर्ण रूप होय. दहशतवादी संघटनांशी दोन हात करण्यासाठी त्यांची स्थापना केली गेली आहे. अतिशय खडतर प्रशिक्षण घेऊन सज्ज झालेल्या १०० सैनिकांसह हे स्पेशल फोर्स कोणत्याही दहशतवादी संकटाशी सामना करण्यासाठी नेहमी तयार असते.

 

अल्फा ग्रुप, रशिया

 

www.youtube.com

 

जगातील सर्वात चपळ स्पेशल फोर्स म्हणून अल्फा ग्रुपचे नाव घेतले जाते.

अफगाणिस्तानमध्ये त्यांनी केलेल्या जबरदस्त कारवाईनंतर जगामध्ये त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. शत्रूचा पूर्णत: बिमोड करणे आणी एकालाही जिवंत न सोडणे यांसारख्या उद्दिष्टांमुळे दहशतवादी संघटनांमध्ये देखील या फोर्सची दहशत आहे.

 

स्पेशल सर्विस ग्रुप, पाकिस्तान

 

 

अवजड शस्त्रांसह ३६ मैलांचा पायी प्रवास केवळ १२ तासांमध्ये पूर्ण करून आणि पुढे अजून पाच मैल धावत जाणे ही कामगिरी केवळ एकच फोर्स करू शकते. ते फोर्स म्हणजे पाकिस्तानी सैन्याचा स्पेशल सर्विस ग्रुप होय.

त्यांचे प्रशिक्षण इतके खडतर असते की या फोर्स मधला प्रत्येक लढवय्या कोणत्याही संकटाला हा हा म्हणता सामोरा जाऊ शकतो. जणू त्यांना मृत्यूची भीती नसतेच.

त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे इमारतीमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या ३५ लोकांना त्यांनी सुखरूप बाहेर काढून अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. तसेच त्यांनी अवघ्या २० सेकंदामध्ये स्कूल बस पळवणाऱ्या अतिरेक्यांना ठार मारून आपली कुवत दाखवून दिली.


पोलिश ग्रोम, पोलंड

 

sofrep.com

 

चपळता, निर्भयीपणा, शत्रूवर तुटून पडण्याची वृत्ती यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे पोलिश ग्रोम या पोलंड देशाच्या स्पेशल फोर्सचे जगभरात दाखले दिले जातात. हे स्पेशल फोर्स देखील ब्रिटनच्या ब्रिटीश स्पेशल एयर सर्विस फोर्स सारखा इतर देशांच्या मदतीला धावून जातं. जवळपास २७०-३०० सैनिकांची निधड्या छातीची फौज अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज आहे.

 

मार्कोस, भारत

 

topyaps.com

 

‘Marine Commandos’चे संक्षिप्त रूप म्हणजे मार्कोस!

अत्याधुनिक शस्त्रांनी आणि आयुधांनी सज्ज असलेली मार्कोस त्यांच्या बेधडक कामगिरीमुळे जगातील सर्वात खतरनाक स्पेशल फोर्स म्हणून ओळखले जाते.

भारतीय नौदलाचे स्पेशल युनिट म्हणून हे फोर्स कार्यरत आहे. अमेरिका, ब्रिटन यांसाख्या देशांच्या फोर्सेस सोबत प्रशिक्षण घेऊन त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अगदी खंबीर बनवले जाते. मार्कोस अतिशय गुप्तपणे काम करते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version