आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आधी कुठल्या मोठ्या मार्केट मध्ये गेलो की कॅश काउंटरवर घेतलेल्या सामानाचं बिल बनवायला दिलं की,काऊंटर असलेली व्यक्ती कम्प्युटर समोर लाल प्रकाश सोडणाऱ्या छोट्या यंत्रावर वस्तूवर रेषा असलेला भाग जवळ न्यायची.
एक विशिष्ट आवाज आला की त्या वस्तूची सगळी महिती किमती सकट कम्प्युटरच्या स्क्रीन वर यायची.
बरोबर ना? तर आपल्या सगळ्यांचा सगळ्यात आधी ‘बारकोड’ शी संबंध इथेच किंवा अशाच ठिकाणावर आला असणार. त्या रेषा रेषा असलेलं चित्र म्हणजे बारकोड आणि ते रीड करण्यासाठी लाल प्रकाश सोडणार यंत्र म्हणजे बारकोड स्कॅनर.
आजच्या काळात बारकोड मर्यादित वापरामध्ये आहे आणि त्याला रिप्लेस केलं ते ‘क्यू आर’ कोडने. हे क्यू आर कोड हे बारकोडचे अपडेटेड व्हर्जन आहे.
टेक्नॉलॉजी आणि त्यात अपग्रेडेशन होणार नाही हे शक्य नाही! तर, आज या क्यू आरने जवळपास सगळ्याच ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवलं आहे.
गुगल पे, पेटीएम मार्गे पेमेंट, फास्टटॅगच्या मार्गे टोल पेमेंट म्हणजे जवळपास जिथे जिथे पैशाचा संबंध आहे तिथे हे क्यू आर कोड आहेच.
त्याशिवाय आधार,इतर ओळखपत्र यावर सुद्धा क्यू आर कोड यायला लागले आहेत. नाही म्हटलं तर छोट्याश्या चौकोनी चित्रात गरजेची असलेली सगळी माहिती असं आपण क्यू आर कोड बद्दल म्हणू शकतो.
तर बघूया हे क्यू आर कोड म्हणजे नेमकं आहे काय आणि हे काम कसं करत त्याबद्दल.
क्यू आर कोड मधल्या क्यू आरचा फुल्ल फॉर्म आहे ‘क्विक रिस्पॉन्स’. बार कोड पेक्षा जलदगतीने हे रीड व्हावं म्हणून हे तयार केले गेले आणि तेच त्याच नाव ठेवलं गेलं.
याला डेडिकेटेड क्यू आर स्कॅनरने रीड करता येतं.
पण आजकाल क्यू आर कोडचा वापर लक्षात घेता जवळपास सगळ्याच मोबाईल कंपन्यांनी इनबिल्ट आपल्या कॅमेऱ्या मध्ये क्यू आर स्कॅनर दिलेलं आज पाहायला मिळत.
क्यू आर कोड पेमेंट सर्व्हिस साठी यासाठी सुरक्षित मानले जाते कारण यामध्ये दोन डायमेंशनल (२डी) बार कोड असतात. ज्याला विशेष स्कॅनरनेच रीड केले जाऊ शकते.
क्यू आर कोड ला खास प्रकारच्या माहितीचे सांकेतिक शब्दात बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
उदाहरण म्हणजे मध्ये इंस्टाग्राम वर बारकोडचा ऑप्शन आला होता, जो स्कॅन केल्यावर आपण थेट त्या इंस्टाग्राम युजरच्या प्रोफाइल वर जाऊ शकतो.
हे झालं एक उदाहरण,आता तर बँकांमध्ये सुद्धा याचा वापर होऊ लागला आहे.
पासबुक वर आता क्यू आर कोड लावून दिला जातो,जेणे करून पासबुक प्रिंटसाठी दिलेल्या वेगळ्या मशीन द्वारे आपण आपलं पासबुक प्रिंट करू शकतो. काउंटर वर लाईन लावायची तसदी यामुळे येथे कमी झाली.
जस की आपण पाहिलं क्यू आर कोड हे बार कोडच अपग्रेड झालेलं व्हर्जन आहे. मोठ्या प्रमाणात या बार कोडचा वापर हा खरेदी साठी असलेल्या शॉप आणि मॉल मध्ये होऊ लागला. पण याला काही लिमिटेशन होत्या.
१. सिंगल डायमेंशन :
१डी इमेज असल्या कारणाने यामध्ये डेटा एका विशिष्ट अँगलने स्टोअर केला जात असतो. त्यामुळे जर स्कॅनर विशिष्ट अँगल मध्ये जर नाही धरला तर कोड रीड व्हायची शक्यता कमी असायची.
२. स्टोरेज कपॅसिटी :
बार कोड मध्ये फक्त २० कॅरेक्टर स्टोअर करायची कपॅसिटी होती. त्यामुळे लिमिटेड माहितीच यात साठवली जात असे.
३. साईज :
जेव्हढे कॅरेक्टर जास्त तेवढा बारकोड लांब. ज्यामुळे प्रोडक्ट लहान पण त्याचा बारकोड त्यापेक्षा लहान अशी स्थिती निर्माण व्हायची.
४. डॅमेज व्हायचे प्रकार :
बार कोड उभ्या रेषेत प्रिंट होतात. जर चुकून एखादी स्क्रॅच त्यावर पडली की डेटा डॅमेज व्हायची शक्यता खुप जास्त आहे.
५. एनकोडिंग :
बार कोड फक्त अल्फा न्यूमरीक कॅरेक्टर एनकोड करू शकतं.
(अल्फा न्यूमरीक कॅरेक्टर म्हणजे ज्यामध्ये केवळ A to Z आणि १ to ९ यांचा वापर करून कोड बनवला जातो.)
या सगळ्या लिमिटेशन क्यू आर कोडने एलिमीनेट केल्या. क्यू आर कोडचा नेमका शोध कसा लागला? गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात.
सिंगल डायमेंशन असल्या कारणाने जपान मधल्या टोयोटा या जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी मध्ये प्रोडक्ट स्कॅन व्हायला जास्त वेळ जाऊ लागला.
कधी कधी तर प्रोडक्ट चांगले पण डॅमेज बारकोड यामुळे क्वालिटी चेकिंग च्या वेळेस प्रॉब्लेम यायला लागले. यावर तोड म्हणून टोयोटाची आर अँड डी टीम कामाला लागली.
टोयोटामध्ये सहायक असणाऱ्या डेंसो वेव्ह यांच्या द्वारे एक टू डी बार कोड डेव्हलप केला गेला. हाच तो आजचा क्यू आर कोड.यामुळे स्कॅन जलदगतीने होऊन लागले आणि कोड डॅमेज जरी झाला तरी तो पुन्हा स्कॅन करणे शक्य झाले.
सुरवातीला ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या नंतर क्यू आर कोड फार्मा कंपनी आणि रिटेल इंडस्ट्री मध्ये इन्व्हेंटरीला ट्रॅक करण्यासाठी वापरले जाऊ लागले.
हळूहळू त्याची व्यापकता पाहून पुढे पेमेंट आणि डेटा स्टोरेज साठी सुद्धा क्यू आर चा वापर केला जाऊ लागला.
क्यू आर कोडचे फायदे :
१. वाढलेली स्टोरेज कपॅसिटी : क्यू आर कोड मध्ये ७०८९ न्यूमरीक कॅरेक्टर विना स्पेस स्टोअर करू शकतो. शिवाय २९५३ अल्फा न्यूमरीक कोड आणि स्पेशल कॅरेक्टर स्टोअर करू शकतो.
२. छोटा आकार : कमीत कमी ते जास्तीत जास्त माहिती ही एकाच साईझच्या क्यू आर कोड मध्ये समाविष्ट केली जाऊ शकते.
३. ओरिएंटेशन : ३६०° मध्ये क्यू आर कोड कसं ही स्कॅन करून ते रीड करता येऊ शकत.
४.एनकोडिंग : क्यू आर कोड अल्फा न्यूमरीक, न्यूमरीक, बायनरी आणि कांजी कॅरेक्टरला एनकोड करू शकतो.
(कांजी कॅरॅक्टर – जपान, चीन, कोरिया येथील लिपी)
आणि महत्त्वाचे म्हणजे क्यू आर कोड ३०% डॅमेज होऊन सुद्धा रीड होऊ शकतो.
जेव्हा एखादा क्यू आर कोड हा स्कॅन होतो, तेव्हा त्या कोड मध्ये असलेल्या माहितीचा डायरेक्ट आपल्याला एक्सेस मिळतो. जर त्यामध्ये एखादी लिंक असेल तर आपण थेट त्या साईट वर पोहोचतो.
जर त्यामध्ये काही माहिती असेल तर ती माहिती आपल्या मोबाईल फोनच्या डिस्प्ले वर येते. हे क्यू आर कोड आपण पण तयार करू शकतो.
forqrcode.com, free-qr-code.net, goqr.me, qrstuff.com, the-qrcode-generator.com या वेब साईट वर जाऊन आपण क्यू आर कोड बनवू शकतो आणि विशेष म्हणजे हे फ्री मध्ये उपलब्ध आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.