Site icon InMarathi

चंद्रावर ठेवलेल्या “दुसऱ्या” पावलाची “ही” कहाणी खरंतर प्रत्येकाला माहिती असायला हवी…पण…!

buzz featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘चंद्र’ हा पृथ्वीवरून दिसणारा गोलाकार शुभ्र ग्रह. वर्षानुवर्षे कित्येक कवींच्या गीतकारांच्या कथाकारांच्या कलाकृतीत हजेरी लावतो. अगदी आईच्या अंगाई पासून ते बॉलीवूडच्या सुपरहिट गाण्यापर्यंत चंद्राचा उल्लेख असतो.

कितीतरी म्हणी फ्रेजेस या चंद्राशिवाय अपूर्ण आहे आणि जवळ-जवळ साऱ्या संस्कृतीमध्ये चंद्र कोणत्या ना कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात आढळतो.

पृथ्वीच्या या उपग्रहाला संपूर्ण मानवजातीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतसुद्धा चंद्रयानाद्वारे लवकरच आपल्या काही नागरिकांना चंद्रावर पाठविण्याच्या तयारीत आहे.

पण चंद्राकडे निघालेली ही काही माणसाची पहिली झेप नाही हे तुम्हाला ठाऊक असेलच. चंद्रावर स्वतःच्या देशाचा झेंडा रोवला तो म्हणजे अमेरिकेने.

१९६९ साली अपोलो ११ या मिशन द्वारे अमेरिकेन नागरिकाने चंद्रावर पाय ठेवला आणि तो नागरिक होता नील आर्मस्ट्रॉंग. अमेरिकेच्या या लूनार मिशन ने मानवी इतिहासात तिची ही झेप आणि नील आर्मस्ट्रॉंग हे नाव ठळकपणे नोंदवले आहे.

 

 

पण तुम्हाला हे माहित आहे की चंद्रावर पोहोचणार या दुसऱ्या माणसाचे नाव काय?

हा प्रश्न वाचून तुमची उत्सुकता ताणली असेल तर तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आज आम्ही त्या माणसाची माहिती देणार आहोत जो संपूर्ण मानव जातीमध्ये चंद्रावर पाय ठेवणारा दुसरा मनुष्य होता.

बझ्झ अल्ड्रिन हा चंद्रावर पाय ठेवणारा दुसरा मनुष्य. अल्ड्रिन यांचा जन्म २० जानेवारी १९३० रोजी झाला आणि आजही ही ते हयात आहेत. बझ्झ अल्ड्रिन हे आत्तापर्यंत तीन वेळा अवकाशात जाऊन आले आहेत.

१९६६ साली अमेरिकेच्या जेमिनी १२ मिशनमध्ये ते पायलट होते तर १९६९ साली अमेरिकेच्या अपोलो ११ या लुनार मिशनचे सुद्धा पायलट बझ्झ अल्ड्रिन होते.

बझ्झ अल्ड्रिन यांचा जन्म न्यूजर्सीमधल्या ग्लेन रिज मध्ये झाला. अमेरिकेच्या वेस्ट पॉइंट मधील युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकॅडमी या कॉलेजमधून यांनी १९५१ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली.

आणि यानंतर अमेरिकेच्या हवाई दलात त्यांची नियुक्ती झाली. अमेरिकेच्या कोरिया युद्धाच्या दरम्यान बझ अल्ड्रिन हे फायटर प्लेन चे पायलट होते.

त्यांनी अमेरीकेच्या ६६ मिशनमध्ये पायलटची भूमिका बजावली आहे. अमेरिकेच्या दाव्यानुसार दोन मिग १५ एअरक्राफ्ट वरसुद्धा नष्ट केले आहे पण, बझ्झ अल्ड्रिनचा प्रवास काही इथे संपला नव्हता.

त्यांना खूप मोठे स्वप्न पूर्ण करायचे होते. फक्त स्वतःचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे, चंद्रावर पोहोचण्याचे स्वप्न…

 

 

मसाच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिक्स मध्ये एस. सी. डी. डिग्री मिळवल्यानंतर त्यांची निवड संपूर्ण जगात अंतराळ संशोधनात प्रथम क्रमांकावर असलेल्या नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधक संस्थेमध्ये झाली.

एडवर्ड हे नासाच्या एस्ट्रोनॉट ग्रुप-३ या विभागाचे सदस्य होते आणि डॉक्टर ही पदवी असणारे नासाचे पहिलेच सदस्य. १९६६ साली अमेरिकेचे जेमिनी १२ मिशन ही बझ अल्ड्रिन यांची पहिली अंतराळ प्रवासयात्रा होती.

याच्या तीन वर्षांनंतरच जुलै २१ १९६९ त्यांची दुसरी अंतराळ प्रवासयात्रा झाली. ती म्हणजे अर्थातच चंद्रावर पोहोचण्याची. अगदी नासा सोडल्यावरही त्यांचा प्रवास थांबला नाही.

सोमवार दिनांक २१ जुलै १९६९ रोजी पहाटे ३ वाजून १५ मिनिटे आणि १६ सेकंदांनी (UTC) बझ्झ अल्ड्रिन अशा जागी पोहोचले होते की तिथे पोहोचणारे ते केवळ दुसरे मानव ठरले. अर्थातच ती जागा म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग होती.  वयाच्या ३९ व्या वर्षी ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आणि त्यांनी स्वत:च्या नाव इतिहासात अजरामर केलं. नील आर्मस्ट्राँगनंतर चंद्रावर उतरणारे ते दुसरे मानव ठरले. आणि त्यानंतर बझ संपूर्ण जगात सुप्रसिद्ध झाले.

विशेष म्हणजे नील आर्मस्ट्राँग यांच्यासोबतच ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते.  आधी नील आर्मस्ट्राँग यानातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. त्यानंतर बझ चंद्रावर उतरले. बझ चंद्रावर उतरल्यानंतर नील यांनी त्यांना विचारले. काय दिसले त्यावर उत्स्फूर्तपणे बझ यांच्या ओठांवर ‘सुंदर दृश्य’ असे शब्द उमटले. त्यानंतर तेथील वर्णन करताना बझ यांनी Magnificent desolation असे वर्णन केले. अर्थात तेथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उजाडपणा असल्याचे ते म्हणाले.

पृथ्वीवरून अतिशय सुंदर दिसणाऱ्या चंद्रावर प्रचंड उजाडपणा असल्याचे तेव्हा माणसाला समजले.

नॅशनल जिओग्राफी चॅनल ने प्रकाशित केलेल्या ‘नो ड्रीम इस टू हाय: लाइफ लेसन फ्रॉम मॅन हू वॉकड् ऑन द मून’ या मुलाखतीत त्यांनी त्याच्या आयुष्यातील संघर्षांत बद्दल सांगितले आहे.

यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आणल्या. त्यांना आयुष्यात बऱ्याच वैयक्तिक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या आईने आत्महत्या केली होती.

ते स्वतः डिप्रेशनचे रुग्ण होते आणि त्यांना दारूचे व्यसन होते. यावर त्यांनी मात करून आपल्या आयुष्याचा उज्ज्वल इत केले आहे . या सर्व समस्यांवर ते उघडपणे बोलले.

त्यांच्या जीवनात अनेक समस्या असतानाही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले पाहिजे याची प्रेरणा एल्ड्रिन यांची आयुष्यगाथा देऊन जाते. आज अल्ड्रिन ९० वर्षाचे आहेत. आजही मोठी स्वप्ने बघतात.

फिलाडेल्फिया मध्ये त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत असताना त्यांनी सांगितले की चंद्रावर पाय ठेवणारा दुसरा माणूस ही ओळख त्यांना आवडत नाही.

 

 

यादरम्यान त्यांनी त्यांच्या स्वप्नाविषयीसुद्धा सांगितले आणि आणि त्यांच्या स्वप्नाविषयी बोलत असताना ते म्हणाले की पुढल्या दोन दशकात अमेरिका मंगळावर पोहोचणार अशी मला खात्री आहे.

एका मुलाखतीमध्ये मनुष्य मंगळावर सुद्धा पोहोचावा या त्यांच्या स्वप्नाबद्दल विचारताना मुलाखतकाराने त्यांना विचारले हे खूप मोठे स्वप्न नाही?

त्यावर एडविन म्हणतात की, जगातलं कोणते स्वप्न खूप मोठे नसते. हा पण हे खरे आहे की चंद्रावर जाण्यापेक्षा मंगळावर जाणे अवघड आहे. कदाचित मी जिवंत असताना ते शक्य होणार नाही.

जर मी एकशे दहा वर्ष जगू शकलो तर कदाचित ते शक्य होईल. पण सुदैवाने माझ्या मुलाला ते स्वप्न पूर्ण होताना बघता येईल. तो बझ्झ अल्ड्रिन स्पेस इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो जी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बरोबर मिळून बनवण्यात आली आहे.

बझ्झ अल्ड्रिन यांना याच मुलाखतीत मुलाखतकाराने पुढच्या पिढीला महत्त्वाचा संदेश देण्यासाठी सांगितले. पुढच्या पिढीला संबोधित करताना एल्ड्रिन म्हणाले, –

“माझे आयुष्य काही परिपूर्ण नव्हते. मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या कोरियन युद्धदरम्यान मी लडाकू विमान चालवले. तेव्हा माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकत होता.

अंतराळ प्रकल्पांमध्ये कार्यरत असताना मला विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. तेव्हा मला हे कळले माझ्या संशोधनाच्या माध्यमातून मी देशाच्या प्रगतीत माझा वाटा देऊ शकतो.

 

 

असे करण्याची शपथ मी सतरा वर्षाचा असताना घेतली आणि आजही मला यापासून प्रेरणा मिळते, माझी संपत्ती वाढवण्यासाठी नाही. मला यातूनच समाधान मिळते.”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version