' घरातील आजारी माणसांची काळजी घेताना स्वतः आजारी पडायचं नाहीये ना? मग अशी घ्या काळजी! – InMarathi

घरातील आजारी माणसांची काळजी घेताना स्वतः आजारी पडायचं नाहीये ना? मग अशी घ्या काळजी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जेव्हा आपल्या घरामध्ये कोण आजारी असेल तेव्हा आपण चिंतातूर होतो. आपणास त्यांची अधिक काळजी घ्यावीशी वाटते, हे गरजेचेच आहे! पण असे करत असताना आपण बऱ्याच वेळा स्वतःची पुरेशी निगा बाळगत नाही.

जर तुम्ही आजारपणात तुमच्या कुटुंबीयांची देखभाल करत असाल तर स्वतःची शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. कारण जर तुम्ही स्वस्थ राहाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची नीट काळजी घेता येईल.

 

taking care of sick person inmarathi

 

बऱ्याचदा आपल्यावर ही जबाबदारी पडल्यावर आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची वेळ तुमच्यावर पडली तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

स्वतःला वेळ द्या :

बर्‍याचदा जवळचे आजारी पडले असताना आपण निराश होतो. सतत त्यांच्या काळजी करण्यात आपण थकून जातो त्यामुळे अशा प्रसंगी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे असते.

थोड्या वेळासाठी बाहेर फिरून येणे कोणत्यातरी कॅफेमध्ये जाऊन घेतलेली कॉफी किंवा चहा तुम्हाला रिफ्रेश करेल. थकवा दूर करण्यासाठी अंघोळसुद्धा उत्तम पर्याय आहे.

जर तुम्हाला बाहेर जाण्याची मुभा नसेल तर तुम्ही तिथेच बसून एखादे रंजक पुस्तक वाचू शकता किंवा एखादा मूवी बघू शकता. तुमच्या आवडत्या संगीतकाराचे गाणे सुद्धा तुम्हाला थोड्या वेळापूर्वी तिचा आनंद देऊन जाईल.

 

watching movie inmarathi

तुमच्या आजारी कुटुंबीयाला कोणत्या गोष्टींची गरज आहे याची यादी बनवा :

कुटुंबात कोण आजारी असेल तर त्या व्यक्तीची अधिक दक्षता घेणे गरजेचे असते अशा वेळी एकही चूक राहता कामा नये.

बऱ्याचदा अशा प्रसंगी आपण चिंतातूर होतो आणि काही गोष्टी आपल्या हातातून राहून जातात त्यामुळे तुमच्या आजारी कुटुंबीयांना ज्या गोष्टीची गरज असेल त्या सर्व गोष्टींची एक यादी तयार करा ज्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होणार नाही.

तुमच्या मित्रांना किंवा नात्यातील कुणाला मदतीसाठी बोलवा :

अशा कठीण परिस्थितीत एकट्या आपणास आजारी कुटुंबीयांची काळजी घेणे अवघड जाते अशावेळी आपण मित्राला किंवा नात्यातील अन्य कुणाची मदत मागण्यास धजावतो.

आपण याच विचारात असतो की ते तयार होतील की नाही, कदाचित त्यांना या सर्वाचा त्रास होईल परंतु बऱ्याचदा त्यांच्या मनात असे काहीही विचार नसतात.

ते मदत करण्यासाठी तयार असतात.

जर तुमचे मित्र किंवा कुटुंबातील अन्य कोणी तुमच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यास तयार झाले तर संकोच बाळगू नका त्यामुळे तुम्हाला ब्रेक मिळेल आणि तुम्हाला पुढील काळात तुमच्याजवळ त्यांचा सांभाळ करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल.

प्रोफेशनल हेल्प :

जर तुमच्या कुटुंबीयांचा आजार अगदी गहन असेल तर त्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी तुम्ही प्रोफेशनल केअर टेकर ची मदत घ्या जे तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य राहील.

 

care taker inmarathi

सकस आहार :

एकतर कुटुंबीयांची काळजी, त्यांच्या औषधांच्या पथ्यावर लक्ष ठेवणे वेळच्या वेळी डॉक्टरांचे सल्ले घेण्यासाठी पळ काढणे यामध्ये आपली तगमग होते जेवणाच्या वेळा नीट पाळल्या जात नाहीत.

वेळप्रसंगी आपण अपुरे जेवण करतो किंवा चटकन खाऊन होतील असे पॅकेट्स पदार्थ ग्रहण करतो परंतु याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो ज्यामुळे आपणच आजारी पडण्याची शक्यता असते.

जर तुम्हीच आजारी पडाल तर मग तुम्हाला कुटुंबीयांची काळजी घेणे जमणार आहे का? त्यामुळे सकस आहार घेण्याकडे लक्ष दिले पाहिजे घरी बनवलेला आहार घेण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

पुरेशी झोप :

बर्‍याचदा कुटुंबीयांची देखभाल करताना आपल्या झोपेकडे दुर्लक्ष होते.

जर तुमची वेळोवेळी झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल आणि लवकरच तुम्ही आजारी पडाल यासाठी पुरेशी झोप मिळणे गरजेचे आहे.

पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुटुंबातील आजारी माणसाची काळजी घेताना झोप घेणे कसे शक्य आहे तर यावर एक साधी ट्रिक म्हणजे ज्यावेळी कुटुंबातील आजारी व्यक्ती झोपली असेल त्याच वेळी तुमची झोप पूर्ण करून घ्या.

 

indian guy sleeping inmarathi

कुणाशी तरी बोला :

बऱ्याचदा आपल्या घरात कोणी आजारी असेल तर आपण निराश होतो आणि आणि अनेक भयावह विचार आपल्या मनात येऊ लागतात जे आपल्याला निगेटिव्ह करतात.

आणि त्यामुळे आपली भीती वाढते आणि आपण दैनिक होतो बऱ्याचदा अशा प्रसंगी लोकं डिप्रेशनमध्ये जातात.

अशा परिस्थितीत समोरच्याची काळजी घेणे अजून कठीण जाईल त्यामुळे स्वतःचे मानसिक संतुलन सांभाळणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमची निराशा दूर होणे गरजेचे आहे.

आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी तुमच्या मित्राशी किंवा परिवारातील अन्य लोकांशी झालेला संवाद तुम्हाला आनंद देईल यामुळे तुमची निराशा दूर होईल.

देवपूजा :

कुटुंबीय आजारी असताना आपण आपले दिवसभराचे पथ्य विसरून जातो. जर तुम्ही देव धर्मावर विश्वास ठेवणारे असाल तर या काळात कुटुंबीयांची काळजी घेताना हेही राहून जाते.

देव आहे वा नाही ही हा इथे मुद्दा नसून नेहमीच आध्यात्मामुळे आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. अशा निराशाजनक प्रसंगी देवपूजा करायला विसरू नका तुम्हाला यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल.

व्यायाम :

 

indian girl workout inmarathi

 

व्यायामामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा प्राप्त होते. व्यायाम आपल्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचा आहे.

कुटुंबातील कोणी आजारी असताना आपल्या मानसिक आणि शारीरिक या दोहो बाजूंनी परिणाम होत असतो त्यामुळे या दोघांची काळजी घेण्यासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे.

थोड्या वेळासाठी चालणे किंवा दोरीच्या उड्या मारल्या मुळे सुद्धा तुमची कसरत होऊन जाईल किंवा नातेवाईकांपैकी किंवा मित्रांपैकी कोणालातरी थोड्या वेळासाठी बोलवून तुम्ही व्यायामासाठी वेळ काढू शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?