' शनिवारची बोधकथा : ही गोष्ट सांगेल तुम्हाला जगण्याचा मंत्र – InMarathi

शनिवारची बोधकथा : ही गोष्ट सांगेल तुम्हाला जगण्याचा मंत्र

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका गावात एका मोठ्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. गावातील एक धनाढ्य व्यापारी त्याच्या दुकानासाठी आणि निवासासाठी मोठी इमारत उभी करत होता. व्यापाऱ्याला दोन मुलं होती. दोन्हीही त्याला व्यापारात साथ द्यायची. पण ते शीघ्रकोपी आणि अपरिपक्व होते. व्यापारी धनाढ्य असला तरीही प्रामाणिक आणि विनम्र होता. मुलांना तो व्यवस्थितपणे सगळं शिकवायचा. इमारत बांधकामाच्या देखरेखीसाठी त्याने दोन्ही मुलांना ठेवलं होते.

 

 

इमारतीचे कामकाज वेगाने सुरु होते. इमारतीचे बांधकाम जेथे सुरु होतं. तो निवासी परिसर होता. आजूबाजूला बंगले होतं. एकेदिवशी इमारतीच्या बांधकामासाठी लागणारी वाळू उतरवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. त्यामुळे शेजारच्या बंगल्यासमोर वाळू उतरविण्यात आली.

हा प्रकार पाहून त्या बंगल्यातील मालक बाहेर आला. त्याने वाळू दारात उतरविल्याबद्दल तक्रार केली. व्यापाऱ्याची मुले तिथे आली. त्यांनी बंगल्याच्या मालकाशी भांडायला सुरुवात केली. भांडणं विकोपाला गेलं. सगळेच थेट हमरीतुमरीवर आले. ‘‘आम्ही तुला कोर्टात खेचू. तुला शिक्षा करू.’’, अशा शब्दांत व्यापाऱ्याची मुलं वाद वाढवू लागली.

भांडण काही मिटेना. आजूबाजूचे लोक गोळा झाले. शाब्दिक बाचाबाची सुरुच राहिली.

 

 

हे सगळं पाहून कोणीतरी व्यापाऱ्याला फोन केला. त्याला बोलावून घेतलं. काही वेळातच व्यापारी तिथे पोहोचला. त्याने सगळी परिस्थिती पाहिली.

त्याने मुलांना बाजूला नेलं आणि तत्काळ बंगल्याच्या मालकाजवळ आला. शांतपणे हात जोडले. त्याला विनंती केली. ‘आम्ही काही वेळातच तुमच्या दारातील सगळी वाळू हटवतो. कृपया आमच्यामुळे तुम्हाला जी काही तसदी झाली त्याबद्दल माझ्या मुलांच्यावतीने मी तुमची मनापासून माफी मागतो.’

 

 

हे ऐकल्यावर बंगल्याचा मालकही ‘ठीक आहे, ठीक आहे’ म्हणत बंगल्यात निघून गेला.

व्यापारी तेथून मुलांकडे आला. इमारतीकडे हात दाखवत मुलांना म्हणाला, ‘‘मी दोन वाक्यात त्याला शांत केले. तुम्ही त्याच्याशी आयुष्यभर लढला असता आणि ही इमारत उभी करताना अनेक अडचणी वाढल्या असत्या. लक्षात ठेवा, आपल्याला ही इमारत उभी करायची आहे. या शेजारच्या माणसाशी भांडत बसायचे नाही. आपण आयुष्यातही अनेकदा आपल्याला काय करायचे हेच विसरून जातो आणि नको त्या गोष्टीतच आपला वेळ वाया घालवतो आणि मग मूळ उद्देशच बाजूला पडतो.’’

 

 

व्यापाऱ्याने मुलांना जणू काही जगण्याचा मंत्रच दिला होता. हे ऐकून मुले एक मोठा धडा घेऊन गुपचूप वाळू बाजूला काढून घेण्याच्या कामाला लागले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?