आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या बऱ्याच परंपरा आपण फॉलो करत असतो, पण त्याचं महत्व आणि वैज्ञानिक फायदे हे आपल्याला माहीत नसतात. “पूर्वापार चालत आहे” असं म्हणत आपण त्यांना पुढे नेत असतो.
आपल्या लक्षात आलं असेल, की नवीन पिढी ही तशी नाहीये. त्यांना प्रत्येक गोष्टी मागचं कारण जाणून घेण्यात रस असतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे पालकांचं हे सध्या कर्तव्य आहे, की जास्तीत जास्त प्रथांबद्दल माहिती करून घेणे आणि वेळच्या वेळी मुलांच्या प्रश्नांना योग्य उत्तरं देणे.
त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही आज मदत करत आहोत. तो प्रश्न असा असू शकतो की, “आपण नवरात्री मध्ये अखंड ज्योत / दिवा / नंदादीप का लावला पाहिजे?”
नवरात्रीचे नऊ दिवस हे दुर्गा मातेच्या पूजेसाठी फार पवित्र असतात. या नऊ दिवसात लावली जाणारी अखंड ज्योती ही आनंद, सकारात्मकता आणि शत्रू किंवा संकटांचं निवारण करण्याचं प्रतिकक मानलं जातं. अखंड ज्योतीमुळे घरात शांतता नांदण्यास मदत होते अशी मान्यता आहे.
शुभकार्य घडवून आणण्यासाठी लागणारी ऊर्जा सुद्धा या दिव्यातून मिळत असते हे सुद्धा सांगितलं आणि मानलं जातं. तूप किंवा तेल याद्वारे अखंड चालू ठेवला जाणारा हा दिवा तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना सुद्धा नाहीसं करतो. शांत आणि आनंदी राहण्यासाठी तो तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जात असतो.
दिवा हा दानवांवर देवाने नेहमीच मिळवलेल्या विजयाचं प्रतिक मानलं जातं.
अखंड ज्योत लावण्याचे वैज्ञानिक फायदे म्हणजे, त्यामुळे तुमची श्वसन पद्धत व्यवस्थित राहण्यासाठी मदत होत असते. तुपाचा वास आणि कापराचा वास यामध्ये हे गुणधर्म असतात.
दिवा म्हणजे शक्तीचं प्रतिक असल्याने दुर्गा मातेला आवाहन करण्यासाठी देवीच्या समोर दिवा तेवत ठेवण्याला विशेष महत्व आहे.
दुर्गा मातेला महाशक्ती म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या नावाने संबोधले जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने कार्यसिद्धी प्राप्त होते असा कित्येक लोकांना अनुभव आहे.
नवरात्रीमध्ये देवीची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यासाठी लावण्यात येणारी अखंड ज्योती ही लोकांना कधीच आशा सोडू नका असं सांगत असते.
जसं आपण बघतो, की कितीही गडद अंधार असला तरीही एक छोटासा दिवा त्या जागेत एक आशेचा किरण निर्माण करत असतो. त्याचप्रमाणे अखंड ज्योती ही ज्ञानाचं प्रतिक सुद्धा मानली जाते.
अखंड ज्योत म्हणजे नावाप्रमाणेच त्यामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात एकदाही खंड पडता कामा नये. हा दिवा सात दिवस तेवता ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
“शक्तीपेक्षा कोणीही उंच किंवा श्रेष्ठ नाहीये” हे मान्य असल्याने कित्येक लोक अखंड ज्योतीला थोड्या उंचीवर लावत असतात आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात स्वतः जमिनीवर झोपून त्या शक्ती पुढे समर्पण करत असतात.
वैदिक पद्धतीमध्ये सुद्धा देवाची पूजा सुरू असेपर्यंत दिवा चालू असला पाहिजे असं सांगितलं आहे. दिवा सतत चालू राहण्यासाठी त्यामध्ये तेल किंवा तूप आहे की नाही सतत पहावे. अखंड ज्योती ही कधीच देवापासून लांब अंतरावर कधीच ठेवू नये.
अग्नी ही वैदिक काळात एक महत्त्वाची देवता होती. अग्नीमुळे माणसाचं संरक्षण होत होतं. अग्नीला वैदिक काळापासूनच शुद्ध आणि पवित्र मानलं जातं, त्यामुळे प्रत्येक घरात दिवा लावण्याची पद्धत आहे.
अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या अखंड ज्योतीचे हे महत्व आपण नेहमीसाठी लक्षात ठेवूया आणि आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या दिव्याची मनोभावे आराधना करूया.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.