Site icon InMarathi

“स्वसंरक्षणासाठी” पुढे मागे न बघता चक्क अकबराच्या गळ्यावर कट्यार ठेवणारी वीरांगना!

kiran devi featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘जोधा-अकबर’ या सिनेमातून आपल्याला अकबर हा किती रसिक मनुष्य होता हे आपण सर्वांनीच बघितलं होतं.

राजा म्हणून इतर मुघल साम्राज्याचा प्रतिनिधी असला तरी माणूस म्हणून तो इतर मुघल राज्यांपेक्षा वेगळा होता हे आपण बघितलं होतं.

सौंदर्याची पारख असणारा आणि त्याची मनसोक्त तारीफ करून त्या व्यक्तीला जिंकण्याचा प्रयत्न करणारा तो त्या काळातील एकमेव राजा होता.

 

 

अकबर राजा दर वर्षी दिल्ली मध्ये ‘नुरोझ मेला’ नावाचं एक प्रदर्शन भरवत असे. या प्रदर्शनात राजपूत महाराणी आणि दिल्लीतील इतर महिला सहभाग घ्यायच्या आणि सौन्दर्य प्रसाधनं आणि दागिने याची खरेदी करायच्या.

अकबर राजा सत्तेवर येण्या आधीपासून हे प्रदर्शन व्हायचं. या प्रदर्शनाची एकच अट होती की, तिथे फक्त महिलांना प्रवेश होता. अकबर राजाने सत्तेत आल्यावर हा नियम बदलायला लावला.

हा तो काळ होता जेव्हा मुघल साम्राज्य भारतभर पसरलेलं होतं आणि त्यांना राजपूत लोक हे नेहमीच कडवी झुंज देणाऱ्यांपैकी होते.

महाराणा प्रताप हे भारतीय राजपूत राजांपैकी सर्वात शूरवीर होते. त्यांना एक भाऊ होता शक्तीसिंग. त्याची मुलगी होती किरणदेवी. सौन्दर्यवती आणि शूरवीर अशी तिची महती सर्वदूर पसरलेली होती.

युद्धकला आणि शस्त्र विद्या यामध्ये ती पारंगत होती. पृथ्वीसिंग या बिकानेर च्या राजासोबत तिचा विवाह झाला होता. किरणदेवी या दिल्लीला राहत असत. त्या दरवर्षी ‘नुरोझ मेला’ या प्रदर्शनाला भेट देत असत.

 

 

किरणदेवी एका वर्षी ‘नुरोझ मेला’ मध्ये आलेल्या असतांना अकबर ची नजर त्यांच्यावर पडली होती. अकबर च्या नजरेने किरणदेवीला फार आधीच बघितलं होतं.

अकबर ने एका सैनिका मार्फत किरणदेवी यांना महालात हजर व्हायला सांगितलं . राजाची आज्ञा किरणदेवी यांनी मान्य केली.

अकबर त्याच्या महालात किरणदेवी यांची वाट बघत बसला होता. किरणदेवी महालात येईपर्यंत अकबरने मनात वेगवेगळी स्वप्न रंगवली होती.

अकबर राजाला राजपूत महिलांच्या शौर्याची गाथा तितकी माहीत नव्हती. राजपूत महिला या आपल्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी जीवाची सुद्धा पर्वा करत नसत.

अल्लाउद्दीन खिलजी विरुद्ध लढतांना महाराणी पद्मिनी यांनी पुकारलेलं बंड आणि स्वसंरक्षणासाठी आगीत दिलेला जीव याबद्दल अकबर ला माहिती नव्हती. किरणदेवी सुद्धा त्याच श्रेणीतल्या होत्या.

किरणदेवीच्या महालात झालेल्या आगमना नंतर अकबर ने ‘तकलिया’ करत सगळ्या सुरक्षा रक्षकांना घरी जाण्यास सांगितलं जेणेकरून तो एकांताचा फायदा घेऊ शकेल.

अकबर ने जसाच किरणदेवी यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तसंच किरणदेवी यांनी प्रसंगावधान दाखवत अकबर राजाच्या पायाखालची चटई ओढली आणि त्याला जमिनीवर पाडले.

आपल्या सोबत असलेला चाकू तिने बाहेर काढला आणि अकबरच्या गळ्यावर रोखून धरला. अकबरने सपशेल शरणागती पत्करली आणि आपल्या जीवाची भीक मागितली.

 

 

किरणदेवी ने स्वसंरक्षणासाठी जगातील एका शूर राजाला त्याच्याच महालात जाचक बनण्यास भाग पाडले होते. किरणदेवी ने अकबरला दोन अटी ठेवून सोडण्याचं वचन दिलं. त्या दोन अटी अश्या होत्या की :

१. ‘नुरोझ मेला’ हा इथून पुढे होणार नाही आणि

२. प्रत्येक महिलेचा इथून पुढे भारत वर्षात मान राखला जाईल याची ग्वाही द्या.

पर्याय नसलेल्या अकबर ने दोन्ही अटी मान्य करण्याचं किरणदेवी यांना वचन दिलं. त्या दिवशी अकबरला भारतीय महिलेच्या शक्ती आणि युक्ती ची प्रचिती आली होती.

राणी किरणदेवी यांनी फक्त स्वतःचं नाही तर सर्व महिलांचं रक्षण केलं होतं. अकबर राजाला त्याच्याच महालात मात देण्यात युद्धकलेच्या श्रेष्ठत्वापेक्षा त्यांच्या धैर्य आणि विश्वासाचं प्रतीक होतं.

तिथे काहीही होऊ शकलं असतं, पण किरणदेवी यांनी कोणत्याच विचाराला बळी न पडता त्यांनी हे साहस दाखवलं आणि व्यभिचाराचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अकबर च्या माध्यमातून त्यांनी एक चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

किरणदेवी यांनी अकबर राजाच्या तावडीतून सुटण्यासाठी केवळ defensive न राहता attacking कृती सुद्धा करून दाखवली आणि सर्वांनाच चकित केलं होतं.

 

 

किरणदेवी राठोड यांचं नाव या घटनेनंतर पूर्ण भारतभर वाऱ्यासारखं पसरलं होतं. जयपूर च्या एका संग्रहालयात या घटनेबद्दल नोंद आणि चित्र जतन करून ठेवण्यात आले आहेत.

राजस्थान आणि बिकानेर मध्ये घरोघरी किरणदेवी यांच्या पराक्रमाची गाथा माहीत आहे. पण, त्यानंतर फार कमी ऐतिहासिक पुस्तकांमध्ये या घटनेची नोंद झाली आहे.

अकबर राजाने जर का तेव्हा शरणागती नसती पत्करली तर त्याचा खात्मा सुद्धा होऊ शकला असता.

पण, शरण आलेल्या शत्रूला निराश न करण्याच्या आपल्या संस्कृतीचा मान ठेवत किरणदेवी यांनी एक आदर्श लोकांसमोर ठेवला होता.

किरणदेवी यांनी हा पूर्ण प्रसंग नंतर त्यांच्या पती पृथ्वीराज राठोड यांना सांगितला. ते स्वतः अकबरच्या दरबारात घोषित झालेल्या ‘नवरत्न’ लोकांपैकी एक होते.

पृथ्वीराज राठोड ने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेत अकबराच्या या कृतीचा सूड घेण्याचं ठरवलं. पण, किरणदेवी यांनी पृथ्वीराज राठोड यांना थांबवलं.

अकबर ने सुद्धा त्यानंतर किरणदेवीकडे तश्या नजरेने कधीच बघितलं नाही आणि या घडलेल्या प्रसंगाचा कधीही उल्लेख केला नाही.

महालातील काही महिलांनी हा प्रसंग पडद्या आडून बघितल्याची काही इतिहास संशोधकांनी करून ठेवली आहे.

‘स्वसंरक्षण’ हा प्रश्न सध्या पूर्ण भारतासाठी महत्वाचा आहे. रोज किती तरी महिला काही पुरुषांच्या व्यभिचाराला बळी पडत असतात. अश्या घटना अधोरेखित होऊन महिलांना सशक्त करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळू शकते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version