' या टिप्स वाचल्या तर सगळे पती बायकोचे त्रासदायक टोमणे टाळू शकतील! – InMarathi

या टिप्स वाचल्या तर सगळे पती बायकोचे त्रासदायक टोमणे टाळू शकतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पूर्वी बहुतांश महिला गृहिणी होत्या आणि पुरुष नोकरीला.. काही जोडप्यांमध्ये मात्र नवरा-बायको दोघेही नोकरदार, पण घरातील सर्वच कामे अगदी सकाळचा चहासुद्धा बायकोनेच करावा ही अपेक्षा.. आणि त्या गृहिणींवरही पूर्वीपासूनचे तसेच संस्कार..

त्यामुळे रिटायरमेंटच्या काळात किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमधून थोडी मोकळीक मिळाल्याने म्हणा…अशा गृहिणी जर कधी घरी नसतील आणि त्यांच्या नवऱ्यावर काही कारणानी एकटं रहायची वेळ आली तर मात्र, “मी कशी ह्यांना सोडून एकटी जाऊ… आमच्या यांना तर साधा चहाही करता येत नाही.. मग जेवणाचे हाल तर विचारुच नका..” असा टोमणावजा सुर उमटताना दिसतो.

मात्र हल्लीच्या नव्या जोडप्यांच्या बाबतीत सहसा असे होताना दिसत नाही. एक तर नव्या पिढीचे तरुण-तरुणी शिक्षण किंवा नोकरीनिमित्त सुरुवातीपासूनच घराबाहेर राहात असतात. बॅचलर लाईफची धम्माल अनुभवतानाच ते स्वयंपाकही करायला शिकतातच. ती तर आता काळाची गरजच आहे.

 

cooking inmarathi

 

दुसरे महत्त्वाचे म्हणजे.. आता घरातूनही मुलां-मुलींवर तुमची कामं वेगवेगळी आहेत किंवा मुलीने स्वयंपाक शिकावा आणि मुलांना त्याची गरज नाही अशा प्रकारचे संस्कार होत नाहीत. सर्व कामे समान असून, ती सगळ्यांना यायला हवी हेच बहुतांश शिकवले जाते.

असो.. तर ज्या पुरुषांना स्वयंपाकातलं काहीच कळत नाही किंवा साधा चहाही करता येत नाही त्यांनी या पुढच्या काही टिप्स नक्की लक्षात ठेवा. त्या तुम्हाला खुपच उपयोगी पडतील.

सर्वात आधी हे लक्षात घ्या, की स्वयंपाकघरात काम करणे याकडे तुम्ही स्पोर्टिंगली बघणे गरजेचे आहे.. हे बायकांचे काम मी करतोय.. वगैरे साचेबद्ध मानसिकतेतून पुरुषांना बाहेर पडावे लागेल.

ज्या पुरुषांना याबाबत खरोखरंच काही माहित नाही ते यु-ट्यूब किंवा फेसबुक अशा सोशल मीडियाचा आधार घेऊ शकतात. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या छोट्या आणि सोप्या रेसिपीज उपलब्ध आहेत.

 

man cooking inmarathi

 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट – स्वयंपाकघरात कौशल्य प्राप्त करणे ही सोपी गोष्ट नाही. निश्चीतच नाही. अनेक वर्षांच्या तपानंतर ते प्राप्त होते. त्यामुळे त्याला कमी लेखणं हे अत्यंत चुकीचे आहे.

१५ मिनिटांत होणारे जेवण तयार करायला किमान ३ तास लागतात मित्रांनो… म्हणजेच हे लक्षात ठेवले पाहिजे, की घरातील गृहिणी सकाळ-सायंकाळ मिळून किमान ६ तास स्वयंपाकघरात राबतात, तेव्हा आपण हे चविष्ट जेवण जेवतो.

पुढील काही महत्त्वाच्या टिप्स –

सोप्या रेसिपीजचे पुस्तक मिळवा अन्यथा यु-ट्यूब किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करा.

चहा करण्यापेक्षाही कॉफी बनवणे जास्त सोपे आहे. दुध गरम करुन त्यात साखर आणि कॉफी पावडर घातली, की झाली कॉफी तयार.

मॅगी करणे ही आणखी एक सोपी रेसिपी. जे पहिल्यांदा किचनमध्ये काही करणार आहेत, त्यांनी मॅगी पासून सुरुवात करायला हरकत नाही. यामुळे निदान किचनमध्ये वावर तरी वाढेल.

 

maggie inmarathi

 

ऑमलेट, हाफ फ्राय तसेच रेडी टू इट सारखे झटपट होणारे पदार्थ सुरुवातीला करायला हरकत नाही. त्यामुळे पाणी उकळणे, तेलाचा वापर, अन्य काही जर चवीसाठी वापरायचे असेल तर ते कसे वापरावे, प्रमाण यांबद्दल तुम्हाला कळेल आणि अंदाज येईल.

गॅस लावायला भीती वाटत असेल तर इंडक्षन शेगडीचा (वीजेवरील शेगडी) सुरुवातीला वापर करायला हरकत नाही.

किचनमध्ये वावरण्याआधी कोणत्या पदार्थांसाठी कोणत्या प्रकारची भांडी वापरतात याची माहिती करुन घ्या.

मिक्सर, ज्युसर, मायक्रोवेव ओव्हन, भाज्यांचे कटर, विळी, विविध प्रकारच्या सुऱ्या, खलबत्ता आदी गोष्टी कशा वापराव्यात याची नीट माहिती करुन घ्यावी. या सर्व आधुनिक साधनांसोबत तुम्ही युज-टू होणेही आवश्यक आहे.

विविध मसाले. डाळी यांची ओळख करून घ्या.

 

spices inmarathi

 

कोणताही पदार्थ बनवण्यास सुरुवात करताना आधी सर्व साहित्य तुमच्या समोर तयार ठेवा. ऐन वेळी एखादा पदार्थ कुठे ठेवलाय किंवा चिरलाच नाहीये, उकडलेलाच नाहीये असं लक्षात आले तर तुमची धांदल उडेल.

फोडणी करणे हा एक महत्त्वाचा भाग असतो. ती जर योग्य जमली तर पुढचा पदार्थ करणे सोपे होते. त्यामुळे फोडणी कशी करायची हे आधी शिकून घ्यावे. त्यासाठी लागणारे सर्व जीन्नस आधीच तयार ठेवावे. नाहीतर फोडणी जळते आणि मग सर्व पदार्थाचीच चव बिघडते.

 

cooking inmarathi 1

 

कुकर लावायला शिकणे यापासूनही तुम्ही स्वयंपाकाचा श्रीगणेशा करू शकता. तांदूळ आणि डाळ धुवून घेणे, त्यानंतर कुकरच्या बुडाला रिंग बुडेल इतकेच पाणी घालणे, त्यावर आधी डाळ ठेवणे नंतर वर तांदळाचे भांडे ठेवणे आणि कुकर घट्ट बंद करणे या गोष्टी सवयीने येतील.

कुकर लावायला शिकल्यानंतर तुम्ही आमटी करायला शिकू शकता. ती पुढची पायरी आहे.

भाजी-पोळी करण्याकडे जाण्यापूर्वी तुम्ही हे शिकून घेणे गरजेचे आहे.

कांदा-टोमॅटो चिरायला शिकणे

काकडी किसणे

गाजर, दुधी किसणे

पालेभाज्या निवडणे

भाज्या धुवून निवडणे, चिरुन ठेवणे

 

leafy Vegetables InMarathi

 

 

स्वयंपाक करणे म्हणजे केवळ गॅस वर भांडे ठेऊन त्यात सगळ्या गोष्टी घालून शिजवणे आणि १५ मिनिटांनी गॅस बंद करणे अशी जर तुमची समजूत असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. एखादे खडतर व्रत किंवा साधना करावी अशा ओढीने आणि प्रेमानेच स्वयंपाक करावा लागतो.

जर अशा काही सोप्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या आणि त्यापासून सुरूवात केली तर नक्कीच हळूहळू तुम्ही चांगला स्वयंपाक करायला शिकू शकाल.

बायकोला खुश करायचा मार्गही पोटातूनच जातो.. अशी म्हण पुढे कधीतरी अस्तित्त्वात येईल का आणि भविष्यात असे खरंच म्हणता येईल का? अपेक्षा करायला हरकत नाही… नाही का..!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?