' त्या दोघींनी पन्नाशीत सुरू केला बिझनेस; तीन वर्षांत केली २ कोटींची कमाई! – InMarathi

त्या दोघींनी पन्नाशीत सुरू केला बिझनेस; तीन वर्षांत केली २ कोटींची कमाई!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

Jealousy thy name woman…म्हणजे मत्सराचं दुसरं नांव स्त्री आहे..असं पूर्वापार लोक म्हणत आले आहेत. दहा पुरुष एके ठिकाणी शांत बसू शकतील, पण दोन बायका एकत्र शांत राहू शकत नाहीत. अशी कितीतरी विधानं बायकांच्या बाबतीत केली गेली आहेत.

त्यात विहीणी- विहीणी, नणंद भावजय, जावा जावा , सासू सून ही नाती बऱ्यापैकी बदनाम आहेत. एकमेकींशी नीट न वागण्यासाठी, एकमेकींशी कुरबुर करण्यासाठी..आणखीही बरंच काही असू शकतं, पण नियम अपवादानेच सिद्ध होतो.

पूर्वी अस्सं सासर द्वाड बाई…कारल्याचं बी पेर गं सुनबाई वगैरे भोंडल्याची गाणी ऐकली, की ही नाती किती घट्ट पीळ पडल्यासारखी होती हे लक्षात येतं. लग्नात सुद्धा ओटीत घातली मुलगी विहीणबाई म्हणत मुसमुसणारी मुलीची आई हे चित्र पण आता इतिहासजमा झालं आहे.

जसा काळ बदलला तसा नात्यांमधील ताण कमी होत गेला. सासू सून या माय लेकींसारख्या राहतात. जावयालाही मुलगा समजून एक मोकळेपणा आला. याचा परिणाम म्हणून विहीणी विहीणी, पण चांगल्या मैत्रिणी झाल्या.

कितीतरी विहीणी ट्रीपना सोबत जातात. धमाल करतात, पण हे ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल…दोन विहीणींनी पन्नाशीच्या वयात व्यवसाय चालू केला…नुसता चालूच केला नाही तर यशस्वी केला आणि यासाठी त्यांच्या जावयानं त्यांना मदत केली आहे.

 

two moms business inmarathi1

 

हे ऐकायला पण किती छान वाटतं ना? व्यवसायाची सुरुवात अमुक एका वयातच करायला हवी..या वयात हे झेपत नाही वगैरे वगैरे लोक बोलतात, पण याही गोष्टीला या दोन महिलांनी फाटा देऊन व्यवसाय उत्तम रित्या चालवला आहे. या दोन विहीणींची ही यशोगाथा…

निशा आणि गुड्डी या दोन विहीणी विहीणींनी हा वेगळा व्यवसाय सुरु केला. निशाचा भेटवस्तू विक्रीचा व्यवसाय होताच. त्यांच्याकडं असलेली गिफ्ट्स ही अगदी हटके असायची. त्यामुळं नातेवाईकांना पण त्यांची गिफ्ट आवडायची.

अशातच निशाच्या मुलीचं लग्न गुड्डीच्या मुलाशी झालं. जावयाला आपल्या सासूबाईंनी चालू केलेला हा व्यवसाय, त्यांची भेटवस्तूंची निवड हे इतकं आवडलं, की त्यानं त्यांना या वस्तू आॅनलाईन विक्री करायची कल्पना सुचवली.

गुड्डी, निशा आणि त्यांचा जावई अनिल यांनी मिळून ही कल्पना उचलून धरली. तिघांनी मिळून वस्तू, डिझाईन्स,त्यांच्या किंमती, यांचं वर्गीकरण केलं.

जावईबापू सासूबाईंना त्यात मदत करु लागले. बेस्ट आॅफर, वेगळेपणा असलेल्या भेटवस्तू यांनी अल्पावधीतच या त्रिकुटाला यशस्वी बनवलं.

 

two moms business inmarathi3

 

वास्तविक या दोघी विहीणी गृहिणी..त्यांना व्यवसाय सुरु करण्याचा किंवा तो चालवण्याचा अनुभव नव्हता, पण मनाची तयारी असली की एव्हरेस्ट सर करता येतो इथं तर दुकान चालवायचं होतं… केवळ पन्नास हजार रुपये प्रत्येकी या भांडवलावर दोघी जणी या व्यवसायात उतरल्या.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुड्डीचं शिक्षण केवळ पाचवी पर्यंत झालं आहे. तर निशा ग्रॅज्यूएट आहेत, पण या गोष्टी त्यांच्या इच्छाशक्तीच्या आड नाही आल्या.

निशा आधीच घरातून छोटी छोटी गिफ्ट्स विकायचा व्यवसाय करत होत्या, पण गुड्डीसाठी मात्र ही एक्साईटमेंट होती..अनिल स्वतः आय टी क्षेत्रात काम करत होता. त्यानं ही कल्पना चांगलीच मनावर घेतली आणि मग आॅनलाईन सेल करायचा त्यांनी निर्णय घेतला.

त्या आॅनलाईन साईटचं नांव ठेवलं‌ गिकमंकी!!!

 

 

आता चॅलेंज होतं ते अनिलसाठी. या दोघींनीही काँप्यूटर कधीच चालवला नव्हता. पण अनिल आणि पूजा या दोघांनी फार चांगल्या रितीने हा प्रश्न हाताळला.

कोणत्याही सोशल मिडीयावर नसलेल्या या दोघी जणी एकदम आॅनलाईन स्टोअर उघडून व्यवसाय चालू करु लागल्या. बरेच महिने संशोधन केलं आणि त्यांनी अगदी युनिक अशा वस्तू आपल्या स्टोअरवर ठेवायचं ठरवलं.

इतरांसारखं काॅमन काहीही करायचं नाही हेच ठरवून त्या या व्यवसायात उतरल्या.

२०१७ साली डेहराडून येथून त्यांनी गिकमंकी ही साईट चालू केली. साधारणपणे ग्राहकांची मानसिकता ओळखून त्यांनी कमी किंमतीच्या पण छान वस्तू आपल्या आॅनलाईन स्टोअरवर ठेवल्या.

नंतर नंतर त्यांच्या यशाचा आलेख वाढत चालला. मग त्यांनी भेटवस्तूंची संख्या वाढवली. लहान मुलांच्या वस्तू वेगळ्या जसं स्पायडर मॅन, नोबिता, डोरीमाॅन हे मुलांचे आवडते कार्टून्स, मुलींसाठी वेगळी खेळणी, मोठ्यांसाठी असलेल्या वस्तू वेगळ्या असं चालू केलं.

 

two moms business inmarathi

 

मग आल्या घरगुती वस्तू.. त्यात‌ क्रोकरी, शोभेच्या वस्तू यांचाही समावेश केला. वाढदिवसाच्या खास वस्तू, लग्नासाठीच्या भेटवस्तू अशी मोठी रेंज त्यांनी ठेवली. हळूहळू हळूहळू त्यांचा व्यवसाय चांगलाच विस्तारला. लोकांच्या पसंतीला उतरला.

एरवीपेक्षा त्यांना ही आॅनलाईन व्यवसायाची संकल्पना यशस्वी ठरली कधी? तर कोविडच्या काळात!!! कोविडच्या काळात लोकांनी घरातून बाहेर पडणं बंद केलं होतं. याच कारणाने कितीतरी व्यवसाय बंद पडले होते. पण याच गोष्टीचा फायदा गिकमंकीला झाला.

आॅनलाईन खरेदीवर लोक जास्त जोर देत आहेत हे ओळखून त्यांनी वेगवेगळ्या वस्तूंमध्ये वैविध्य आणलं. थ्री डी इल्युजन लँप हा वेगळा नमुना त्यांच्याच वेबसाईटवर होता.

वेगवेगळ्या आॅफर्स ठेवल्या. ग्राहकांची नस सापडली की यश किती दूर असतं हो?

सुरुवातीला या दोघीजणी आलेल्या आॅर्डर स्वतः घरात पॅक करुन कुरिअर करत असत. कोणताही व्यवसाय सुरु करताना मालक हाच नोकर असतो हे‌ लक्षात घेऊन कष्ट केले तर‌ यश किती दूर असतं?

या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी गिकमंकी या साईटनं जवळपास तीनशे कोटींचा गल्ला मिळवला. यश म्हणजे काय असतं?

ओहोळाची नदी होणं…नदीचा समुद्र होणं..

हे सगळं होताना आपल्या माणसांचा हात हातात असणं!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?