आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अलंकार, वेगवेगळे दाग-दागिने हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय! लग्नात, सण-समारंभात दागिने घालून मिरवायला बहुतांश मुलींना आवडतंच.
जेव्हा मुलीचं लग्न होतं, तेव्हा काय काय अलंकार तिला मिळतात? बांगड्या तर लहानपणापासून घालत असतेच ती. पण त्यात परिस्थितीनुसार गोठ, पाटल्या, बिलवर यांचा समावेश होतो.
गळ्यात मंगळसूत्र येतं आणि विवाह विधीत मंगळसूत्र बांधलं, की पुढचा विधी असतो तो मुलीला जोडव्या घातल्या जातात. पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी घातली, की किती छान दिसू लागतो तो पाय!!! सौभाग्य अलंकारातील हा एक अलंकार.
अधिक महिना तीन वर्षांतून एकदा येतो. या अधिकात जावयाला वाण देतातच, पण अजून एक गोष्ट सर्रास केली जाते ती म्हणजे सोनाराकडं जाऊन जोडवी बदलणं. अगदी साध्यात साधी स्त्री पण अधिक महिन्यात जोडव्या बदलतेच.
या जोडव्यांमध्ये पण किती वेगवेगळ्या प्रकारची फॅशन असते. बोटांना पूर्णपणे वेढणारी वेढणी, मीनाकाम केलेल्या बिछवा, एखादं घुंगरु लावलेली जोडवी, मासोळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जोडव्यांनी आणि उत्साहानं खरेदीला येणाऱ्या सर्व वयोगटातील महिलांनी सोनारांची दुकानं भरलेली असतात.
असंही नटणं मुरडणं हा खास स्त्रीयांचाच प्रांत. त्यात अधिकात अधिक फळ देणारा अधिक महिना आला की जोडवी बदलायला कारणच मिळतं.
बरं आता असंही नाही राहीलेलं की, फक्त चांदीची जोडवी वापरावीत.. इमिटेशन मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची जोडवी मिळतात आणि स्त्रीया हौसेने खरेदीही करतात. पण कधी विचार केला आहे का, की ही जोडवी वापरतात?
लग्न झालं, की मुलीला जे जे सौभाग्य अलंकार घातले जातात त्या प्रत्येक अलंकारामागं काहीतरी शास्त्र आहे. एकंदरीत भारतीय संस्कृतीत जे जे रिवाज आहेत, त्या प्रत्येक रिवाजाला शास्त्राची बैठक आहे.
कुंकू भुवयांमध्येच लावतात. अंगठी अनामिकेतच घालतात. मंगळसूत्र सोन्याचंच असतं आणि जोडवी चांदीचीच असतात. कधी सोन्याची जोडवी ऐकली होती का? यांचंही शास्त्रीय कारण आहे.
शंकेखोर लोक शंका काढतात त्याला थोडा वचक असावा म्हणून त्याला देवाची किंवा धार्मिकतेची जोड दिली आहे. म्हणजे फार कटकट न करता लोक ते पाळून समृद्ध आयुष्य जगावेत हा त्यांचा हेतू. तर ही जोडवी घालण्याचीही कारणं आहेत. ती कारणं-
१. लग्नाचा हेतूच वंशवृद्धी आहे. ती वंशवृद्धी होण्यासाठी स्त्रीचं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रजनन क्षमता चांगली हवी. जोडव्यांमुळे पायाच्या दुसऱ्या बोटात असलेले पाॅईंट्स कार्यरत होतात आणि प्रजनन क्षमता चांगली राहते.
२. प्रजनन हे मासिक पाळीशी संबंधित आहे. मासिक पाळीचं चक्र नीट राहावं यासाठी जोडवी उपयुक्त असतात म्हणून जोडवी वापरली जातात.
३. जोडवी घातल्याने थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम करतात व थायरॉईडचा धोका कमी होतो.
४. जोडव्यांमुळे हृदयाची गती नियंत्रित राहते.
५. अॅक्यप्रेशर थेरपी नुसार जोडव्यांमुळे विशिष्ट रक्तवाहिनीवर योग्य प्रमाणात दाब निर्माण होतो आणि गर्भाशयाला सुरळीत रक्तपुरवठा होतो.
६. जोडव्यांमुळे गर्भाची संवेदना वाढते.
७. जोडवी घातल्याने सर्व मांस पेशी व्यवस्थित कार्यरत राहतात व शरीराचे संतुलन राहते.
८. जोडवी दोन्ही पायात घातल्यामुळे ऊर्जा समप्रमाणात राहते.
९. जोडवी चांदीचीच का? कारण चांदीमधून सकारात्मक ऊर्जा वाहते. हा ऊर्जेचा सुवाहक असलेला धातू पृथ्वीवरील ऊर्जा आपल्या शरीरात सहज वाहून आणतो आणि शरीर उत्साही राहते म्हणून जोडवी चांदीची असतात.
अलंकार घालण्यामागचं शास्त्र जाणून घेतलं, तर आपल्या तंदुरुस्त आयुष्याची किल्लीच आपल्या हाती येईल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.