कानदुखीकडे दुर्लक्ष ठरू शकतं अत्यंत घातक! या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या कोणत्याही अवयवास ईजा झाली, दुखापत झाली की असह्य अवस्था होते. माणूस अस्वस्थ होतो, आणि कोणत्याही प्रकारची वेदना ही नेहमी जीवघेणीच वाटते.
त्यातल्या त्यात पोट, दात, डोकं आणि कान ह्या अवयवांना कोणत्याही प्रकारची ईजा झाली तर परिस्थिती आणखीनच बिकट होते.
पण दात दुखी व कान दुखी अत्यंत वेदनादायी असतात. दाताचे दुखणे तरी आपण काही ना काही लावून, गरम पाण्याने शेक देऊन तात्पुरते का होईना थांबवू शकतो.
पण कानाच्या दुखण्याचे तसे नसते. अत्यंत नाजूक अवयवांपैकी एक अवयव म्हणजे कान. कानाच्या कोणत्याही भागाला चुकून हलका धक्का जरी बसला तरी जन्मभराचे दुखणे होऊ शकते.
कान दुखी जास्त तीव्र वाटते कारण कानाशी डोक्याच्या रक्तवाहिन्या देखील जोडलेल्या असतात. त्यामुळे कान दुखायला सुरुवात होताच डोके दुखी पण सुरू होते.
आपल्याला डॉक्टरकडे जाण्याआधी कोणता प्रथमोपचार करावा याबद्दल माहिती नसते. कान महत्त्वाचा जरी असला तरी एक दुर्लक्षित अवयव आहे.
त्यामुळे आपण आपल्या कानाची पुरेशी काळजी देखील घेत नाही. ज्यामुळे अशा समस्या उद्भवतात. पण इलाज जाणून घेण्याआधी नेमक्या कोणत्या कारणांमुळे कान दुखू शकतात ते जाणून घेऊया. कान दुखीची मुख्य कारणे आहेत :
. इन्फेक्शन
. कानात बाहेरच्या वस्तूमुळे जखम होणे
. कीटक कानात जाणे
इन्फेक्शन मध्ये काही कॉमन इन्फेक्शन सुद्धा आहेत –
१) Otitis Externa ज्यात इअर कॅनलला दुखापत होते.
२) Acute Otitis Media (AOM) ज्यात कानाच्या पडद्यापासून तर पुढच्या भागापर्यंत पाणी साचते. ज्यामुळे तीव्र वेदना होतात, कानाच्या भागांना सूज येते व आपल्याला तापही येतो.
३) Otitis Media with Effusion (OME) एखादे इन्फेक्शन होऊन गेल्यावर कानात कधी कधी पाणी साचून राहते. त्या स्थितीला OME इन्फेक्शन असे म्हणतात.
४) या व्यतिरिक्त सर्दी, थ्रोट इन्फेक्शन, कानातील मळ, धूम्रपान, व कोणत्याही ट्यूब ब्लॉकेजमुळे कानात इन्फेक्शन होऊ शकते.
त्यामुळे कानाच्या रात्री अपरात्री दुखण्यावर काय घरगुती उपाय करता येऊ शकतील आज आपण ते जाणून घेणार आहोत.
१) पेन रीलीवर्स किंवा Over-the-counter (OTC) पेन रीलीवर्स –
Ibuprofen आणि acetaminophen हे पेन रीलीवर्स कान दुखीवर अत्यंत उपयकरक ठरतात. विशेषतः acute otitis media (AOM) ह्या कानाच्या इन्फेक्शनला कमी करण्यासाठी व घालवण्यासाठीसुद्धा ही औषधे अत्यंत गुणकारी आहेत.
ह्या औषधांना घेताना कुठल्याही अँटीबायोटिकचा वापर करणे आवश्यक नाही. फक्त लेबलवर दिलेल्या सूचनांनुसार औषध घेणे आवश्यक आहे.
२) शेक देणे –
आपल्या बाहेरील अवयवांना ईजा झाली की आपण सगळ्यात पाहिले जो उपाय अमलात आणतो तो म्हणजे शेकणे. गरम किंवा गार पदार्थांचा शेक घेणे.
त्याचप्रमाणे अचानक कान दुखत असल्यास आपण कानाला बाहेरूनच गरम कापडाने किंवा गार बर्फाने शकू शकता. दर दहा मिनिटांनी शेकले तर पटकन फरक पडेल.
ह्याने वेदनांची तीव्रता कमी होईल. हा उपाय लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच आहे. याने कोणालाही कोणत्याही प्रकारची ईजा होणार नाही.
३) ऑलिव्ह ऑइल –
कानाचे दुखणे फारच असह्य असेल तर कानात कोमट ऑलिव्ह ऑइल घालून पहावे. याने कान दुखी त्वरित कमी होईल. हल्ली डॉक्टर कानात कोणत्याही प्रकारचे तेल घालू नये असे सांगतात त्याला काही कारणे आहेत.
पण जेव्हा डॉक्टर कडे जाणे शक्य नसते तेव्हा घरगुती उपाय करून बघावेच लागतात. त्यामुळे पारंपारिक चालत आलेला हा उपाय करून पाहणे काहीच गैर नाही.
४) नॅच्युरोपॅथिक ड्रॉप्स –
हे ड्रॉप्स नैसर्गिक सामग्री पासून बनवण्यात आले असतात. त्यामुळे हे ड्रॉप्स Over-the-counter ड्रॉप्स प्रमाणे कार्य करतात व त्याचप्रमाणे अत्यंत गुणकारक ठरतात.
त्यामुळे ह्या ड्रॉप्सचा वापर करून आपण आपले दुखणे थांबवू शकतात.
५) दुखणाऱ्या कानावर भार न पडू देणे –
कान दुखत असताना झोपताना डोक्याची उंची वाढवणे फायदेशीर ठरते, यामुळे जर कानात कोणत्याही प्रकारचे पाणी जमा झाले असेल तर ते कानातून बाहेर पडण्यास मदत होते.
किंवा कान दुखत असताना दुखणाऱ्या कानाच्या विरूद्ध कडेस झोपावे. दुखणाऱ्या कानावर वजन किंवा दाब न पडू देणे हे कान दुखी घालवण्यासाठी लाभदायी ठरते.
६) मानेचे व्यायाम –
कान दुखण्यामागे एक कारण इअर कॅनल वरील अत्यंत तणाव व दाब हेही असू शकते. त्यामुळे मानेचे व्यायाम करण्याने कान दुखी घालवता येऊ शकते.
ताठ बसून, आपल्या मानेला हळुवार पाने क्लॉक वाईज व अँटी क्लॉक वाईज फिरवा. हे ८-१० मिनिटे केल्याने, इअर कॅनल वरील प्रेशर कमी होऊन, कान दुखी कमी झालेली जाणवू शकते.
७) आल्याचं तेल किंवा रस –
आलं हे अत्यंत औषधी तत्वांनी युक्त असून बऱ्याच रोगांवर, दुखण्यांवर अत्यंत गुणकारी ठरते. त्याचप्रमाणे कानाच्या दुखण्यावरसुद्धा.
कान दुखत असल्यास आल्याला तेलात घालून तयार केलेले तेल किंवा साधा आल्याचा रस आपल्या कानाच्या अवती भोवती व इअर कॅनलवर अर्थात कानाच्या मागच्या बाजूस व मानेवर लावा.
आल्यात असलेल्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे कान दुखणे थांबवला जाऊ शकते.
८) मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे –
कधी कधी घश्याच्या इन्फेक्शनमुळे किंवा टॉन्सिल्सच्या त्रासामुळे कान दुखी उद्भवू शकते.
जर तुमचे कान या कारणामुळे दुखत असतील तर त्वरित गरम पाण्यात २-३ चमचे मीठ घालून त्याने गुळणा करा. त्वरितच कान दुखायचे थांबतील.
९) हायड्रोजन परॉक्साईड –
कधी कधी फंगल इन्फेक्शन मुळे कान दुखू लागतात. त्यासाठी कानात ३ – ४ थेंब हायड्रोजन परॉक्साईड घालून ६ – ८ मिनिटे ठेवा व नंतर वाकून कानातून ते काढून टाका. याने फंगस जाऊन कान दुखी पण थांबेल.
१०) लसूण –
लसूण सुद्धा औषधी गुणांनी परिपूर्ण असून याला कान दुखण्यावर महत्त्वाचा उपाय मानलं जातं.
खोबरेल तेलात लासुणाच्या २-३ पाकळ्या घालून ते तेल कोमट म्हणजे तुमच्या शरीराच्या तापमाना एढेच गरम करून घ्या. व ते कानात घाला. यामुळे कानाला शेक मिळेल व लसणीतल्या औषधी गुणांनी कान दुखी थांबेल.
११) लक्ष विचलित करा –
कान दुखत असताना विशेषतः लहान मुलांना हा त्रास असल्यास त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा.
योग्य उपचार मिळे पर्यंत त्यांना कोणत्या तरी कामात गुंतवून ठेण्याचा प्रयत्न करा. याने वेदनांची तीव्रता थोडी का होईना कमी होईल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.