' फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लागलेली ही सवय ठरू शकते घातक! – InMarathi

फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लागलेली ही सवय ठरू शकते घातक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कधी कधी आपण उशिरा रात्रीपर्यंत जागरण करत असू तर बऱ्याचदा आपल्याला भूक लागते आणि आपले पाय फ्रिज कडे वळतात उशिरा रात्री फ्रीजमधून काहीतरी खाद्यपदार्थ काढून खाणे हे आपल्यापैकी बरेच जणांनी रात्री जागताना केले असेल.

कधीतरी असे करणे हे चालून जाण्यासारखे आहे पण याची जर सवय लागली तर आपल्याला अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात असे बरेच आरोग्य विश्लेषक सांगतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

आपण विचारही करू शकत नाही असेही भयावह आजार या एका सवयीमुळे ओढले जाऊ शकतात.

 

midnight eating inmarathi

 

उशिरा रात्री खाण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीराला अनेक विकार होऊ शकतात, आपले वजन अतिरिक्त प्रमाणात वाढू शकते आणि एवढेच नव्हे तर, उशिरा रात्रीच्या खाण्यामुळे नाईट ईटिंग सिंड्रोम होऊ शकतो आणि यामुळे अजून बऱ्याच व्याधी निर्माण होऊ शकतात.

म्हणूनच आम्ही तुम्हाला हाच सल्ला देत आहोत की शक्य तेवढा आहार दिवसात घेतला पाहिजे ज्यावेळी आपले शरीर अधिक कार्यरत असते ज्यामुळे आपण ग्राह्य केलेल्या कॅलरीज कमी होतात.

जर तुम्हालाही ही उशिरा रात्री खाण्याची सवय असेल तर तुम्ही खालील गोष्टी वाचायला हव्यात.

 

झोप नीट न लागणे :

 

sleeping women inmarathi

 

काही माणसांना त्यांच्या नाईट शिफ्ट मुळे रात्र जागरण करणे भाग असते किंवा काही माणसांना तर रात्री उशिरा झोपण्याची सवय असते. अशावेळी तात्पुरती भूक भागविण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून हे लोक पॅकेट्स मधील पदार्थ खातात.

रात्री असे पदार्थ खाल्ल्यामुळे यांना जठरा संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे अशा माणसांमध्ये अजून एक लक्षण दिसून आले आहे की की यांना रात्री विचित्र स्वप्न पडतात.

हे कसे जाणून घेण्यासाठी उशिरा रात्री खाणे झोपेवर कसे कसे परिणाम करू शकते यावर दोन कॅनडियन सायकॉलॉजिस्टनी अभ्यास केला.

या अभ्यासातून त्यांना कळले की युनिव्हर्सिटीमधील जी मुले उशिरा रात्री खातात त्यांना विचित्र स्वप्न येतात. रात्रीच्या उशिरा खाण्यामुळे जठराच्या समस्या निर्माण होतात आणि त्यामुळेच विचित्र स्वप्न येतात.

 

नीट पचन न होणे :

 

tea causes digestion inmarathi

रात्री उशिरा जेवल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात ज्या गहन आजारांमध्ये हे रूपांतरित होऊ शकतात वर सांगितल्याप्रमाणे रात्री ऐनवेळी काहीही खाल्ल्यामुळे जठरा संबंधित समस्या उद्भवतात.

ज्यामुळे आपल्या पोटात ऍसिड तयार होते पोटात तयार झालेल्या या ऍसिडमुळे अर्थातच आपल्याला ऍसिडिटी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

म्हणून तुम्हाला हृदयासंबंधित रोग किंवा ऍसिड रिफ्लक्स ची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा निश्चित केल्या पाहिजेत.

उशिरा रात्री केलेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही आणि पचन न झाल्यामुळे पोटा संबंधातील अन्य विकार देखील ओढवतात.

म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी आपण थोडा वेळ चालले पाहिजे त्यामुळे पचन नीट होते.

 

वजन वाढणे :

 

 

आपल्या शरीरातसुद्धा एक घड्याळ असते. या ओळीचा अर्थ शब्दशः न घेता हे जाणून घ्या की आपल्या नेहमीच्या दिनचर्येची सवय शरीराला झालेली असते.

उदा. जेवणाची वेळ, उठण्याची वेळ इत्यादी. आपल्या शरीराला या घड्याळाची सवय झालेली असते.

जर आपण जेवणाची वेळ निश्चित न करता कधीही खात राहिलो तर यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडतो.

परिणामी वजन वाढते. शरीरातील वजन वाढल्यामुळे आपण बेडकर दिसतोच पण या आईवजी अन्य समस्यांना देखील निमंत्रण मिळते. उदाहरणार्थ हृद्यासंबंधित विकार जे आपल्यासाठी जीवघेणे ठरू शकतात.

जर उशिरा रात्रीच्या खाण्यात तेलयुक्त पदार्थांचा समावेश असेल तर वजन वाढण्याची शक्यता अजूनच दाट होते. रात्रीच्या वेळी शरीराचे मेटाबोलिजम म्हणजे चयपचन शक्ती जी पचनासाठी मदत करते ती कमी झालेली असते.

त्यामुळे अशावेळी खाल्लेल्या अन्नाचे पचन तर नीट होत नाही ही वरून वजन वाढण्यास सारखी घातक समस्येला सामोरे जावे लागते.

 

रक्त दाब वाढण्याची शक्यता :

 

blood pressure inmarathi

खाण्याच्या वेळा न पाळल्यामुळे किंवा रात्री उशिरा जेवल्यामुळे हृदया संबंधित काय विकार जडू शकतात हे तुम्हाला लक्षात आलेच असेल. हृदया संबंधित विकारांमध्ये रक्तदाब वाढणे हा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

तसेच डायबिटीज होण्याची शक्यता असते. अभ्यासातून असे कळले आहे की की रात्री उशिरा खाणाऱ्या लोकांना हाय ब्लडप्रेशर किंवा हायपर टेंशन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

त्यांच्या रक्तशर्करेचे प्रमाणही वाढवून डायबिटीज ही होऊ शकतो. जो आजार सहसा बरा होत नाही.

वरून शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी गोळ्यांचे पथ्य अचूक ठेवावे लागते. जर तुम्हा सर्वांना या विकारांपासून पाठ फिरवायची असेल तर रात्री उशिरा खाणे हे तुम्ही टाळलेच पाहिजे.

डॉक्टरांकडून असे सांगितले जाते कि रात्रीच्या जेवणाची उचित वेळ ही संध्याकाळी सातची असावी.

 

गर्भावर परिणाम होणे :

 

pregnancy-inmarathi

गर्भावस्थेत स्त्रियांना सतत काहीतरी खाण्याचे मन करते. परंतु असे असताना देखील गर्भवती स्त्रियांनी रात्री उशिरा काहीही खाणे टाळले पाहिजे.

कारण यामुळे तुमच्या बी एम आय वर प्रभाव पडतो बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स आणि यात जर वाढ झाली तर गर्भवती स्त्रियांच्या आणि गर्भातील शिशुच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो.

त्यामुळे या सवयीपासून गर्भवती स्त्रियांनी दूरच राहिले पाहिजे या ऐवजी त्यांनी दिवसभरात सकस आहाराचे सेवन केले पाहिजे.

 

स्मरणशक्ती कमी होणे :

 

memory-loss-inmarathi

 

अमेरिकेतील लॉस एंजलिस मधील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी रात्रीच्या खाण्याचा काय प्रभाव होतो हे बघण्यासाठी एक प्रयोग केला.

त्यांनी दोन उंदरांना दोन आठवड्यांसाठी वेगवेगळ्या वेळी जेवण घातले एकाला ते दिवसाचे घालत तर दुसऱ्याला रात्री जेवण देत.

आणि याच अभ्यासातून कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना कळले की जेवणाच्या वेळेचा स्मरणशक्तीवर प्रभाव पडतो. रात्रीच्या वेळी जेवण घातल्या जाणाऱ्या उंदरांची स्मरणशक्ती ती संशोधकांना कमी झालेली आढळली.

उशिरा जेवण केल्यामुळे मानवाच्या स्मरणशक्तीवर ही प्रभाव पडतो की नाही यावर अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही.

परंतु संशोधकांनी सर्वांना हेच सुचवले की आपण शक्य तेवढे कॅलरीचे इंटेक दिवसा केले पाहिजे थोडक्यात आपणास जे काही खायचे आहे ते दिवसा खाल्ले पाहिजे.

जर तुम्हालाही अपरात्री खाण्याची सवय असेल तर ही सवय दूर करण्यासाठी तुम्ही त्वरित काही गोष्टी करायला हव्यात.

स्वयंपाक घरात आणि किचनमध्ये असलेले सगळे पॅकेटबंद पदार्थ तुम्ही फेकून दिले तर तुमचे मन तिकडे सारखे ओढले जाणार नाही.

याऐवजी तुम्ही जेवणात सकस आहाराचा समावेश करा जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असेल. आरोग्यासाठी पूरक असलेल्या जेवणाच्या पथ्यांसाठी तुम्ही न्यूट्रिशनिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?