खूषखबर! भारतात हा प्रयोग यशस्वी झाला, तर तुम्ही हवेतून पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
COVID 19 महामारी मुळे संपूर्ण जगाच्या हालचालींना विरामच लागलाय. घरामध्येच आपण कैदी बनून अडकलो आहोत.
काम थांबविता येत नसल्याने कामाच्या पद्धती आपण बदलल्या. पारंपरिक पद्धती वरून आपण ऑनलाईन पद्धतीकडे वळलो. वर्क फ्रॉम होम सुरू झाले व घराचे सुद्धा ऑफिस झाले आणि आपण अजूनच वैतागलो.
मनोरंजन नाही, दिनचर्येत बदल नाही त्यामुळे सगळेच कंटाळले आहेत. यात सगळ्यात मोठी कोंडी होतेय ती खवैये व भटकंती अतिशय प्रिय असणाऱ्या लोकांची. ज्यांना घरात बसणे किंवा एका जागेवर सुद्धा स्थिर बसणे अशक्य वाटायचे त्यांना सुद्धा ह्या निसर्गाच्या लॉकडाऊनला सामोरं जावं लागतंय.
खवैय्ये तरी यूट्यूबच्या पाककृती पाहून घरी अगदी तसेच पदार्थ बनवून आपल्या मनाचे व जिभेचे चोचले पुरवू शकतात पण प्रवाशांचे काय?
लॉकडाऊन मुळे व स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने जरी ही मंडळी घरात अडकून पडली असली, तरी त्यांचे मन मात्र आगगाडीच्या त्या तालबद्ध आवाजाकडे, बसच्या खिडकीतून दिसणाऱ्या सुंदर वळणदार रस्त्याकडे व विमानातून दिसणाऱ्या जगाच्या त्या मिनिएचरकडेच असते.
जवळपास ८-९ महिन्यांपासून आपण सगळेच हे थ्रील मिस करतोय, पण हाच कंटाळा घालवण्यासाठी, “जग पुन्हा लवकरच सुरळीत होईल” ही उमेद घेऊन, भारताचा नेहमीच भरवशाचा ठरलेला एविएशन ब्रँड, एअर इंडिया एक आगळी वेगळी ऑफर घेऊन येण्याच्या तयारीत आहे.
ती म्हणजे “अ फ्लाईट टू नो व्हेअर”. या ऑफरनुसार सगळ्याच प्रवाशांना विमानाद्वारे, ठराविक विमानतळावरून सुरुवात करून आकाशात एक चक्कर मारून, वरूनच काही प्रेक्षणीय स्थळे दाखवून पुन्हा त्याच विमानतळावर सोडण्यात येणार आहे.
होय, आपण योग्यच वाचले. एअर इंडिया लवकरच “फ्लाईट टू नोव्हेअर” घेऊन आपल्या सेवेत रुजू होणार आहे. ही ऑफर एअर इंडिया ने ऑस्ट्रेलियाच्या Qantas Airways च्या अशाच फ्लाईट टू नोव्हेअरच्या अफलातून व यशस्वी ठरलेल्या योजनेवरून प्रेरित होऊन भारतातही राबवण्याची तयारी सुरू केली आहे.
Qantas Airways च्या ह्या ऑफेर मध्ये प्रवाश्यांना ग्रेट बॅरीयर रीफ, सिडनी हार्बर यांसारख्या जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांची आकाशातून भ्रमंती करुवून आणण्यात आली. ही ऑफर जाहीर होताच फक्त १० मिनिटांच्या कालावधीत संपूर्ण तिकिटे विकली गेली होती.
लोकं घरात बसून इतकी कंटाळली होती, की ही ऑफर येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली सिट लगेच बुक केली व या संकल्पनेला दणदणीत प्रतिसाद मिळाला.
इतक्या जोरदार यशामुळे आता सिंगापूर एअरलाईन्स सुद्धा याच प्रकारची ऑफर आणण्याच्या तयारीत आहे. ज्यात तिथल्या फ्लाईट Changi विमानतळावरून उड्डाण करतील व पुन्हा त्याच विमानतळावर परततील.
या ऑफरला अमलात आणण्यासाठी Boeing 747 जंबो जेटचा वापर करण्यात येणार आहे. जे पृथ्वीपासून ५०० ते १००० मीटरच्या अंतरावर उड्डाण करण्यास सक्षम आहे.
जमिनीवरील कोणत्याही उंच इमारतीशी विमान धडकू नये म्हणून एक मर्यादा ठरवण्यात येते. त्या मर्यादित अंतरावरच कोणत्याही विमानात उड्डाण करण्याची परवानगी असते.
सगळ्यात खालच्या व जमिनीच्या बरेच जवळ असलेल्या स्तराला Minimum Obstacle Clearance Altitude (MOCA) म्हणतात. ज्यामुळे जमिनीवरील वास्तू, ठिकाणे सगळेच आकाशातून आपल्याला बघता येऊ शकते व त्याच बरोबर इमारतींपासून सुरक्षित अंतरही राखले जाते.
फ्लाईट टू नोव्हेअर ह्या सेवेतील विमान हे MOCA ह्या पातळीवर उड्डाण करेल. Boeing 747 ह्या विमानाचा वेग जवळपास २५० नॉट्स अर्थात ४०० किलोमीटर प्रती तास इतका असतो त्यामुळे बघणाऱ्याला, या फ्लाईटचा पूर्ण आनंद लुटता येईल.
ही फ्लाईट ७-८ तासांनी असणार आहे. ज्यामुळे भारत व जवळ पासच्या देशांतील काही प्रदेशही प्रवाशांनी बघता येतील.
सध्या तरी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा ठरवण्यात आलेली नसून, महामारीच्या दृष्टीने सुरक्षित अशी १८ -४० वयोगटातील मंडळींसाठी ही सेवा असेल असे सांगण्यात येत आहे. कारण वृध्द व बालकांना कोरोनाचा संसर्ग लवकर होऊन, मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता असते म्हणून ही वयोमर्यादेची अट ठेवली जाण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर अनेक सच्च्या प्रवाश्यांनी अनेक महिने घरात अडकून असल्याने आपल्याला फ्लाइट्स, प्रवास व त्यातील रोमांचची किती उणीव भासते आहे हे जाहीर केले. त्यांच्या आनंदासाठी एअर इंडिया ही मोहीम भारतात आणायला तत्पर झाली आहे.
भारतात बळावणाऱ्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, काही तज्ञांनी हा प्रयोग यशस्वी जरी झाला तरी ह्या महामारीत हा प्रवास कितीसा सुरक्षित असेल या बाबत शंका व्यक्त केली आहे.
त्यामुळे रिस्क असलेल्या ह्या उपक्रमापेक्षा, सध्या गरजे पुरती विमान वाहतूक सुरू ठेवावी असे त्यांचे मत आहे. कारण विमानात भरपूर लोकं असून सोशल डीस्टन्सिंगचे कितीसे पालन करण्यात येईल किंवा केले जाऊ शकते यावरही प्रश्न चिन्ह निर्माण आहे.
एअर इंडिया एक जबाबदार संस्था असून आपल्या प्रवाशांची काळजी ही त्यांची सगळ्यात मोठी प्रायोरिटी नेहमीच असते. त्यामुळे फ्लाईट टू नोव्हेअरच्या सुरक्षा नियमांचे पालन करून प्रवाशांची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.