आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘ब्रेकिंग न्यूज’ या सदराखाली खूप बातम्या आजकाल मीडिया आपल्यापर्यंत पोहोचवत असते.
या सदरात बऱ्याच वेळेस बातमी देण्याच्या घाईपोटी शहानिशा न करताच ती बातमी प्रसिद्ध केली जाते आणि मग जनक्षोभानंतर एक छोटीशी स्क्रोल पट्टी देऊन त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाते.
मीडिया मध्ये वाढत्या स्पर्धेमुळे ब्रेकिंग न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्या या बऱ्याच वेळेस लोकांना माहिती पुरवण्यापेक्षा लोकांच्या इंटरेस्ट नुसार ठरवल्या जातात हेच आजकाल आढळून येत आहे.
गाजलेल्या ब्रेकिंग न्यूज पैकी एक म्हणजे ‘विकी कौशल आणि कतरीनाकैफ यांचं राजस्थानमध्ये झालेलं लग्न’ ही एक म्हणता येईल.
त्यासोबतच, एक बातमी कायमच मीडिया च्या इंटरेस्ट ची आहे ती म्हणजे ‘सलमान खान चं लग्न कधी होणार?’ या बातमीने जवळपास एक दशक मीडिया कंपनी ला जाहिराती मिळवून देण्याची सोय करून ठेवली होती.
एका अश्याच कुठेही न झळकलेल्या ब्रेकिंग न्यूज वर आम्ही प्रकाश टाकत आहोत.
ती बातमी अशी आहे की, “हनुमान – बजरंग बली यांचं लग्न झालं होतं…” याबद्दल काही माहिती आम्ही देत आहोत ज्याने कदाचित आपल्याला या बातमीत तथ्य वाटेल.
प्रत्येकाने रामायण, महाभारत हे बघितलेले आहेत. त्यामध्ये कुठेही या घटनेचा उल्लेख नाहीये हे मान्य आहे, पण ही आख्यायिका अशी आहे की :
जेव्हा हनुमान यांचं वय वाढत होतं तेव्हा त्यांच्या आई अंजनी यांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी सूर्याकडे जाण्यास सांगितलं होतं.
तेव्हा सूर्याकडे पोहोचलेल्या मारुती रायाने सूर्याला वेदाचं आणि उपनिषदांचं शिक्षण देण्यास विनंती केली. सूर्याने ती विनंती मान्य केली.
हनुमान सूर्याकडून शिक्षण घेऊ लागले. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. निघण्यापूर्वी त्यांनी सूर्याला ‘गुरुदक्षिणा काय देऊ?’ अशी विचारणा केली.
तेव्हा सुर्यदेवतेने वीर हनुमान यांना त्यांच्या कन्या सुवर्चला हिच्यासोबत विवाह करण्याची गुरुदक्षिणा मारुती रायांकडे मागितली होती.
हे करणं यासाठी सुद्धा गरजेचं होतं की, वेद आणि नऊ व्याकरण शिकण्यासाठी व्यक्ती कोणतीही व्यक्ती गृहस्थ (विवाहित) असावी अशी मान्यता होती.
ही अट पूर्ण करण्यासाठी सूर्याच्या तेजाने निर्माण झालेल्या सुवर्चला सोबत हनुमान यांचा विवाह संपन्न करण्यात आला आणि त्यांना ‘गृहस्थ’ करण्यात आलं होतं.
बजरंग बली ने सुर्यदेवतेला त्यांच्या ‘ब्रम्हचर्य’ व्रताची माहिती दिली होती तेव्हा सूर्याने त्यांना असं एक व्रत दिलं ज्याने की, हनुमान हे लग्न पण करतील आणि त्यांचं ब्रम्हचर्य व्रत सुद्धा अबाधित राहील.
हे लग्न म्हणजे फक्त या शिक्षणापुरतं मर्यादित असेल आणि या लग्नाने जर हनुमान यांच्या ज्ञानात भर पडणार असेल जे की ते लोक कल्याणासाठी वापरणार आहेत.
तर अश्या वेळी त्यांनी निवडलेल्या ब्रम्हचारी व्रताचं रक्षण हे समस्त देवता करतील असं सुर्यदेवतेने सांगितलं होतं.
तेलंगणा येथील खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि सुवर्चला यांचं एक मंदिर आहे जिथे त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. ज्येष्ठ शुद्ध दशमी हा मारुतीच्या लग्नाचा मुहूर्त असल्याची मान्यता आहे.
इतर भारतीय लोकांसाठी ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. या जोडीला सुवर्चला अंजनेया हे नाव देण्यात आलं आहे. गुरू आज्ञेवरून झालेल्या या लग्नाचा उल्लेख ‘पारस संहिता’ मध्ये ‘हनुमंत कल्याणम’ (हनुमानाचं लग्न) असा करण्यात आला आहे.
जैन साहित्यात याबद्दल अजून एक उल्लेख आहे की, हनुमान यांचं लग्न हे रावणाच्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच आनंगकुसुमा सोबत झालं होतं जी की खरदूषणा आणि चंद्रनखा यांची मुलगी होती.
जैन साहित्याच्या पौमाकरीया या रामायणाच्या आवृत्तीत असं ही लिहिलं आहे की, हनुमानाचा विवाह हा लंकासुंदरी सोबत झाला होता जी की बज्रमुख यांची मुलगी होती.
सेवाव्रत म्हणजे काय? हे आपल्या सर्वांना शिकवणाऱ्या हनुमान यांचं आयुष्य हे आजही आदर्श आहे. सत्य, विश्वास, ज्ञान, धैर्य यांचं प्रतीक म्हणजे बजरंग बली यांना मानलं जातं.
सर्व शक्तिमान असूनही त्यांच्यात लहानपणा पासूनच असलेली निरागसता ही लोकांना नेहमीच भावते. केसरीनंदन आणि अंजनीच्या या सुताला शंकराचा पुनर्जन्म असंही मानलं जायचं.
पवनसुत हनुमान हे लंकादहन केल्यानंतर हिमालयात गेले आणि तिथे ते रामाची उपासना करत होते अशी आख्यायिका आहे.
रामायणाच्या गोष्टी त्यांनी हिमालयातील गुहेमध्ये आपल्या नखाने लिहून ठेवल्या आहेत हे सुद्धा लोक मान्य करतात.
पौराणीक गोष्टींबद्दल वस्तुनिष्ठ प्रमाण देणारी कोणती संस्था आपल्याकडे अस्तित्वात नाहीये. प्रत्येक साहित्यिकांनी त्यांना आलेल्या अनुभूती आणि मान्यता या आपल्या संकलित करून उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्यापैकी कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवावा आणि कोणत्या गोष्टीवर नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जेव्हा आपल्याला संकल्प आणि प्रेरणा घ्यायची असेल तेव्हा मात्र आपल्याकडे हा साहित्यरूपी खजिना आहे हे आपलं भाग्य आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.