जगभरात ज्या गोष्टीविरुद्ध कॅम्पेन केलं जातं तीच गोष्ट भाविक ह्या बाबांना अर्पण करतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोणतीही गोष्ट मनाप्रमाणे घडावी यासाठी केले जाणारे ‘नवस’ हे भारतातील अंधश्रद्धा वाढीस लागण्याचं एक महत्वपूर्ण कारण आहे.
कोणी काही एक उपाय सांगणार आणि त्याला लोक लगेच फॉलो करणार हे आपण सर्रास बघत आलो आहोत. बऱ्याच भागात लोकांचं ‘कमी शिक्षण’ हे अंधश्रद्धेचं मूळ कारण आहे.
आपल्या महाराष्ट्रात कित्येक वर्षांपासून प्रचलित असलेले काही नवस सांगायचे तर परभणी जिल्ह्यात एक दर्गा आहे तिथे लहान बालकांना एका उंचीवरून खाली फेकलं जातं. आणि नातेवाईक हे त्या बाळाला खाली झेलत असतात.
यामागे काही लॉजिक नक्की कोणालाच सांगता येत नाही.
अजून एक प्रचलित अंधश्रद्धा म्हणजे नाशिकरोड इथे असलेलं एक मंदिर जिथे काही लोक इच्छापूर्ती साठी घंटी बांधतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होते असा समज आहे.
काही नवस हे मनातल्या मनात सुद्धा बोललेले असतात. “माझं हे काम होऊ दे, मग मी ते करेन. पायी दर्शनाला येईल.” असे बरेच प्रकार आहेत.
पण, आपण कधी हे ऐकलं नसेल की कोणतं व्यसन हे नवसपूर्ती साठी वापरण्यात येत आहे. लॉजीकली विचार केला तर कोणताही देव कधीच तुम्हाला स्वतःचा जीव धोक्यात टाकून काहीच करायला सांगणार नाही.
पण, काही लोकांनी गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडून लोकांना वेडं करून काहींनी स्वतःचा फायदा करून घेतला आहे. असं नाहीये की हे फक्त महाराष्ट्रात होतं.
आपल्या शेजारच्या गुजरात राज्यात जिथे दारू बंदी, मांसाहार बंदी आहे तिथल्या अहमदाबाद शहरात एक असा नवस बोलला जातो जिथे नवसपूर्तीसाठी सिगरेट वाहिली जाते. आहे की नाही, आश्चर्याची गोष्ट.
साबरमती नदीच्या तीरावर असलेलं दधिची ऋषीचं एक आश्रम आहे. त्या आश्रमात ‘अघोरी दादा’ यांची समाधी आहे. या समाधीवर दर गुरुवारी सिगरेट आणि गुलाबाचं फुल वाहण्याची प्रथा आहे.
ही प्रथा इतकी प्रचलित आहे आणि इतक्या सातत्याने फॉलो केली जाते की, सध्याच्या वैश्विक महामारी मध्ये सुद्धा ही प्रथा सातत्याने पाळली जाते.
या आश्रमाची एकच अट आहे की, येणाऱ्या भक्तांनी वाहिलेली सिगरेट ही उच्च किमतीची असू नये. दर गुरुवारी इथे हजारो भाविक येतात आणि ही प्रथा टिकवून ठेवतात.
दधिची आश्रमाचे ट्रस्टी असं सांगतात की, “हा आश्रम अहमदाबाद शहराची स्थापना होण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून अस्तित्वात आहे. अघोरी दादा हे सुद्धा खूप जुने आहेत. ते या आश्रमात रहायचे आणि तेव्हापासून ही प्रथा त्यांनी सुरू केली होती.
तेव्हापासून इथे ‘चरस’, ‘गांजा’ या गोष्टी ऑफर केल्या जातात. जेव्हापासून चरस, गांजावर कायद्याने बंदी घालण्यात आली तेव्हापासून सिगरेट ऑफर करायची सुरुवात झाली आहे.
गुजरात मधील कित्येक VIP लोकसुद्धा इथे येतात. त्या लोकांच्या सुद्धा मनोकामना इथे सिगरेट वाहिल्या नंतर पूर्ण झाल्या आहेत. काही कारणास्तव, आम्ही त्यांचे नाव जाहीर करू शकत नाही.”
अघोरी दादाच्या समाधी स्थळावर कायम एक ज्योत तेवत असते आणि त्यामधून कित्येक भाविक हे आपली सिगरेट पेटवून घेत असतात आणि अघोरी दादांना प्रिय असलेल्या या व्यसनाचा आनंद घेत असतात.
प्रथा तेव्हा पूर्ण होते जेव्हा प्रत्येक भाविक त्या ज्योती मधून एक सिगरेट पेटवतो आणि समाधी स्थळी असलेल्या एका रॅक मध्ये ती पेटवलेली सिगरेट ठेवतो.
एका भाविकाने असं सांगितलं होतं की, “वाहिलेल्या सिगरेट चा दर्जा योग्य आहे की नाही ते अघोरी दादा चेक करतात त्याचं सेवन करतात आणि मग प्रत्येक भक्ताचा नवस पूर्ण होतो.
कोणताही भक्त मोठ्या luxury कार मध्ये येवो किंवा पायी येवो, तो एकाच प्रकारच्या स्वस्त सिगरेट ला इथे वाहत असतो. ही सिगरेट आणि फुल त्या भक्ताला या ट्रस्ट कडून मोफत देण्यात येतात.”
कोरोना चे आकडे जेव्हापासून भारतात वाढले तेव्हापासून इथे येणाऱ्या लोकांमध्ये घट झाली आहे. अन्यथा, त्या आधीपर्यंत खूप जास्त लोक दर गुरुवारी इथे यायचे.
लॉकडाऊन आणि आपापल्या गावी स्थलांतरीत झालेले लोक हे या संख्या कमी होण्याचं कारण मानलं जातं.
जसं जसं निर्बंध कमी होत आहेत तसं पुन्हा इथे आधीसारखी गर्दी होईल असा विश्वास दधिची आश्रम ट्रस्ट ला आहे. कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हा या लेखाचा उद्देश नाहीये.
भारतात अजूनही किती मागासलेपणा शिल्लक आहे हे समोर आणणं हा उद्देश म्हणता येईल.
लोक आपल्या कामाचा दर्जा सुधरवण्याकडे लक्ष न देता बाकी किती गोष्टी मन लावून करत असतात हे अधोरेखित करून त्यात सुधार व्हावा या आशेने हे लिहिण्यात आलं आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.