Site icon InMarathi

…म्हणून व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात “बाबा का ढाबाच्या” मालकाने केली पोलिसात तक्रार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडिया हा सध्या असा विषय झाला आहे की त्याचे पुरस्कर्ते लोक तितकेच आहेत आणि त्याला नावं ठेणारे लोक सुद्धा तितकेच आहेत. काय आहे सोशल मीडिया?

खरं तर हे नावच बरोबर नाहीये. योग्य नाव आहे सोशल नेटवर्क. एक असं नेटवर्क जिथे समविचारी लोक एकत्र येतात. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देतात आणि वाईट गोष्टींवर टीका करतात.

त्यावर अपेक्षित बदल सुद्धा सुचवतात या उद्देशाने की सद्यस्थितीत काही तरी बदल घडेल.

 

 

सोशल नेटवर्क चा असा वापर झाल्यास किती तरी सामाजिक प्रश्न कमी वेळात सुटतील. सरकारवर एक वचक असेल. सामान्य माणूस सुद्धा कमी वेळात त्याच्या बिजनेस साठी कस्टमर मिळवू शकेल.

कारण, तसंही सोशल नेटवर्क (फेसबुक, इन्स्टाग्राम, whatsapp मिळून ) प्रत्येक व्यक्ती आजकाल साधारणपणे १००० लोकांशी कनेक्टेड असते. तरीसुद्धा कित्येक बिजनेस हे उभारी घेत नाहीत.

असंही नाहीये की, सोशल नेटवर्क आल्यानंतर लोक जास्त आनंदी राहत आहेत. आत्महत्येचं आणि नैराश्याचे प्रमाण मागील काही वर्षात प्रचंड वाढलं आहे.

या सर्वांचं एकच कारण आहे, सोशल नेटवर्क चा योग्य वापर माहीत नसणे. “सोशल मीडियाला मी वापरतोय की तो मला ?” हे सतत स्वतःला न विचारणे.

दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’ चं उदाहरण जर का बघितलं तर लक्षात येईल की सोशल मीडिया ची खरी ताकद काय असते?

सध्या हाच बाबा का ढाबा पुन्हा चर्चेत आहे पण एका वेगळ्याच कारणासाठी. ज्या युट्यूबर मुळे बाबा का ढाबा आणि त्याचे मालक कांता प्रसाद फेमस झाले त्याच युट्यूबरच्या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे!

एक ८० वर्षांचे कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी मिळून मालवीय नगर मध्ये ‘बाबा का ढाबा’ या नावाने एक छोटं हॉटेल चालवतात.

दोघेही रोज सकाळी ५ वाजता उठून तयारी करतात आणि जेवण तयार करतात आणि अगदी कमी दरात विकायला ठेवतात. चांगली चव असल्याने लोकं सुद्धा इथे गर्दी करायचे.

 

 

पण, कोरोना आला आणि काही दिवस सगळं बंद राहिलं आणि नंतर लोकांनी बाहेरचं खाणं टाळायला सुरुवात केली. ‘बाबा का ढाबा’ चा बिजनेस एका दिवसात फक्त ५० रुपये इतका खाली गेला.

गौरव वासन या फूड ब्लॉगर ने दोन दिवसांपूर्वी ‘बाबा का ढाबा’ बद्दल एक छोटा विडिओ तयार केला ज्यात की कांता प्रसाद यांच्या हॉटेल मधील चविष्ट पनीर ची माहिती होती आणि सध्याच्या हलाखीच्या परिस्थिती मुळे बाबांचे अनावर झालेले अश्रू होते.

हा व्हिडिओ वसुंधरा तांक यांनी ट्विटर वर share केला . एका दिवसातच हा व्हिडिओ प्रचंड viral झाला आणि मोठमोठ्या सेलेब्रिटींनी याची दखल घेत आपापल्या फॅन्स ला ‘बाबा का ढाबा’ वर जाऊन जेवण करायचं आवाहन केलं.

अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी चमत्कार घडला. दिवसभर कस्टमर्स ची वाट पाहणाऱ्या बाबांना वर पहायची फुरसत नव्हती इतके लोक त्यांच्या हॉटेल वर आले होते.

लोकांनी अक्षरशः लाईन लावून जेवणाचा आस्वाद घेतला. कित्येक लोकांनी पार्सल घेतले. रोज दिवसभरात न संपणारे अन्न एक तासात संपलं होतं.

आदल्या दिवशी परिस्थिती समोर हतबल झालेले बाबा आज प्रसन्न होते. ही आहे सोशल मीडिया ची ताकद.

याच गौरव वासन विषयी कांता प्रसाद यांनी एक वक्तव्य केलं ज्यात त्यांनी वासन यांच्यावर आरोप केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वासन ह्याने व्हीडियो शूट करून सोशल मीडिया वर व्हायरल केला आणि लोकांना डोनेशन देण्यासाठी विनंती केली!

 

 

या डोनेशनच्या माध्यमातून वासन यांच्या पर्सनल बँक अकाऊंट मध्ये २० ते २५ लाख जमा झाल्याची माहिती मिळाली असून त्यापैकी केवळ २ लाख रुपयेच वासन ह्यांनी कांता प्रसाद यांना दिले आहे असे कांता प्रसाद ह्यांनीच सांगितले आहे!

वासन ह्यांनी सगळे पैसे कांता प्रसाद यांच्या अकाऊंट ला ट्रान्सफर केल्याचं देखील स्पष्ट केलं आणि या सगळ्या प्रकरणाबाबतच कांता प्रसाद ह्यांनी पोलिसात वासन यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे!

 

 

दुसऱ्या दिवशी जेव्हा ‘बाबा का ढाबा’ च्या कांता प्रसाद शी बोलताना त्यांनी असं सांगितलं की, “आज पूर्ण भारत आमच्या सोबत आहे असं वाटतंय.”

लोकांना एकत्र आणणे म्हणजे सोशल नेटवर्क. फक्त जोक्स फॉरवर्ड करणे आणि एकमेकांना चॅलेंज करणे म्हणजे सोशल नेटवर्कचा, वेळेचा अपव्यय करणे आहे.

काही लोकांना असा सुद्धा गैरसमज होईल की, ते बाबा रडले म्हणून किंवा ते वयस्कर आहेत म्हणून त्यांना इतका प्रतिसाद मिळाला.

पण, तसं नाहीये. बाबांना प्रतिसाद मिळाला तो त्यांच्यातील सच्चेपणामुळे, कमी किमतीत चांगलं अन्न देण्याच्या वृत्तीमुळे आणि परिस्थिती समोर हात टेकून कोणतं विपरीत पाऊल न उचलण्यामुळे. नशीब पण त्यांचं बदलतं जे मेहनत घेत असतात.

तुम्ही पण जर का स्वतःच्या बिजनेस ला प्रमोट करण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करण्यासाठी विचार करत असाल तर आम्ही काही टिप्स सांगत आहोत :

 

१. योग्य प्लॅटफॉर्म निवडा :

 

 

तुमच्या बिजनेस च्या टार्गेट कस्टमरला डोळ्यासमोर ठेवून इन्स्टाग्राम, फेसबुक, youtube यापैकी कुठे जास्त वावरत असतील याचा अंदाज घ्या आणि मग तिथे तुमचा बिजनेस विडिओ स्वरूपात प्रमोट करा.

कारण, वाचण्याचा मोह काही जण टाळतील, पण विडिओ वर क्लिक करण्याचा मोह खूप कमी जण टाळतात. बिजनेस च्या सुरुवातीला फेसबुक प्रमोशन्स हे आजही एक्सपर्ट रिकमेंड करतात.

 

२. बिजनेस पेज ला active ठेवा :

 

 

एखादी व्यक्ती तुमच्या बिजनेस पेज ला visit करत असेल तर त्याला तुमची शेवटची पोस्ट एक आठवड्यापेक्षा जुनी आहे हे दिसू नये याची काळजी घ्या. रोज काहीतरी पोस्ट करत चला.

तुमचं दुकान सुरू आहे हे सांगण्याची ती एक पद्धत आहे. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक मेसेज, कॉमेंट ला रिप्लाय द्या. तुमचे followers वाढवा आणि मग तुम्हाला त्यांना कस्टमर मध्ये कन्व्हर्ट करणं सोपं असेल.

 

३. कन्टेन्ट वर फोकस करा :

 

 

तुमच्या पोस्ट मधील फोटो, विडिओ पेक्षा कन्टेन्ट हा लोकांच्या लक्षात असतो. तो जास्तीत जास्त पॉवरफुल असेल हे बघा. अधूनमधून स्किम्स, प्रमोशन देत जा.

सोशल मीडिया मधील सेलेब्रिटी शोधून त्यांच्याकडून स्वतःला कसे प्रमोट करता येईल हे बघा. तुमचं नेटवर्क वाढेल आणि पर्यायाने कस्टमर्स सुद्धा.

 

४. लाईव्ह जा :

 

 

सध्या तर हे फार गरजेचं आहे. कारण, लोकं एकमेकांना भेटू शकत नाहीयेत. जितकं आपण समोर येऊन आपल्या बिजनेस बद्दल बोलू, लोकांचा इंटरेस्ट वाढेल.

तुमच्या लाईव्ह सेशन्स बद्दल स्टोरी मध्ये माहिती आणि लिंक द्या. लोक ते बघतात, यात सर्वात चांगला रिस्पॉन्स मिळतो तो इन्स्टाग्राम स्टोरी ला. त्याला दुर्लक्षित करू नका.

 

५. सतत मागे लागू नका :

 

 

आपण कोणती ऍड रोज दिसत असेल तर एक दिवशी कंटाळा येऊन ते पेज unfollow करतो. आपल्यासोबत ते होणार नाही हे बघा. कमीत कमी प्रमोशन मध्ये जास्त इम्पॅक्ट कसा करता येईल त्यावर फोकस करा.

तुमचे विडिओ, जाहिरात हे eye pleasing असावेत. सुरुवातच मोठ्या आवाजाने होणार नाही याकडे लक्ष द्या.

‘बाबा का ढाबा’ च्या उदाहरणाने आपण एक दिलासा घेऊ शकतो की, आपल्याकडे लोकं आहेत, मार्केट आहे. गरज आहे ती त्यांच्या समोर योग्य पध्दतीने सादर होण्याची आणि quality maintain करण्याची.

या सर्व टिप्स आमलात आणल्या तर आपल्या बिजनेस ला नक्की उभारी मिळेल. शुभेच्छा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version