' ऑईली स्किन लपवण्यापेक्षा “ह्या” घरगुती उपायांनी आपले सौंदर्य परत मिळवा! – InMarathi

ऑईली स्किन लपवण्यापेक्षा “ह्या” घरगुती उपायांनी आपले सौंदर्य परत मिळवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

थोडेफार फिरल्यानंतर त्वचा तेलकट आणि चिकट होणे ही समस्या तुमच्या-आमच्यापैकी बऱ्याच जणांची असेल. भारताच्या दमट हवामानामुळे हा त्रास अजूनच मोठा वाटतो.

त्वचेवर साचणाऱ्या तेलामुळे चेहऱ्यावर फोड येतात. त्यामुळे चेहरा विद्रूप वाटू लागतो. यावर बाजारातील सौंदर्यप्रसाधन वापरून केलेले बरेच उपाय फोल ठरतात किंवा त्यांची उलट प्रतिक्रिया दिसते.

पण काही सोपे उपाय करून आपण तेलकट त्वचेच्या समस्येवर मात करू शकतो.

सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे आहे कि काहीजणांची त्वचा इतरांच्या तुलनेत तेलकट का असते?

मुळात काहीजणांच्या त्वचे मध्ये सिबॅकस ग्रँड मधून सीबम ऑईल जास्त प्रमाणात स्त्रवले जाते. ही ग्रँड त्वचेच्या पृष्ठभागाच्या खालीच असते.

शरीरातील स्निग्ध द्रव्यांपासून सीबम ऑईलची निर्मिती होते. सीबम ऑईल हे हानिकारक नसून शरीर याची निर्मिती त्वचेवरील ओलावा टिकवण्यासाठी आणि आणि केस चमकदार ठेवण्यासाठी मदत करते.

चिकट त्वचा आणि तारुण्यपिटीका यांवर इलाज करणे कठीण तर आहे पण काही घरगुती उपाय करून आपण ही समस्या दूर करू शकतो.

 

चेहरा धुणे :

 

manisha koirala inmarathi

 

तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असो चेहरा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. धुळ, सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया हे दररोज आपल्या चेहऱ्यावर जमा होतात.

त्यात जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हे चेहऱ्यावर चिकटून राहतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर फोड येतात. म्हणून दिवसातून किमान दोन वेळा तरी चेहरा धुणे गरजेचे आहे.

सतत चेहरा धुणे ही ही चुकीचे आहे त्यामुळे चेहऱ्यावरील ओलावा नष्ट होऊन चेहरा खरखरीत होतो. चेहरा धुताना चांगल्या साबणाचा वापर केला पाहिजे. उदा. ग्लिसरीन सोप.

 

ब्लोटिंग पेपर्स :

 

blotting paper inmarathi

 

हे ब्लोटिंग पेपर्स फक्त सीबम ऑईल ची निर्मितीथांबवत नाही परंतु या ब्लॉटिंग पेपरचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल शोषून घेतले जाते.

ब्लोटिंग पेपर्स हे महागडे नसतात आणि कोणत्याही ही मेडिकलमध्ये उपलब्ध होतील. जेवढे गरजेचे असतील तेवढ्याच ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा.

 

कोरफड :

 

alovera.jpg inmarathi

 

कोरफडीचा आपल्या शरीरावर सर्वांगाने फायदा होत असतो. त्वचा स्वच्छ करण्यासाठी तसेच याच्या अर्काचा रस प्यायल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.
कोरफड हे उत्तम अँटीसेप्टीक आहे.

कोरफड चेहऱ्यावरच्या बॅक्टेरियाना दूर करते आणि चेहऱ्यावरील सीबम ऑईल चे प्रमाण कमी करते. दररोज रात्री झोपताना तुम्ही कोरफडीचा अर्क चेहऱ्याला लावा आणि सकाळी धुऊन टाका.

संवेदनशील त्वचेला कोरफडीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोरफड चेहऱ्याला लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनगटाला लावून पहा.

जर २४ ते ४८ तासात तुम्हाला त्यामुळे कोणतीही ॲलर्जी झाली नाही तरच ती चेहर्‍यावर लावा.

तुम्हाला एलोवेरा जेल बाजारात सहज मिळून जाईल किंवा तुम्ही कोरफडीचे झाड घरी आणू शकता जे अगदी स्वस्त दरात मिळेल.

 

जजोबा ऑइल :

 

jojoba oil inmarathi

 

तेलयुक्त त्वचेवर उपचारासाठी तेल लावणे फायद्याचे ठरेल का? जर तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही.

तेलकट त्वचेवर तेल लावणे फायद्याचे ठरते असे बघितले गेले आहे. अनेक तेल हे विटामिन्स, मिनरल्स आणि जळजळ दूर करणारे असतात. त्यामुळे स्कीन रूटीनमध्ये तेलांचा समावेश करणे फायद्याचे आहे.

तेलकट त्वचेसाठी जजोबा ऑइल गुणकारी आहे. भले ते तेलांच्या जातीत मोडत असले तरी मेणासारखे असते.

तेलाच्या तुलनेत ते हलके असते आणि आणि चेहऱ्याला रोज लावल्यामुळे ते सीबम ऑईल ऑइल ची अतिरिक्त निर्मिती थांबवते. तुम्हाला जजोबा ऑइल ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर किंवा तुमच्या नजीकच्या बाजारात सुद्धा मिळेल.

हे तेल तुम्ही जेरेनियम ऑइलसोबत मिश्रण करून सुद्धा लावू शकता.

२०१२ च्या अभ्यासात असे दिसून आले आहे बाजारात उपलब्ध असणाऱ्या हीलींग क्ले म्हणजेच मुलतानी माती आणि जजोबा ऑइल यांचे मिश्रण करून आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा लावले तर तुमच्या चेहऱ्यावरील तेलाचे प्रमाण कमी होते आणि तारुण्यपीटिकाची समस्या काही प्रमाणात कमी होते.

थोड्याशा प्रमाणात घेतलेले जजोबा ओईल तुम्हाला फायदा मिळवून देईल पण हे अतिरिक्त प्रमाणात वापरले तर याचा तोटा देखील होऊ शकतो.

त्यामुळे चेहऱ्यावर लावताना याचे अगदी काही थेंब घेतले पाहिजे.

 

ओटमील आणि मध :

 

oatmeal honey inmarathi

 

ओटमील आणि मध हे फेस मास्क म्हणून लावले तर चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. दोघांमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे चेहेऱ्याची जळजळ कमी होते.

मधामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया दूर होतात. ओटमिल चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते तर मधामुळे तुमच्या त्वचेवर लाल डाग पडत नाहीत.

दोघांचा एकत्रित वापर केला तर चेहर्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

 

काकडी :

 

cucumber-inmarathi

 

काकडीमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट, विटामिन ए आणि मॅग्नेशियम असतात. तसेच काकडी ही चेहऱ्याच्या होणाऱ्या जळजळीवर फायदेशीर आहे म्हणून काकडीला कूलिंग एजंट म्हटले जाते.

काकडी, अंड्यातील पांढरा भाग आणि आणि थोड्याशा लिंबाच्या रसाचे मिश्रण करून ते चेहऱ्यावर लावावे.

१५ ते ३० मिनिटासाठी तसेच ठेवून द्यावे. यामुळे चेहऱ्यावरील तेल नाहीसे होते. काकडी मुळे चेहऱ्यावरील तारुण्यपिटिका नाहीशा होतात.

 

एप्पल साइडर विनेगर :

 

apple cider inmarathi

 

 

एप्पल साइडर विनेगरमध्ये अल्फा हायड्रोसिल ॲसिड असते ज्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा दूर होते तसेच सीबम ऑईल सुद्धा निघून जाते.

जर तुम्ही एप्पल साइडर विनेगर खरेदी करणार असाल तर ते ऑरगॅनिक आहे का याची खात्री करावी. एप्पल साइडर विनेगरमध्ये ऍसिड असतात. त्यामुळे त्याचे डायल्यूट वर्जन चेहऱ्यावर लावणे गरजेचे असते.

एक चमचा एप्पल साइडर विनेगर हे तीन ते चार चमचे पाणी टाकून शिथिल केले पाहिजे आणि मग चेहऱ्यावर लावावे.

हे लक्षात घ्या!

जर तेलकट त्वचा अनुवंशिकतेमुळे असेल तर त्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे अवघड असते. बाजारातील अनेक प्रोडक्ट्स यावर उपाय असल्याचा दावा करतात पण त्याचा वेगळा त्रास होण्याची संभावना टाळता येत नाही.

म्हणून आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक घरगुती उपाय सांगितले आहेत. जर वरील दिलेल्या कुठल्याही उपायामुळे तुम्हाला त्रास झाला तर त्वरित तो उपाय थांबवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?