Site icon InMarathi

श्रीमंत होण्याची इच्छा आहे ना? जाणून घ्या “श्रीमंतांची सिक्रेट्स”…!

ambani family im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

श्रीमंत होणे ही प्रत्येकाची इच्छा असते. फार कमीजण त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत असतात आणि त्यांचं ध्येय ते साध्य करत असतात. श्रीमंत होण्यासाठी तुमची विचारसरणी क्लिअर असणे हे फार गरजेचं असते.

थोडं जरी confusion असेल तर तुम्ही ते लक्ष्य गाठण्यापासून वंचित राहू शकता. या मार्गावर चालत असताना एक विचार पक्का असणं फार गरजेचं आहे तो म्हणजे, “पैसे का काम तो पैसा ही करता है”.

 

 

जेव्हा हे क्लिअर असतं तेव्हा आपण अगदी focused असतो. ज्यांचा फोकस जितक्या लवकर क्लिअर होतो, तितकी ती व्यक्ती श्रीमंत होते. आपल्यात आणि श्रीमंत व्यक्तीत फरक फक्त या विचारांचा असतो.

बाकी २४ तास त्यांच्या कडेही आहेत आणि आपल्याकडेही आहेत. नैसर्गिक अडचणी ज्या आपल्याला असतात, त्या त्यांना सुद्धा असतात.

श्रीमंत होण्यासाठी काही विशिष्ट सवयी आपल्या आचरणात आणाव्या लागतात. कोणत्या आहेत त्या सवयी? जाणून घेऊयात :

१. स्वतःला प्रश्न विचारणे :

श्रीमंत होणाऱ्या व्यक्ती सतत स्वतःला प्रश्न विचारत असतात. त्यांच्या आजूबाजूला सुद्धा असेच लोक असतात जे त्यांना चॅलेंज करत असतात.

केवळ कौतुक करणारे लोक जर का आजूबाजूला असतील तर आपण चुकीच्या मार्गावर चालताना आपल्याला कोणी सांगणारच नाही. त्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल तर, खरा फीडबॅक देणारे लोक आजूबाजूला असणं अत्यंत आवश्यक आहे.

२. भविष्याकडे नजर :

श्रीमंत लोक हे कायम नवीन ट्रेंड्स कडे लक्ष ठेवून असतात. कोणत्या वस्तूंची मागणी वाढत आहे, कोणती वस्तू outdated होत आहे हे त्यांना नेहमीच माहीत असतं आणि त्यानुसार ते पावलं उचलत असतात.

 

 

याचं ताजं उदाहरण द्यायचं म्हणजे मुकेश अंबानी सर. इंटरनेट, ऑनलाईन ऑर्डर, OTT हा सगळा ट्रेंड बघून त्यांनी Jio ब्रँड सुरू केला आणि आज त्याच्या सोबतच त्यांनी E-कॉमर्स मध्ये पाय रोवले आहेत.

अजूनही काही बदल येणाऱ्या काळात आपल्याला दिसतील. तर हे लोक त्यांचं लक्ष्य कायम ठेवून वेगवेगळे पर्याय ट्राय करत असतात. वॉरेन बफेचं खूप छान वाक्य आहे यावर, “तुम्ही आज झाडाखाली बसू शकता, कारण कोणी तरी ते झाड लावलं.”

३. Outsourcing :

ज्या कामातून तुम्हाला कोणतंही आर्थिक earning नाहीये, ती कामं इतरांना करायला द्या. श्रीमंत होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट हे अंगातच असावं लागतं.

 

 

सकाळी उठल्यावर आज कोणतं कामं मी outsource करू शकतो हे बघा आणि स्वतः तुम्हाला प्रॉफिट करून देणाऱ्या गोष्टींवर फोकस करा.

Outsource करणं शक्य नसेल तर निदान त्यांच्या मागे तुमचा किती वेळ चालला आहे हे सतत चेक करत रहा.

४. आरोग्याचं महत्त्व :

श्रीमंत व्हायचं म्हणजे २४ तास फक्त कामच करणे असं नाही. तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे तुमचं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे. नियमित व्यायाम करत असाल तर तुम्ही जास्त काम करायला फिट राहाल. त्याबद्दल एक छान वाक्य आहे, “Good health attracts good wealth.”

 

 

५. हेल्दी फूड :

खाण्याचा आणि श्रीमंत होण्याचा काय संबंध? असा प्रश्न पडू शकतो. रोज बाहेरचं जंक फूड खाण्यापेक्षा घरी तयार केलेलं सकस आहार घेतल्यास तुमची तब्येत तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल.

 

 

तुम्हाला जर का तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर चांगले रिटर्न्स पाहिजे असतील तर आधी स्वतःवर इन्व्हेस्ट करा आणि नंतर येणारा मेडिकल बिलचा खर्च कमी करा.

६. कमीतकमी खरेदी :

वॉरेन बफे यांचं वाक्य यासाठी प्रचलित आहे, “If you buy things you don’t need, you will soon sell things you need.”

 

 

ह्याचा अर्थ अगदीच काटकसर करून जगा असा नाहीये, खर्च करताना आवश्यक की अनावश्यक याचं उत्तर स्वतःला द्या. श्रीमंत लोकांच्या डोक्यात luxury वस्तू कोणती आणि essential वस्तू कोणती हे अगदी क्लिअर असतं.

चांगले घर, गाड्या या त्यांच्याकडे असतील. पण, त्या स्टेटस टिकवण्यासाठी. दैनंदिन जीवनात त्यांचा कल नेहमी गरजा कमी करण्याकडे असतो.

७. वाचनासाठी वेळ :

व्यायाम करण्याचं जे महत्व शरीरासाठी आहे तेच महत्व वाचनाचं मनासाठी आहे. तुमच्यात जर का चांगल्या विचारांचं इनपुट होत नसेल तर आउटपुट कसं चांगलं असणार?

 

 

वाचन हा चांगल्या विचारांचा स्रोत आहे. अगदीच वेळ नसेल तर आता ऑडिओ बुक्सचा सुद्धा पर्याय उपलब्ध झाला आहे.

८. टिव्ही आणि सोशल मीडिया वापर नियंत्रित ठेवा :

श्रीमंत व्यक्ती या दिवसातून एक तासाच्या वर टिव्ही बघत नाहीत असं एका अभ्यासातून समोर आलं होतं. टिव्ही समोर असणं म्हणजे तुमच्या मनात येणाऱ्या creative विचारांना ब्रेक लावून दुसऱ्यांच्या creative गोष्टींना मनात स्थान देणं असं मानलं जातं.

 

 

या साधनांचा वापर करून थोड्या वेळासाठी मनोरंजन मिळवणं हे वेगळं आणि तासंतास त्यांना देणं हे वेगळं. “तुम्ही त्यांना वापरत आहात की, ते माध्यम तुम्हाला ?” हे सतत स्वतःला विचारा.

९. लवकर उठण्याची सवय :

जितक्या लवकर तुम्ही सकाळी उठाल तितका स्वतःला अधिक वेळ देऊ शकाल. रात्री जागून काम पूर्ण करणे आणि सकाळी लवकर उठून तेच काम करणे यात नेहमी दुसरा पर्याय निवडा.

 

 

सकाळच्या वेळी तुम्ही स्वतःला दिवसभराच्या दगदग, स्ट्रेस साठी तयार करता. गोष्टींना सामोरं जायची तुमची शक्ती यावेळात वाढत असते.

१०. To-Do लिस्ट :

“आज मला खूप कामं आहेत” असं नुसतं म्हणून काम होत नाहीत. त्यासाठी एक यादी असणं आवश्यक आहे. एका अभ्यासात हे निदर्शनास आलं होतं की, ८०% श्रीमंत लोक हे To-Do लिस्ट मेंटेन करत असतात.

 

 

श्रीमंत होण्यासाठी आणि ती श्रीमंती टिकवण्यासाठी ही सवय अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे.

११. Keep it simple :

बऱ्याच वेळेस आपणच गोष्टी खूप complicated करून ठेवत असतो. कोणत्याही प्रॉब्लेम वर सोल्युशन तेव्हा मिळत असतं जेव्हा तुम्ही त्याला सिंपल करतात.

 

 

 

श्रीमंत लोक हे प्रॉब्लेम define करताना त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टी कट करतात आणि मुख्य प्रॉब्लेम वर उपाय शोधून तो सोडवतात.

१२. नात्यांची जपणूक :

श्रीमंत लोक हे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला महत्वाचं मानतात. ते त्यांच्या लहान मुलांना सुद्धा वेळ देतील आणि त्यांना त्यांच्यासारखा विचार करायला शिकवतील.

“Don’t fish for him, teach him how to fish.” हे ते लोक लहानपणापासूनच आमलात आणतात.

 

 

त्यांचे मित्र, त्यांच्याकडे काम करणाऱ्या, काम सोडून गेलेल्या व्यक्ती, जुन्या ऑफिसमधील बॉस प्रत्येकासोबत ते चांगले संबंध टिकवतात. ठराविक लोकांना ते वाढदिवसाच्या दिवशी फोन करतात. फक्त मेसेज करत नाहीत.

ही पण एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही फोन केलात तर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या लक्षात राहता. जरी ते कोणत्या सोशल प्लॅटफॉर्म वर active नसले तरीही त्यांचं प्रोफेशनल नेटवर्क हे स्ट्रॉंग असतं. त्यामुळेच त्यांची कामं पटापट होतात.

श्रीमंत होण्यासाठी जर का तुम्ही या सवयी आत्मसात केल्या तर तुमच्यासाठी एक राजमार्ग तुम्ही स्वतःच तयार करू शकता.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version