आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कुत्रे विनाकारण गाडीच्या मागे धावतात हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवले असेल. हे बघितल्यानंतर त्यांच्या या वागण्याकडे बघून तुम्हाला हसू आले असेल किंवा तुमची पंचायत देखील झाली असेल पण.
एक प्रश्न मात्र सर्वांच्याच मनात राहून गेला असेल कुत्रे नेमके असे का करतात? कुत्र्यांच्या या विक्षिप्त वागण्याचा बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत.
कुत्र्यांच्या या वागण्यामागे अनेक कारणे आहेत आपल्याला ती सर्व समजून घेणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे गल्ली क्रिकेट मध्ये एका ठराविक सीमेच्या बाहेर चेंडू जाता कामा नये असे ठरले असते त्याच प्रमाणे कुत्र्यांमध्ये सुद्धा एका ठराविक सीमेपलीकडे जाता येत नाही.
कारण पुढे दुसऱ्या कुत्र्याची जागा ठरलेली असते. आपल्या सीमा रेषेतील झाडांवर भिंतीवर व तेथील गाड्या यांवर कुत्रे मूत्रविसर्जन करतात. यावरून त्यांना स्वतःची व इतर कुत्र्यांची हद्द कळत असते.
त्यांच्या जागेमधून अजून एखादी अनोळखी गाडी गेली तर तिच्या अनोळखी गंधामुळे कुत्रे तिचा पाठलाग करण्यास आणि तिच्यावर भुंकण्यास उद्युक्त होतात.
कुत्रे हे निसर्गतः जिज्ञासू प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे एखादी अनोळखी गाडी बाजूने गेल्यावर त्यांची जिज्ञासा वाढू लागते आणि त्यापोटी ते वाहनांचा पाठलाग करतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कधीकधी वाहकांच्या आलेल्या वाईट अनुभवामुळे ते असे करतात तर कधी कुत्र्यांना एकटे वाटू लागले तर ते वेळ घालवण्यासाठी रस्त्यातील वाहनांवर किंवा वाटेकरूवर भुंकतात.
वाहनांवर लाइट्स असतात. तसेच वाहने चालू झाल्यावर आवाज येतो. त्यामुळे कुत्र्यांना वाहने सजीव असल्याचा भास होतो. वाहनांतून येणारा आवाज त्यांना एखाद्या प्राण्याच्या गुरगुरण्यासारखा वाटतो.
त्यामुळे ते वाहनांवर भुंकतात. तसेच वाहनांची चाके सतत गरगर फिरत असतात. त्यांच्या या हालचालीमुळे कुत्र्यांना ते सजीव वाटतात आणि त्यावर भुंकू लागतात.
कुत्रे संरक्षण करण्यासाठी ओळखले जातात म्हणून त्यांच्या जागेत आलेल्या अनोळखी लोकांवर किंवा प्राण्यांवर स्वतःचे आणि त्यांच्या स्टोळीचे रक्षण करण्यासाठी भुंकतात.
–
- कुत्र्यांपासून जरा ‘बचके’ रहना : अत्यंत धोकादायक कुत्र्यांच्या या ८ जाती
- कुत्रे या गूढ पुलावरून उडी मारून एका झटक्यात संपवतात आपले आयुष्य!
–
कुत्र्यांच्या वागण्या मागचे कारण तुम्हाला रंजक वाटले असेल पण जर अशा घटना तुमच्या बाबतीत घडली तर नक्कीच कपाळावर घाम फुटल्या वाचून राहणार नाही.
त्यामुळे जर कुत्रे पाठी लागले तर काय करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
जर कुत्रे मागे लागण्याचा प्रसंग तुमच्या बाबतीत ओढावला तर बाजारात येणारे एक छोटे यंत्र यावर उत्तम उपाय आहे.
ज्यामधून खूप मोठा आवाज निर्माण होतो जो माणसांना ऐकू येत नाही पण हा आवाज कुत्र्यांना आवडत नाही ज्यामुळे कुत्रे तुमच्या मागे लागणार नाही.
बाईक चालवणाऱ्यांना बऱ्याचदा कुत्रे मागे लागण्याचा त्रास होतो त्यामुळे ते अशा पद्धतीचे यंत्र जवळ बाळगू शकतात.
कुत्र्यांना पाणी आवडत नाही त्यामुळे बाईक चालवणाऱ्या ड्रायव्हरने एका पाण्याची स्प्रे बॉटल जवळ बाळगली पाहिजे. चेहऱ्यावर फवारलेले पाणी कुत्र्यांना आवडत नाही त्यामुळे असे केल्यानंतर ते तुमच्या मागे लागणार नाही.
गाडीचा ड्रायव्हरने अशा कुत्र्यांपासून सावध राहिले पाहिजे. कुत्र्यांना हार्ड ब्रेकिंगचा आवाज आवडत नाही. त्यामुळे अशा आवाजावर सतत भुंकून ते थकतात आणि निघून जातात.
पण ही युक्ती तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला कुत्रे दिसत असतील किंवा ते गाडीच्या मागे धावत असतील. चाकांच्या घर्षणामुळे येणाऱ्या आवाजामुळे कुत्रे घाबरतात ज्यामुळे ते पाठलाग करणार नाहीत.
पहिल्यांदा असे केल्यावर ते पाठलाग सोडणार नाहीत पण दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत मात्र ते नक्कीच माघार घेतील. जर दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा त्याच जागेवरून गाडी नेली तर कुत्रे पाठलाग करतील पण एकदाच हार्ड ब्रेकिंग चा आवाज त्यांना घाबरवण्यासाठी पुरेसा असेल.
पाळीव कुत्र्याने असे करण्यापूर्वीच दक्षता घेण्याच्या गोष्टी :
तुमच्या कुत्र्याला धावण्यासाठी उद्युक्त करू नका. याऐवजी त्यांना कामासाठी इनाम द्या. त्यांच्या नावानेच त्यांना बोलवा. जेणेकरून त्या नावाची त्यांना सवय होईल.
अगदी पहिल्याच वेळी तुम्ही हाक मारल्यावर तो येईलच असे नाही. पण सतत सवय झाल्यामुळे त्याला त्या शब्दाची सवय होईल आणि आणि हा शब्द मालक आपल्याला पुकारण्यासाठी बोलतो याची जाणीव होईल.
त्यांना आदेश द्या. उदा. ऊठ-बस शेक हॅन्ड. जर ते हे करत नसतील तर त्यांना थांबणे सांगा. दररोज हे केल्याने या आदेशाची त्यांना सवय होईल.
या आदेशांचे पालन केल्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून काहीतरी खाऊ द्या. जेणेकरून त्यांना कळेल की आपण योग्य काम केले आहे.
तुमच्या मित्राला सायकल किंवा गाडी घेऊन यायला सांगा. जर गाडी चालवल्यानंतर कुत्रा मागे पळत असेल तर त्याला ‘स्टॉप’,‘लिव्ह’ असे आदेश द्या. हे आदेश खूप ठामपणे देणे गरजेचे आहे.
या गोष्टीचा सराव रोज करा जोपर्यंत तुमचा कुत्रा गाड्यांच्या मागे धावणे शंभर टक्के बंद करत नाही. आदेशाचे पालन केल्यानंतर त्याला बक्षीस द्यायला विसरू नका.
–
- भूतदया म्हणून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताय, एका गंभीर प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करताय
- कुत्रा पाळा….हृदयरोग टाळा..!
–
पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा असणे गरजेचे आहे. जर त्या कुत्र्याला पुरेसा सराव मिळाला नसेल तर अशावेळी कुत्र्यांच्या गळ्यातील पट्टा त्यांना गाड्यांच्या मागे रोखण्यापासून तुम्हाला मदत करू शकतो.
दररोज तुमच्या कुत्र्याबरोबर बाहेर फिरण्यासाठी जा. त्याच्या बरोबर खेळा जेणेकरून कुत्र्याला आलेला कंटाळा दूर होईल आणि आणि तो गाड्यांच्या मागे धावण्यासाठी प्रवृत्त होणार नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.