' घरात हिरवळ फुलवणं खूप सोपं आहे… या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा… – InMarathi

घरात हिरवळ फुलवणं खूप सोपं आहे… या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हल्ली गार्डनिंगचा ट्रेंड आपल्याला खूप पाहायला मिळतो आणि ती गरजेचा सुद्धा आहे. याचं कारण तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, एकच घोषवाक्य आठवते, झाडे लावा झाडे जगवा.

अगदी लहानपणापासूनच हा नारा आपल्याला तोंडपाठ झालेला आहे. यामागे दडलेलं कारण आपणा सर्वांना माहित आहेच ते म्हणजे झाडे ऑक्सिजनचे उत्सर्जन करतात जो सजीवांसाठी प्राणवायू म्हणून ओळखला जातो.

 

gardening-inmarathi

 

थोडक्यात सांगायचं झालं तर, माणसांचं जीवन झाडांवरच अवलंबून आहे म्हणून जर सर्वांनीच गार्डनिंगचा ट्रेंड फॉलो केला तर ते आपल्याच फायद्याचे आहे. पण, गार्डनिंग करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

आज आम्ही याच्या विषयी तुम्हाला माहिती देणार आहोत.

गार्डनिंग साठी योग्य झाडांची निवड

जर तुम्ही एखाद्या नवीन झाडाची लागवड अंगणात करत असाल तर थांबा! सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या झाडाला वाढण्यासाठी तुमच्या अंगणात असलेली माती पूरक आहे का?

झाडांची योग्य वाढ ही त्यांना पूरक असलेल्या मातीमध्ये होते. थोडक्यात सांगायचे झाले तर निवडुंगाला कमी पाण्याची गरज असल्यामुळे वाळवंटातील वाळू त्याच्यासाठी पोषक आहे तर भाताच्या पिकाला काळी भुसभुशीत माती लागते.

 

gardening2-inmarathi

 

जर आपल्या अंगणात नेमकं कोणतं झाड लावावं याचा अंदाज बांधण्यासाठी एक सोपा उपाय तुम्ही करू शकता. तुमच्या शेजारच्यांच्या अंगणात कोणत्या झाडांची वाढ नीट झाली आहे यावरून तुम्ही तुमच्या अंगणात गार्डनिंगसाठी झाडांची निवड करू शकता.

झाडांना मुबलक जागा

अंगणामध्ये झाडे लावताना हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की दोन झाडांमध्ये पुरेसे अंतर आहे का? जर तुम्ही ही खूप जवळ झाडे रुजवली तर त्यांच्यातील काही मरून जाण्याची शक्यता आहे.

तसेच त्यांना अधिक पाण्याची आणि आणि खतांची गरज लागेल. जवळजवळ लावलेल्या झाडांमुळे त्यांमध्ये रोग संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे झाडे लावताना त्यांमध्ये पुरेसं अंतर ठेवणे गरजेचे आहे.

 

gardening1-inmarathi

 

नवीन झाडांची अधिक काळजी घेणे

ज्याप्रमाणे घरातील नवीन बाळाच्या देखभालीसाठी सगळे लोक विशेष लक्ष देतात त्याप्रमाणे जर अंगणामधील नवीन झाडाची जास्त काळजी घेणे गरजेचे असते.

 

handling-a-plant-inmarathi

 

त्याला योग्य वेळेत खत पाणी घालणे तर गरजेचे आहे. पण एका गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

अनेकजण त्या रोपट्याची किंवा झाडाची एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत रुजवण करताना काही लोक झाडाच्या खोडाला पकडून कुंडीतून काढण्याचा प्रयत्न करतात पण असे करताना झाडाला इजा पोहोचू शकते ते मरू शकते हे लक्षात घेतले पाहिजे.

नवीन उपकरणांचा वापर

काळानुसार अपग्रेड झालं पाहिजे हे तुम्ही सातत्याने ऐकत असाल. गार्डनिंगच्या बाबतीत सुद्धा हे सूत्र लागू होते.

बाजारात अशी बरीच उपकरणे आहेत ज्यांच्या सहाय्याने गार्डनिंग सहज होते. तुम्हीसुद्धा या उपकरणांचा वापर करून तुमच्या अंगणात उत्तम गार्डनिंग करू शकता.

 

gardening-instruments-inmarathi

 

मुळे भिजवणे आवश्यक

कोणत्याही नवीन मातीमध्ये झाड किंवा एखादे रोप लावण्याआधी त्याची मुळे भिजवून घेणे आवश्यक असते. जमिनीतून उपयुक्त पोषक द्रव्य आणि जीवनसत्व मिळवण्यासाठी मुळांची वाढ होणं आवश्यक आहे. त्यासाठीच ही मुळे भिजवून घेणे गरजेचे असते.

नावाच्या पाट्या

जर तुम्ही पहिल्यांदाच गार्डनिंग करत असाल तर तुम्ही लावलेलेझाड कोणत्या जातीचे आहे हहे विसरण्याची शक्यता आहे. यासाठीच हा सोपा उपाय आहे. रुजवलेल्या झाडांजवळ त्यांच्या नावाच्या पाट्या रोवल्या तर त्या झाडाला ओळखण्यास तुम्हाला मदत होईल.

 

plant-names-inmarathi

 

आवश्यक तेवढेच पाणी देणे

भले आपण झाडांची लागवड करून निसर्ग वाचवण्यात योगदान देत असू तरी झाडे ही मानवनिर्मित गोष्ट नसून निसर्गाची देण आहे. झाडांची बनावट निसर्गाने अशा पद्धतीत केली आहे की ते स्वबळावरच जमिनीतील त्यांना आवश्यक असलेले पोषकद्रव्य, जीवनसत्वे शोषून घेऊ शकतात.

त्यासाठी त्यांना सतत पाणीपुरवठ्याची गरज नसते. फक्त दुष्काळाच्याप्रसंगी झाडांना जमिनीतून पुरेसे पाणी मिळत नाही आणि आणि ती मरतात.

मातीत पुरेसा ओलावा आहे की नाही ही हे जाणून घेण्यासाठी जमिनीत दोन इंचांपर्यंत बोटे रोवा; जर माती खूपच कोरडी असेल तर पाणी घाला.

 

watering-a-plant-inmarathi

 

पण तुम्ही ही कुंड्यांमध्ये रोपट्यांची लागवड केली असेल तर तुम्हाला सातत्याने पाणी घालणे आवश्यक आहे. कारण अशा रोपट्याच्या मुळाना पसरण्यासाठी, क्षार आणि पोषकद्रव्य मिळवण्यासाठी खूप कमी जमीन उपलब्ध असते.

अशा झाडांना रोज पाणी घालणे अत्यावश्‍यक असते.

खत

वर सांगितल्याप्रमाणे निसर्गाने झाडांची बनावट अशा पद्धतीने केली आहे तिथे स्वबळावर जमिनीतील पोषक द्रव्ये आणि क्षार शोषून घेऊ शकतात. परंतु जमिनीची गुणवत्ता काळानुसार कमी झालेली आहे.

शहरांमधील जमीन प्रदूषित झालेली आहे. अशावेळी आपण झाडांना पोषकद्रव्ये, जीवनसत्वे खतांच्या माध्यमातून पोहोचवू शकतो.

भले जमीन सकस असेल तरी खतांचा उपयोग जमिनीची कसदार क्षमता वाढवतात आणि झाडांच्या वाढीला वेग देतात. पण ही खते योग्य प्रमाणात वापरली पाहिजेत.

 

fertilizer-inmarathi

 

जर तुम्ही रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर केला तर जमिनीची गुणवत्ता दीर्घ काळ टिकण्यास मदत होईल.

तण

गार्डनिंग करताना तुम्हाला यावर खास लक्ष द्यावे लागेल की तुमच्या अंगणात तण वाढले तर नाही? ‘तण’ ही अशी वनस्पती आहे ज्याच्यामुळे अंगणातल्या इतर झाडांची वाढ खुंटते.

 

waste-plant-removal-inmarathi

 

ही वनस्पती जमिनीतील सगळी पोषकद्रव्य शोषून घेते आणि इतर झाडांना वाढू देत नाही. त्यामुळे त्यांना वेळीच उखडून काढणे गरजेचे असते. जर तुम्ही ही पहिल्यांदाच गार्डनिंग करत असाल तर हा मुद्दा लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.

गार्डनिंग साठी काही विशेष टिप्स

काही साधे टोटके झाडांच्या वाढीसाठी मदत करू शकतात आणि तुमच्या अंगणात बहार आणू शकतात. जे अगदी स्वस्तात आणि आणि सहज उपलब्ध आहे.

दर दिवशी उरलेलं अन्न फेकून देण्याऐवजी त्याचा वापर तुम्ही झाडांसाठी खत म्हणून करू शकता. टाकाऊ पासून टिकाऊ असा हा उपाय आहे.

 

natural-fertilizer-inmarathi

 

कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स आणि ऍसिड असतात. ते झाडांच्या वाढीसाठी मदत करतात. त्यामुळे तुम्ही कॉफीचा वापर सुद्धा खत म्हणून करू शकता.

वरील दिलेल्या उपायांनी तुम्ही ही तुमच्या घराच्या अंगणात एक सुरेख बगीचा तयार करू शकता. जे तुमच्या घराची शोभा वाढवू शकते

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?