फेक सोशल मिडिया अकाऊंट : कोण? कसं? कधी? का तयार करतं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या डिमांड मुळे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय, फास्ट इंटरनेट हे अगदी कमी दरात सगळ्यांनाच उपलब्ध झाले असल्याने एकंदरच सोशल मीडिया वर येणारा ट्रॅफिक हा प्रचंड आहे.
आणि यामुळेच फेक प्रोफाईल्सचा सुळसुळाट सगळीकडेच झाल्याचं लक्षात येत आहे!
कशा बनवल्या जातात फेक प्रोफाईल्स :
सोशल मिडीया साईटस चालवणा-या मोठ्या कंपन्या असतात. त्यांची उलाढाल काही कोटीत असते. त्यामुळे त्यांना सतत सायबर एटॅकचा धोका असतो.
एकाच वेळी अनेक फेक म्हणजेच बनावट प्रोफाईल तयार केले जाऊन असा सायबर हल्ला करता येऊ शकतो. त्यावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवता यावे यासाठी नवीन प्रोफाईल करताना काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत.
त्यामध्ये सर्वांत महत्वाचं म्हणजे एका इमेलआयडीवरुन प्रत्येक सोशल मिडिया साईटवर एकच प्रोफाईल तयार करता येतं.
वरील सर्व तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन वेगवेगळ्या चांगल्या किंवा वाईट उद्देशाने हजारो प्रोफाईल्स तयार केली जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या ईमेलआयडींचा आणि नेटवर्कचा वापर केला जातो.
त्यासाठी वेगवेगळे डिव्हाईसेस (फोन, टैब, लैपटॉप) वापरली जातात. थोडक्यात हा सगळा पूर्वनियोजित शिस्तपूर्ण आणि नियोजनबद्ध कार्यक्रम असतो.
एक काळ असा होता की, प्रत्येक मुलाच्या सोशल मीडिया प्रोफाइल मध्ये ‘अँजेल प्रिया’ नावाच फ्रेंड अकाउंट असायचंच असायचं.
गंमती मध्ये मित्रांची शाळा घेण्यासाठी मुलंच अशी फेक अकाउंट उघडून एकमेकांची मस्करी करायचे.
हा झाला गंमतीचा विषय. आज सोशल मीडिया बरंच पुढारलेलं आहे.
नाही म्हटलं तरी २०१४ च्या नरेंद्र मोदींच्या लोकसभेत मिळालेल्या भरघोस यशाच्या मागे त्यांच्या कॅम्पेन टीमने सोशल मीडियाचा केलेला वापर हे एक कारण प्रकर्षाने दिसून येत.
मध्यंतरी रॅपर बादशाह आपले इंस्टाग्राम वर फॉलोवर्स वाढवायच्या नादात एका पीआर एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे वादात अडकला होता.
फॉलोवर्स वाढवणे म्हणजे काय तर फेक अकाउंट थ्रू त्याच्या फॉलोवर्सची संख्या वाढवणे. आणि विशेष म्हणजे खास या कामासाठी विशेष फर्म्स सुद्धा स्थापन झाल्या आहेत.
आता जो तो त्याच्या हिशोबाने सोशल मीडियाचा वापर करत असतो. मोस्टली त्यात ‘फायदा’ हा इलेमेंट सेंटरला असतो.
एवढंच नव्हे तर हनी ट्रॅपिंग सारख्या घटनांना अंमलात आणण्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. हनी ट्रॅपिंग, ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन फ्रॉड या बाबत सखोल माहिती घेण्यासाठी गेलं की समजत याच्या मुळाशी आहे ते ‘फेक अकाऊंट’.
नुकतंच महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ८०,००० सोशल मीडिया वरची फेक अकाउंट शोधून काढली आहेत. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याच्या हेतूने ही उघडली गेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
महाराष्ट्र पोलिसांचं हे एक उदाहरण आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सायबर गुन्हेगारांकडून हेरगिरी करण्यासाठी, व्हायरस असलेली लिंक पाठविण्यासाठी आणि आर्थिक फसवणूकीसाठी अधिक प्रमाणात केला जात आहे.
आरएसए सिक्युरिटीच्या एप्रिलच्या अहवालानुसार, २०१८ पासून सोशल मीडिया फसवणूकीत ४३% वाढ झाली आहे.
बनावट सोशल-मीडिया खात्यांमागील हेतू एखाद्या व्यक्तीस संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी फसविण्याचा किंवा मोठ्या प्रेक्षकांकडे दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याच्या उद्देशाने एखाद्या फेक व्यक्तीचा चेहरा पुढे केला जातो.
ईवाय इंडियाच्या सायबर सिक्युरिटीचे पार्टनर, बर्गेस कूपर सांगतात की –
हॅकर हॅक अकाऊंट मार्गे व्हायरस/मालवेअरने प्रभावित झालेल्या फाईल युजरला डाउनलोड करायला भाग पाडतो. ज्या कारणे त्या व्हायरसचा प्रसार हा जलदगतीने होऊ शकेल.
याची अनेक उदाहरणे आपण बघितली असतील. फेसबुकवर अनेकदा आपल्या मित्रांच्या प्रोफाइल वरून पॉर्न अथवा तत्सम अश्लील पेजेसचे लिंक शेअर झाल्याचे बघितले असेल.
ते दुसरं तिसरं काही नसून याच मालवेअरच्या संपर्कात आल्याचा परिणाम आहे.
कास्परस्काय ही सिस्टीम अँटी व्हायरस मधली एक लिडिंग कंपनी आहे. याच कंपनीच्या दक्षिण आशियायी भागाचे मॅनेजर श्रेणीक भयानी सांगतात –
२०१८ मध्ये त्यांच्या अँटी फिशिंग तंत्रज्ञानाने फसव्या सोशल मीडिया नेटवर्क पेजेसना भेट देणाऱ्या ३७ लाखाहून अधिक विझिट या ब्लॉक केल्या होत्या. आणि तब्बल ६०% फेसबुक वरील पेजेस ही फेक असल्याचे ते सांगतात.
गार्टनर या रिसर्च आणि ॲडव्हायजरी कंपनीचे प्रिन्सिपल एनलिस्ट प्रतीक भजंका सांगतात –
बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एम्बेडेड ब्राऊजर ऑफर करतात जेणेकरून वापरकर्त्याला लिंक ओपन करताना मूळ ऍप्लिकेशन सोडून जावं लागू नये.
हे अॅप-मधील ब्राऊजर वापरकर्त्यांना व्हायरसने प्रभावित वेब पेजेस वर आणू शकतात. डिव्हाईस मधले डिफॉल्ट ब्राऊजर सिक्युरिटी कारणाने या लिंक ओपन करण्याची परवानगी देत नाही.
त्यामुळे मोबाईल किंवा ब्राऊजरची सिक्युरिटी ही ब्रेक होत नाही. त्यामुळे इतर ब्राऊजर च्या माध्यमातून नको असलेले वेब पेजेस ओपन करण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे.
भारतात जर या फेक अकाऊंट बाबत बघायला गेलो तर आपल्याला वेगवेगळी कारण सापडतात. आर्थिक फसवणूक, द्वेष भावनेचे मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी तर यांचा सर्रास वापर झालेला दिसतो.
बादशाहच्या प्रकरणात दिसून आलं की पीआर एजन्सीज फेक फॉलोवर्स वाढवण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतात तसंच वर सांगितलेल्या कामांसाठी पण एजन्सीज कार्यरत असल्याचे दिसून आलेले आहे.
उत्तर प्रदेश मधली अखलाक केस, रोहित वेमुला केस, सीएए-एनआरसी आंदोलन, दीपिका-रणवीरच्या पद्मावतच्या वेळेस राजस्थान मधली जाळपोळ, महाराष्ट्रातले भीमा कोरेगावची दंगल या सारख्या अनेक घटनांच्या वेळेला जे ट्विट आणि फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आलेले ते या फेक अकाऊंटच्या माध्यमातूनचं करण्यात आले होते.
कालांतराने जेव्हा ही सगळी प्रकरण शांत झाली तेव्हा एखाद्या विशिष्ट संघटनेच्या माध्यमातून या फेक अकाऊंटचा वापर झाल्याचे दिसून आले होते.
लांब कशाला जायचं सध्या हाथरस केस गाजत आहे. अनेक फेक साईट्स आणि फेक अकाऊंट कार्यरत झाल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले.
आणि यामागे पीएफआय ही तत्सम दहशतवादी संघटना असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याच्या काही कार्यकर्त्यांना अटक सुद्धा झाली.
सायबर प्रकरणात तरबेज असलेली मंडळी या एक प्रकारच्या ‘बिझनेस’ मध्ये उतरले आहेत. प्रोफेशन असल्याने त्यांनी केलेल्या या काळाबाजाराला ट्रॅक केलं जाऊ शकत नाही.
पण त्यांच्या एका चुकीमुळे अनेकदा ते पकडले सुद्धा गेले आहेत. फेक अकाऊंट उघडण्याची अनेक कारणे आहेत. पण नेमकं कारण हे लगेच कळून येत नाही.
त्यामुळे एखाद्या फेक पेजला भेट देण्यापूर्वी किंवा फेक अकाऊंटला आपल्या फ्रेंडलिस्ट मध्ये सामावून घेण्याच्या आधी नक्की विचार करा.
एक अकाऊंट ऍड केल्याने काय होतंय किंवा एका पेजला विझिट केल्याने काय होतंय असं समजून भविष्यात येऊ घातलेल्या संकटाला आपण निमंत्रण देऊ शकतो.
वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही स्तरावर या फेक अकाऊंट/पेजेसचा धोकाच आहे. त्यामुळे सावध रहा, सतर्क रहा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.