Site icon InMarathi

लोणावळ्याच्या जगप्रसिद्ध “चिक्की”चा रंजक प्रवास वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही गोष्टी आपल्याला इतक्या जवळच्या असतात की त्यांची सुरुवात कधी झाली असावी असे प्रश्नच पडत नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे आपली आवडती ‘चिक्की’.

मुंबई-पुणे-मुंबई हा प्रवास आपण क्वचितच चिक्की घेतल्याशिवाय करतो. मग तो स्टॉप एक्सप्रेस हायवे वर असू द्या किंवा चिक्कीचे उगम स्थान असलेल्या लोणावळा मध्ये असू द्या.

लोणावळा मध्ये एन्ट्री करतांनाच एक टिपिकल चिक्की चा वास येतो आणि जागोजागी आपल्याला लाल रंगाचे ‘मगनलाल चिक्की’ चे बोर्ड दिसायला सुरुवात होते.

 

 

तेच design, तोच फॉंट, ब्रँड नेम आणि सर्वात म्हत्वाचं म्हणजे वर्षानुवर्षे चालत आलेली तीच ‘टेस्ट’. तुमचा आवडता फ्लेवर कोणताही असेल; प्रत्येक प्रकारात तुम्हाला तीच क्वालिटी मिळणार हे नक्की.

कोण आहेत हे मगनलाल? कसं पसरवलं त्यांनी इतकं मोठं साम्राज्य? मगनलाल ब्रँड हे अचानक तयार झालेलं नाहीये. हे आहे तब्बल १३० वर्षांपेक्षाही जुनं.

कोणताही बिजनेस उभा रहायला एक पिढीला आपलं आयुष्य द्यावं लागतं याचा प्रत्यय ‘मगनलाल चिक्की’ ची स्टोरी वाचतांना नक्की येईल.

१८८८ साली श्री. मगनलाल अगरवाल यांचे वडील श्री. भेवारजी अगरवाल यांनी मुलाच्या नावाने एक दुकान सुरू केलं होतं. या दुकानात ‘गुड-दानी’ म्हणजेच गुळ आणि शेंगदाणा विकायचे.

सुरुवातीला ते हे काम मॅन्युअली करायचे. ज्यामध्ये शेंगदाणे स्वच्छ करणे, त्याचे साल काढून त्याला गरम करून एकजीव करणे आणि त्यांना कॅंडी स्वरूपात विकणे असं बिजनेस चं स्वरूप होतं.

त्यांच्या दुकानासमोरच रेल्वे स्टेशन होतं. तिथे पुणे आणि मुंबई मधील ट्रेन्स चा स्टॉप असायचा.

त्या काळात ‘गुड-दानी’ हा प्रकार इतका लोकप्रिय झाला की लोक खास ते घेण्यासाठी या स्टॉप वर उतरायचे. दुकानासमोर इतकी गर्दी व्हायची की, काही लोकांची नंतर ट्रेन मिस व्हायची.

 

 

‘गुड-दानी’ ची लोकप्रियता इतकी वाढली की, सेंट्रल रेल्वे ने श्री. मगनलाल यांना विनंती केली की त्यांनी ‘गुड-दानी’ चे पाकिट्स तयार करून पॅसेंजर ट्रेन मध्ये सप्लाय करण्यास सांगितलं.

वेळ कमी असल्याने ते या प्रकाराला एक छोटं नाव देण्याचा विचार करत होते. रेल्वे च्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘गुड-दानी’ ची आरोग्यास उपयुक्त असल्याची खात्री केली आणि त्यांच्या लक्षात आलं की, त्यामध्ये शरीराला पाचक तत्व आहेत.

या पदार्थाचं नाव असं असावं जे की, लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींच्या तोंडात सहज बसेल. बऱ्याच चर्चे नंतर ‘चिक्की’ हे नाव फायनल करण्यात आलं.

असं हे ऐतिहासिक नाव या गुड-दानी पदार्थाला मिळालं. काहीच दिवसांत लोणावळा ही जागा चिक्की साठी जगभरात ओळखली जाऊ लागली आणि काही दिवसांनी मगनलाल चिक्की या नावाने.

श्री. मगनलाल अगरवाल यांनी त्यांच्या दोन मुलांसोबत सुरू केलेला हा ब्रँड जगभरात पोहोचला केवळ त्याच्या माऊथ पब्लिसिटी च्या जोरावर. त्या काळात आजच्या सारखे प्रसिद्धी माध्यम आणि सोशल मीडिया सुद्धा नव्हता.

प्रॉडक्ट क्वालिटी मेंटेन करणे हे पहिलं वचन त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या ग्राहकांना दिलं आणि ते आजपर्यंत पाळलं आहे.

 

 

स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ला प्रोत्साहन देण्यासाठी मगनलाल यांचं ‘चिक्की मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ हे FICCI quality forum आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स कडून आदर्श म्हणून गणले गेले होते.

या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मगनलाल चिक्की ने सगळे इंटरनॅशनल स्टॅंडर्ड फॉलो करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही.

आज मगनलाल या ब्रँड खाली fudges, salty snacks, jelly, sweets, jams, fruit syrups आणि विविध प्रकारच्या स्नॅक्स जगभरात विकले जातात.

श्री. मगनलाल यांचे चिरंजीव श्री. अंबालालजी अगरवाल यांनी बिजनेस ला गरजेचं diversification दिलं आणि सतत नवनवीन प्रयोग करून लोकांची मनं जिंकली.

चिक्की हा पदार्थ खऱ्या अर्थाने भारतीय शोध आहे. ब्रिटिशांनी मुंबई च्या सर्वात जवळच्या हिल स्टेशन लोणावळा ला कनेक्ट करण्यासाठी रेल्वे मार्ग तयार केल्याने सुद्धा मगनलाल चिक्की च्या भरभराटीस खूप मदत झाली आहे.

मगनलाल चिक्की च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याची कॉपी करणारे बरीच दुकानं लोणावळ्यात सुरू झाली आहेत.

तुम्हाला जर का ओरिजीनल मगनलाल चिक्की चं युनिट पाहायचं असेल तर एक लक्षात ठेवा की, लोणवळा रेल्वे स्टेशन च्या बॅक साईड ला आहे आणि त्यांचं नाव निळ्या अक्षरात लिहिण्यात आलं आहे आणि त्या बोर्ड चं बॅकग्राऊंड हा पांढऱ्या रंगाचा आहे.

 

 

मगनलाल चिक्की सारखे पुर्णपणे भारतीय पदार्थ हे ग्लोबल लेवल ला जितके जास्त तयार होतील तितकी सध्या अडखळणारी भारतीय अर्थव्यस्था लवकर रुळावर येईल. असंच व्हावं अशी आशा करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version