ही ८ गंभीर लक्षणं म्हणजे डिप्रेशनची पहिली पायरी, वेळीच लक्ष द्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
वाढत्या जागतिकीकरणामुळे लोकं एकमेकांच्या जवळ आलेली आहेत पण, यामुळे माणसाचे आयुष्य अधिक स्पर्धात्मक होऊन नैराश्याची समस्या वाढलेली दिसते. कोरोना ओमिक्रोनसारख्या साथीच्या आजरांमुळे देखील लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे.
नैराश्य हा मानसिक विकार आपल्याला जगभरात सगळीकडेच बघायला मिळतो. विनाकारण हताश वाटणे, रागावर संयम ठेवता न येणे इ. नैराश्याची लक्षणे आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पण या मानसिक आजाराची लक्षणे आपल्या शरीरावर पण दिसून येतात. या लक्षणामधून शरीर आपल्याला या आजाराबाबतीत सुचित करत असते.
त्यामुळे ही लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपाय केल्याने संभावित आजाराची शक्यता टाळता येऊ शकते.
निद्रानाश :
नैराश्य हे तुमच्या शरीर आणि मेंदू या दोघांवर परिणाम करते. नैराश्यग्रस्त लोकांमध्ये आढळून येणारे प्रमुख लक्षण म्हणजे या लोकांना निद्रानाशाचा त्रास असतो.
उलट काही लोकांमध्ये असे दिसून आले आहे की की त्यांना खूप झोप येते.
==
हे ही वाचा : डिप्रेशनच्या समस्येवर हमखास यशस्वी होणाऱ्या “९ टिप्स” समजून घ्या!
==
थकवा :
थकवा हे नैराश्यामध्ये सामान्यपणे दिसून येणारे एक लक्षण आहे. आपल्याला नेहमीच सकाळी उठल्यावर, काम करून आल्यावर थकवा जाणवतो.
पण, यामागे डिप्रेशनसारखा भयावह आजार असू शकतो. साधारणतः थकवा आल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपली चिडचिड होऊ लागते.
नैराश्याने ग्रस्त लोकांना अनिद्रेचा त्रास असतो. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि पुरेसा आराम न मिळाल्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो.
बाकीच्या शारीरिक आजारांप्रमाणे थकवा हा एखाद्या इन्फेक्शन किंवा व्हायरसमुळे असतो. मग सामान्य थकवा आणि आणि नैराश्यामुळे आलेला थकवा यात फरक कसा करावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
हे ओळखण्याचा एक सोपा मार्ग आहे ज्याने या दोघांमध्ये फरक करता येऊ शकतो.
सामान्य थकव्यासोबत उदास वाटणे, आशा हीन वाटणे, विनाकारण रडू येणे दिवसभरातील कामात रस न वाटणे या गोष्टी सुद्धा तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच तुमचा थकवा नैराश्यामुळे असू शकतो.
दुखणे असह्य होणे :
जर तुम्हालाही दुखणे असह्य होत असेल आणि या दुखण्यामागचे कारण उमजत नसेल तर हे नैराश्याचे लक्षण असू शकते. नैराश्य आणि दुखणे हे एकमेकांशी जोडलेले आहेत.
२०१५ च्या एका अभ्यासात असे कळले की जे लोक नैराश्याने ग्रस्त असतात त्यांना एखादे दुखणे असह्य होते.
तसेच २०१० च्या एका दुसऱ्या अभ्यासातून हे कळते, नैराश्यग्रस्त लोकांना एखादे शारीरिक दुखणे जास्त प्रभावीपणे जाणवते.
काही संशोधक असेच सांगतात की नैराश्य दूर करण्यासाठी जी औषधे दिली जातात ती फक्त नैराश्य दूर करत नाही तर शारीरिक दुखणेसुद्धा थांबवते.
पाठीचे दुखणे किंवा स्नायुंचे दुखणे :
जर तुम्हालाही कामाच्या ठिकाणी किंवा शाळा-कॉलेजमध्ये बसल्यावर पाठीच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर कदाचित हे नैराश्याचे लक्षण असू शकते.
तसे पाहिले तर पाठीचे दुखणे हे चुकीच्या बसण्याच्या पद्धतीशी जोडले आहे. पण, कधीकधी हे मानसिक तणावामुळेसुद्धा असते.
२०१७ च्या एका अभ्यासानुसार नैराश्यग्रस्त माणसाला पाठीच्या दुखण्याचा त्रास जाणवतो.
पाठीचे दुखणे किंवा स्नायूंमध्ये दुखणे हे नैराश्याचे लक्षण आहे असे मानसोपचारतज्ञ मानतात. शरीराने आपल्याला पूर्वसूचित करण्यासाठी दिलेला हा संकेत असतो.
डोकेदुखी :
आपणा सर्वांनाच कधी ना कधीतरी डोकेदुखीचा त्रास भेडसावतो.
डोकेदुखीचा त्रास इतका सामान्य आहे की त्यामागे काही गंभीर कारण दडलेले असू शकते असा विचारच आपण करत नाही. दिवसभराच्या कामामुळे पडलेला तणाव भांडण अशा बऱ्याच गोष्टी डोकेदुखीला कारणीभूत असू शकतात.
नैराश्यामुळे झालेली डोकेदुखीची तीव्रता मायग्रेनच्या डोकेदुखी सारखी नसते.
नॅशनल हेडेक फाऊंडेशनने आशा डोकेदुखीला तणावयुक्त डोकेदुखी म्हटले आहे. अशा पद्धतीच्या डोकेदुखीत डोके ठणकत राहते विशेषत्वाने हे ठणके भुवयांजवळ जाणवतात.
मेडिकेशन म्हणजेच ध्यानयोग केल्याने ते प्रमाण कमी होऊ शकते. कधीकधी सतत होणाऱ्या डोकेदुखी मागे गंभीर मानसिक विकार दडलेला असू शकतो.
परंतु डोकेदुखी हे काही नैराश्याचे एकमेव कारण नाही. नैराश्यग्रस्त लोकांना डोकेदुखी बरोबर उदासीनता चिडचिड आणि आणि थकवा जाणवतं!
==
हे ही वाचा : चिडचिड, उदासीनता दूर ठेवण्यासाठी ही एक सवय लावून घ्या आणि निरोगी आयुष्य जगा
==
डोळ्यांशी संबंधित समस्या :
तुम्हाला कधीकधी वाचताना अक्षरे अंधुक दिसतात किंवा काळी अक्षरे फिकट दिसतात. २०१० ला जर्मनी मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार हे नैराश्याचे लक्षण असू शकते असे कळले आहे.
त्या अभ्यासामध्ये असे कळले की ८० नैराश्यग्रस्त माणसांना काळ्या आणि पांढर्या रंगामध्ये भेद करता येत नव्हता. यालाच संशोधकांनी ‘कॉन्ट्रास्ट पर्सेप्शन’ असे म्हटले.
पोटाचा त्रास :
पोटात होणारी ढवळाढवळ, पोटात कसेतरी होणे हे कशाचे कारण आहे.
जर आपल्या पोटात दुखू लागले तर आपण नेहमीच त्याला अपचनाचा त्रास किंवा मासिक पाळीचे कारण जोडतो पण, कधीकधी यामागे मानसिक नैराश्याचे कारण असते.
‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ चे संशोधक सांगतात की पोटात दुखणे, उमळून येणे, उलटी येणे हे मानसिक विकाराचे लक्षण असू शकते.
हार्वर्ड चे संशोधक म्हणतात की नैराश्यामुळे पचन यंत्रणेतील अवयवांमध्ये जळजळ होऊन त्यामुळे पोटदुखी होते. नैराश्यग्रस्त लोकांमध्ये इरिटेबल बोवेल्स हे लक्षणसुद्धा दिसून येते.
डॉक्टर आणि वैज्ञानिक सांगतात की आपल्या पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात.
जे अन्नपचनासाठी मदत करतात पण, या चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण कमी -जास्त झाले की आपल्याला नैराश्य आणि अतिचिंता यांसारखे आजार होतात.
दररोज संतुलित आहार घेणे आणि प्रोबायोटिक्सचे सेवन करणे आपल्याला या आजारांविरुद्ध लढा देण्यास मदत करतात.
छातीचे दुखणे :
छातीचे दुखणे हे सुद्धा नैराश्याचे एक लक्षण आहे. तसे पाहिले तर छातीच्या दुखण्याचा हृदय, फुफ्फुसे आणि पोटाच्या अवयवांशी संबंध असतो पण, कधीकधी हे नैराश्याचे लक्षण असू शकते.
हे तपासून बघण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाणे महत्त्वाचे आहे. नैराश्यामुळे हृदय विकारांना चालना मिळते. ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो ते नैराश्यग्रस्त असल्याचे दिसते.
जर वरील यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला दीर्घकाळापासून जाणवत असेल तर, तुम्ही प्राथमिक उपचारतज्ञाकडे जाऊन तपासून घेणे गरजेचे आहे.
अमेरिकेच्या मानसोपचारतज्ञ घटनेनुसार नैराश्य हा बऱ्याच लोकांमध्ये आढळून येणारा विकार आहे.
जर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.
==
हे ही वाचा : सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.