Site icon InMarathi

व्हॉटसॲपचे आहेत दोन प्रकार! दुसऱ्या प्रकारात आहेत ही जबरदस्त फीचर्स!

whatsapp business featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळं त्याला बोलायला आवडतं. पद्धतशीरपणे स्वत:चं मत मांडण्यासाठी संवाद ही त्याला मिळालेली एक ईश्वरी देणगी आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात संवादाला अनेक साधनं उपलब्ध झाली आहेत. पूर्वी संवाद हा मानवी भाषेत असायचा.

आता तो सात-आठ इंच स्क्रिनवर आणि बोटांनी अक्षरांना टच करून होऊ लागला आहे. भावना व्यक्त करण्यासाठी इमोजींचा वापर होऊ लागला आहे.

आणि हे सगळं करण्यासाठी पृथ्वीवरील माणसाची सर्वाधिक पसंती मिळाली आहे व्हॉटसॲपला.

सहज, सुलभ आणि विशेष म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना म्हणजेच जाहिरातींविना संवादाच्या सुविधेमुळे व्हॉटसॲप अल्पावधीतच लोकप्रिय ॲप बनले आहे.

 

 

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आतापर्यंत जगभरातील तब्बल ५०० कोटींपेक्षा अधिक युजर्सच्या फोनवर हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे.

तर १२ कोटी १८ लाख ९३ हजार ८० जणांनी या ॲपबद्दल आपला अभिप्राय गुगल प्ले स्टोअरवर नोंदवला आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का? व्हॉटसॲपचे दोन प्रकार आहेत. वर ज्याबद्दल सांगितलं तो तुम्ही वापरता तो नॉर्मल व्हॉटसॲप. तांत्रिक भाषेत त्याला स्टँडर्ड व्हॉटसॲप म्हटलं जातं. तर दुसरा प्रकार म्हणजे बिझनेस व्हॉटसॲप.

पहिल्या प्रकारचं म्हणजेच स्टँडर्ड व्हॉटसॲप हे खाजगी संवादासाठी वापरलं जातं. तर बिझनेस व्हॉटसॲप हे व्यावसायिक उपयोगासाठी वापरलं जातं.

बिझनेस व्हॉटसॲपमध्ये सर्व फिचर्स हे स्टँडर्ड व्हॉटसॲपप्रमाणेच आहेत. मात्र, त्याशिवाय ही काही फिचर्स बिझनेससाठी उपयुक्त आहेत.

बिझनेसची माहिती : बिझनेस व्हॉटसॲपमध्ये आपण आपल्या व्यवसायाच्या वेळा (उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या), ई-मेल आयडी, स्थळ (लोकेशन) तसेच उत्पादन-सेवांची माहिती (बिझनेस कॅटलॉग) नोंदवू शकतो.

याद्वारे सहजपणे तुम्हाला ग्राहकांशी संवाद साधणं आणि त्यांना तुमच्या उत्पादनांची माहिती पोहोचविणं शक्य होतं.

 

 

मेसेजिंग टूल्स : बिझनेस व्हॉटसॲपमधील हे सर्वांत प्रभावी फिचर आहे. या फिचरद्वारे नव्या ग्राहकानं म्हणजेच नव्या व्यक्तीने आपल्याला संपर्क साधला की त्याला आपोआप रिप्लाय जातो.

त्यासाठी Away Message, Greeting Message, Quick replies असे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही रिप्लाय करायची गरज नाही.

तर तुम्ही एकदाच नोंदवून ठेवलेला मेसेज आपोआप नव्या मेसेज करणाऱ्या व्यक्तीला पाठवला जातो.

लेबल्स : तुमच्याकडे एकाचवेळी अनेक ग्राहकांनी चौकशी केली आणि तुम्ही त्यांच्यासाठी काम करत असाल तर हे फिचर खूपच उपयुक्त ठरेल. याद्वारे तुम्ही तब्बल वीस प्रकारांमध्ये तुमच्या ग्राहकांना वर्गीकृत करू शकता.

म्हणजे Enquiry, Pending Payment, Work Complete अशा काही प्रकारात तुम्ही ग्राहकांची नोंद ठेवू शकता. असे प्रकार म्हणजेच लेबल.

शॉर्ट लिंक : बिझनेस व्हॉटसॲपमध्ये ग्राहकांना फोन क्रमांक सेव्ह न करता थेट व्हॉटसॲपवर कनेक्ट करण्यासाठीची शॉर्ट लिंक (कमीत कमी कॅरेक्टर असलेली) तयार करता येते.

एखाद्या व्यक्तीकडे तुमचा बिझनेस व्हॉटसॲपचा क्रमांक सेव्ह नसेल तरीही तो तुम्हाला या लिंकवर क्लिक करून थेट मेसेज करू शकतो.

विशेष म्हणजे त्यानं काय मेसेज करावा हे ही तुम्ही ठरवू शकता. जसे की ‘I am interested in your service’ वगैरे.

क्युआर कोड : शॉर्ट लिंकऐवजी तुम्ही तुमच्या दुकानात ग्राहकांना व्हॉटसॲपद्वारे कनेक्ट करण्यासाठी क्युआर कोडही लावू शकता. हा क्युआर कोडही बिझनेस व्हॉटसॲपमध्ये तयार करता येतो.

 

 

याचा उपयोग शॉर्ट लिंकप्रमाणेच होतो. मात्र, लिंकवर क्लिक करण्याऐवजी फक्त व्हॉटसॲपमधून क्युआर कोड स्कॅन करावा लागतो.

हे लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही क्षणी तुमचं स्टँडर्ड व्हॉटसअॅप अकाऊंट बिझनेस अकाऊंटमध्ये बदलू शकता. तसेच बिझनेस अकाऊंटही स्टँडर्ड अकाऊंटमध्ये बदलू शकता.

फक्त त्यावेळी योग्य ती खबरदारी घेऊन डेटा रिस्टोअर करणं आवश्यक आहे.

बिझनेस व्हॉटसमधील ‘बिझनेस कॅटलॉग’ या फिचरद्वारे तुमची उत्पादने (प्रॉडक्टस) अपलोड केल्यानंतर प्रत्यक्ष व्हॉटसॲपद्वारे ते तपासले जातात आणि नंतरच तुमच्या ग्राहकांना दिसू लागतात.

अशी उत्पादने Approve होण्यासाठी काही तास लागतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version