सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंतच्या व्याधींवर गुणकारी अशा “ह्या” तेलाचे १० फायदे वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
निलगिरीच्या तेलाने त्याच्या आरोग्यावरील गुणकारी तत्त्वांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या तेलाचा उपयोग पारंपारिक चिकित्सेबरोबर अरोमाथेरपीमध्ये केला जातो.
निलगिरीचे तेल उंच आणि हिरव्या निलगिरीच्या झाडाच्या ताज्या पानांपासून बनवले जाते. सर्वप्रथम निलगिरीचे झाड ऑस्ट्रेलियामध्ये पाहिले गेले.
पण, यानंतर भारत, युरोप आणि दक्षिण आफ्रिके सारख्या जगातल्या बऱ्याच देशांमध्ये निलगिरीचे झाड अस्तित्वात आहे असे संशोधकांना कळले.
बऱ्याच देशांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात निलगिरीच्या तेलाचं उत्पादन होतं पण आजही जगामध्ये निलगिरीच्या तेलाचा मुख्य स्त्रोत ऑस्ट्रेलिया आहे.
निलगिरीमधल्या औषधी गुणांमुळे या तेलाचा उपयोग विविध पद्धतीची औषधे बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये बाम, इन्हेलर, मलम फ्रेश क्रीम आणि माऊथ वॉश यांचा समावेश होतो. चला तर मग निलगिरीच्या विविध गुणांविषयी जाणून घेऊया!
१) जखमेवर गुणकारी :
निलगिरी मध्ये हे रोगप्रतिबंधक गुण असल्यामुळे हे एक उत्तम ‘अँटीसेप्टिक’ आहे. म्हणून, निलगिरी तेलाचा उपयोग जखम, अल्सर, जळजळ, कापले जाणे किंवा फोड यासाठी केला जातो.
काही कीटक चावल्यानंतर किंवा त्यांनी दंश केल्यानंतर होणाऱ्या जळजळीपासून थंडावा पुरवण्यासाठी निलगिरीच्या तेलाचा उपयोग केला जातो.
जखम झालेल्या ठिकाणी निलगिरीचे तेल फक्त थंडावा देत नाही तर तिथे होणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या संक्रमणाला ही आळा घालते.
२) ब्रोंकाइटिससाठी उपायकारक :
हिवाळ्यातील समस्यांसाठी निलगिरीचे तेल लाभदायक आहे. हे तेल सर्दी, पडसं, खोकला, नाक वाहत राहणे, गळ्यामध्ये होणारी खिचखिच, अस्थमा, ब्रोंकाइटिस आणि साईंसायटीसच्या इलाजासाठी मदत करते.
निलगिरीच्या तेलामध्ये जिवाणूरोधक, कवक रोधक आणि आणि रोग प्रतिबंधक तसेच अँटिव्हायरस, सुजविरोधी आणि सर्दी खोकला यांवर आळा घालणारे गुण आहेत.
जे की अशा समस्यांवर इलाज करणाऱ्या औषधांसाठी चांगले घटक मानले जातात.
एका अभ्यासात असे आढळले की निलगिरी तेलयुक्त औषधे जेव्हा नॉन बॅक्टेरियल सायनसने पीडित असलेल्या रुग्णांना दिली तेव्हा, त्यांच्यामध्ये सुधारणा दिसली.
गळ्यात जर जखम झाली असेल तर त्याच्या उपचारासाठी गरम पाण्यात निलगिरीच्या तेलाचे थेंब टाकून त्या मिश्रणाने गुळण्या केल्यावर घशाला आराम मिळतो.
निलगिरी तेलाच्या एक ते तीन थेंबांनी छातीची मालिश केल्यावर तिच्या सुखदायक आणि सुगंधित गंध गळा साफ करतो.
तसेच या तेलाचे कण आणि गंध रक्तवाहिन्यांमध्ये पसरतो ज्यामुळे फुफुसांमधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि आणि श्वास घेण्यात सहजता प्राप्त होते.
अस्थमाच्या समस्येवर मात करण्यासाठी निलगिरीच्या तेलातील सूज विरोधी तत्व लाभकारी आहेत.
३) डोकं शांत ठेवण्यासाठी :
निलगिरीचे तेलातील थंडावा देणारे तत्त्व आपल्या मानसिक सुस्तीला पळवून लावते. त्यामुळे निलगिरीच्या तेलाचा उपयोग तणाव आणि मानसिक विकारांच्या उपचारासाठी केला जातो.
मानसिक थकवा दूर करण्याऐवजी निलगिरी मानसिक गतिविधी वाढवून मस्तिष्कमध्ये रक्त प्रवाहाच्या संचलनाला मदत करते.
या तेलाला वाहीका विस्फारक मानले गेले आहे म्हणजेच हे तेल रक्तवाहिन्यांना आराम पोहोचवून शरीरामध्ये हे रक्ताचा प्रवाह वाढवते. मस्तिष्कमध्ये रक्तप्रवाह वाढल्यामुळे मेंदूची शक्ती सुद्धा वाढते.
४) मांसपेशीच्या दुखण्यावर :
जर तुमच्या गुडघ्यांमध्ये, जोड्यांमध्ये आणि मांसपेशी दुखत असतील तर निलगिरीच्या तेलाची मालिश प्रभावित भागाचा तणाव आणि दुखणं पळून लावण्यासाठी उपाय कारक आहेत निलगिरीच्या तेलामध्ये सूजविरोधी गुण आहे.
त्यामुळे गाठी होणे, कमरेचे दुखणे, लचक, मासपेशी कडक होणे, सततचे दुखणे, फायब्रोसिस यांसाठी निलगिरीच्या तेलाचा उपयोग केला जातो.
शरीराच्या प्रभावीत भागावर निलगिरीच्या तेलाने गोलाकार गतीने मालिश केली पाहिजे.
५) दातांच्या समस्येवर :
निलगिरीच्या तेलामधील रोग विरोधी गुणांमुळे हे तेल अनेक प्रकारच्या दातांच्या समस्येसाठी उपयुक्त आहे.
जसे की दातांमध्ये छिद्र तयार होणे, दातांमध्ये घाण साचणे, हिरड्यांमध्ये आलेली सुज आणि अशा अन्य प्रकारच्या दातांमध्ये झालेल्या संक्रमणासाठी हे तेल लाभदायक आहे.
हेच कारण आहे की निलगिरीच्या तेलाचा वापर बऱ्याच माऊथ वॉश, टूथपेस्ट आणि अनेक दातांची निगडित असलेल्या उत्पादनांमध्ये केला जातो.
६) केसात झालेल्या उवा पळवण्यासाठी :
निलगिरीच्या तेलात किट विकर्षक गुण असतात आणि याच प्राकृतिक कीटकनाशकाच्या गुणामुळे निलगिरीचे तेल उवांवर प्राकृतिक उपचार म्हणून प्रसिद्ध आहे.
बाजारात उवा मारण्यासाठी असलेली औषधे रसायनांपासून बनवलेली असतात त्यामुळे हानिकारक ठरू शकतात. म्हणून, नैसर्गिक पद्धतीने उवांना पळवून लावण्यासाठी निलगिरीचे तेल एक उत्तम पर्याय आहे.
७) पोटात झालेले कृमी मारण्यासाठी :
वर म्हटल्याप्रमाणे निलगिरीच्या तेलात किट विकर्षक गुण असल्यामुळे ते उत्तम कीटकनाशक आहे. त्यामुळे पोटातले कृमी मारण्यासाठी निलगिरीच्या तेलाचा उपयोग केला जातो. आतड्याच्या रोगांचा उपचार करण्यासाठीसुद्धा निलगिरीचा उपयोग केला जातो.
संशोधनातून असे कळले आहे, की निलगिरीच्या तेलाचे सेवन केल्यामुळे शरीरामध्ये तयार झालेल्या बॅक्टेरिया सुष्मजिव आणि परजीवी यांना मारण्यास मदत मिळते.
८) केसांसाठी फायदेशीर :
निलगिरीच्या तेलाने केसांना चमक येते आणि केस जाड होतात. केसांना दर्जेदार बनवण्यासाठी हे तेल मदत करते, याचा अधिक वापर केल्याने केसांची मूळ चमक जाऊ शकते आणि डोक्याचा आतला भाग गुळगुळीत होऊ शकते.
त्यामुळे बरेच विशेषज्ञ असा सल्ला देतात की, अंघोळीच्या एका तासाआधी निलगिरीच्या तेलाचा उपयोग केसांसाठी करायला हवा आणि मग एका योग्य शाम्पूने केस नीट धुतले पाहिजेत.
९) त्वचेसाठी वापर :
त्वचेवर झालेल्या संक्रमणाचा इलाज करण्यासाठी निलगिरीच्या तेलाचा उपयोग केला जातो याचा उपयोग विशेषतः त्वचेवर तयार झालेले लहान-लहान छिद्र, चट्टे चिकनपॉक्स यांवर केला जातो.
एप्पल साइडर विनेगरबरोबर संतुलित प्रमाणात निलगिरीचे मिश्रण संक्रमित भागात लावल्याने रुग्णाला आराम मिळतो.
निलगिरीच्या तेलामध्ये थंडावा देणारे तत्त्व तसेच अँटीसेप्टीक गुण असल्यामुळे बरेच लोक या तेलाचा उपयोग आंघोळ करताना स्पा आणि सोना बाथ साठी केला जातो.
१०) मधुमेहावर फायदेशीर :
निलगिरीचे तेल शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण नियंत्रित करते.
तसेच शरीरामधील रक्ताचे संक्रमण वाढवते मधुमेहाच्या रुग्णांमध्ये शरीरातील रक्त संचलनाचे प्रमाण कमी असते त्यांच्यासाठी हानिकारक आहे म्हणूनच निलगिरीच्या तेलाने केलेली मालिश फायदेशीर ठरू शकते.
हे तेल नाकावाटे इनहेल केल्याने रक्त वाहिन्यांमध्ये हे असलेली जकड कमी होते आणि पूर्ण शरीरात रक्त संचलनात वृद्धी होते.
निलगिरीच्या तेलाचे ज्याप्रमाणे असंख्य फायदे आहेत त्याप्रमाणे याचे नुकसान सुद्धा आहे, परंतु तेलाचा अतिरिक्त प्रमाणात आणि अयोग्य पद्धतीने केलेला वापर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.
त्यामुळे वरील दिलेली कुठलेही उपाय प्रात्यक्षिक स्वरूपात करताना तुम्ही पुरेपूर काळजी घ्यावी तसेच तुम्हाला वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेचे ठरेल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.