' शिवाजी महाराजांचं “शिप यार्ड” समजला जाणारा हिंदवी स्वराज्यातील एक दुर्लक्षित जलदुर्ग! – InMarathi

शिवाजी महाराजांचं “शिप यार्ड” समजला जाणारा हिंदवी स्वराज्यातील एक दुर्लक्षित जलदुर्ग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी कानी पडलं की आपण मराठी माणसांना एक वेगळंच स्फुरण चढतं. हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या या महान राजाचं कर्तृत्व खऱ्या अर्थाने शब्दातीत आहे.

मावळ्यांना एकत्र करून तयार केलेलं सैन्य, गनिमी कावा, युद्ध जिंकण्यासाठी केलेल्या वेगळ्या क्लुप्त्या या सर्व शिकतच आपण लहानाचे मोठे झालो आहोत.

शाहीस्तेखानाची बोटे छाटली, आग्र्याहून पेटाऱ्यातून सुटका, वयाच्या १६ व्या तोरणा किल्ला जिंकणे, प्रतापगड च्या पायथ्याशी अफजलखान चा केलेला वध या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणाऱ्या आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य करता येऊ शकतात हा विश्वास देणाऱ्या आहेत.

“कोणताही प्रश्न तुमच्यापेक्षा मोठा नसतो आणि त्या प्रश्नाकडे वेगळ्या बाजूने बघितलं तर उत्तर हे मिळतंच” हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला पदोपदी कळतं.

 

shivaji mharaj InaMarathi 5

 

तो काळ असा होता की, एकाच वेळी महाराजांच्या समोर मुघल, निजाम, आदिलशाह आणि इंग्रज इतके शत्रू होते तरीही आपला हा राजा सर्वांवर भारी पडला होता.

जिथे युद्ध जिंकता येत नसेल तिथे तह करणे किंवा एखाद्या गडावर जाण्यासाठी मार्ग नसेल तर नवीन मार्ग तयार करणे आणि जनतेच्या हितलाच कायम प्राधान्य देऊन राज्य चालवणे या विचारसरणीचा हा एकमेव राजा होता.

पद्मदुर्ग हे एक याच श्रेणीतील उदाहरण आहे. कदाचित या किल्याबद्दल काही जणांना माहीत नसेल.

मुरुड जंजिरा या अजिंक्य किल्ल्यापासून केवळ १० किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधलेला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड मध्ये असलेला जंजिरा हा किल्ला १७ व्या शतकात मलिक अंबर ने बांधला होता.

चारही बाजूने पाणी असलेला हा किल्ला भारतात एकमेव आहे. ४० फूट उंची असलेल्या या किल्ल्याच्या इमारती उंच आणि मजबूत आहेत.

या भौगोलिक रचनेमुळे हा किल्ला ३०० वर्षात कोणालाही जिंकता आला नव्हता. जंजिरा हा शब्द अरेबिक शब्द जझीरा या iceland शब्दापासून तयार झाला आहे.

 

janjira inmarathi

 

मलिक अंबर हा सिद्दी सैन्याचा एक सेनापती होता. त्याच्या नेतृत्वात जंजिरा किल्ल्याचं संरक्षण केलं जायचं.

हे संरक्षण इतकं काटेकोरपणे केलं जायचं की हा किल्ला पोर्तुगीज, ब्रिटिश, पेशवे, मराठा सैन्य यापैकी कोणालाही ते संरक्षक कवच भेदता आलं नव्हतं.

जलदुर्ग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या किल्ल्याच्या महाद्वारात हत्तींची प्रतिकृती आहे आणि किल्ल्यात १९ बुरुज आहेत आणि तिथे ५०० तोफा होत्या त्यापैकी काही आजही आहेत.

त्यासोबतच, किल्ल्यात असलेल्या प्रत्येक खोलीला एक अंडरग्राऊंड पॅसेज असल्याने आणि आतील सर्व भिंती एकमेकांशी जोडलेल्या असल्याने हल्ला  केल्यावर शत्रू तावडीत येणं अवघड होतं.

महाद्वार हे राजापूरच्या दिशेकडे तोंड करून आहे आणि कोणी ४० फुट अंतरावर असल्यावरच दिसेल अशी रचना आहे.

पद्मदुर्ग किल्ला ज्याला की कासा या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

जंजिरा पासून जवळच असलेला हा किल्ला सिद्दी च्या जंजिरा किल्ल्यावर नजर ठेवता येईल आणि योग्य वेळी जंजिरा वर चढाई करता येईल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये बांधला होता.

जंजिरा इतका हा किल्ला क्षेत्रफळाने मोठा नसला तरीही हा किल्ला सुद्धा प्रेक्षणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ‘शिप यार्ड’ समजला जाणार हा किल्ला जंजिरा किल्ल्यावरून आपल्याला दिसतो.

पद्मदुर्ग ला भेट द्यायची असेल तर आपल्याला आधी नेव्ही ची परवानगी घ्यावी लागते. ‘दांडी’ या गावाच्या समुद्रकिनाऱ्यावरून एक वाट पद्मदुर्ग मध्ये जाणारी होती.

 

padmadurga inmarathi

 

पण, ती वाट आता पाण्याखाली गेली आहे. पद्मदुर्ग ला भेट द्यायची असल्यास आता मुरुड कोळीवाडा इथून बोट ने जावं लागतं.

फुललेल्या कमळा सारखी रचना असल्याने या किल्ल्याला ‘पद्मदुर्ग’ हे नाव त्याकाळी देण्यात आलं होतं.

कमळाच्या या बऱ्याच प्रतिकृती असलेल्या या किल्ल्यात जागोजागी मराठा सैन्याच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी ज्ञानाचा प्रत्यय येतो.

हा किल्ला बांधण्यासाठी मालवाहतूक कशी केली असेल ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. पद्मदुर्ग बांधला तेव्हा त्यात ७० ते ८० तोफा होत्या त्यापैकी आता ४२ आजही आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रात सुद्धा संरक्षक तट उभे करण्याच्या दुरदृष्टीमुळे त्यांना “जलमेव यस्य बलमेव तस्य” या वाक्प्रचाराने सुद्धा ओळखलं जातं ज्याचा अर्थ असा आहे की, “समुद्रावर सुद्धा ज्याची सत्ता आहे, तो खरा शक्तिशाली”.

२० व्या शतकात पद्मदुर्ग हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आणि त्याच्या संवर्धनासाठी आर्थिक अडचणी येऊ लागल्या.

जंजिरा हा किल्ला मात्र पर्यटकांसाठी खुला असल्याने तिथे सफाई, पिण्याचे पाणी या सुविधा लोकांना मिळत आहेत. पद्मदुर्ग मात्र आजही एकटा त्याच्या बांधल्या गेल्याचं सार्थक न झाल्याची खंत व्यक्त करत आहे.

 

padmadurga featured inmarathi

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सिद्दी सैन्याकडे जंजिरा आणि पद्मदुर्ग चा ताबा गेला होता.

पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागे मराठा सैन्याने घेतलेल्या मेहनतीला आपल्यापासून वंचित ठेवण्यात आलं आहे.

येणाऱ्या काळात हा किल्ला देखील सर्वांसाठी खुला होईल आणि आपण अभिमानाने त्याला सुद्धा भेट देऊ अशी आशा करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?