' होय! या युद्धात एवढ्या कोटी माणसांचा बळी गेला होता. कोणतं युद्ध होतं ते? – InMarathi

होय! या युद्धात एवढ्या कोटी माणसांचा बळी गेला होता. कोणतं युद्ध होतं ते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दुसरं महायुद्ध – जगात घडलेल्या युद्धांपैकी सर्वात मोठं युद्ध म्हणून मानलं जातं. त्याची कारणं सुद्धा तशीच आहेत. ७ ते ८ करोड लोक या युद्धात मृत्युमुखी पडले होते.

ही संख्या त्या काळच्या म्हणजे १९४० च्या जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश इतकी होती. प्रत्यक्ष युद्धात या पैकी जवळपास साडे पाच करोड लोकांचा मृत्यू झाला होता.

युद्धानंतर पसरलेल्या रोगराईमुळे २ करोड लोकांना जीव गमवावा लागला होता.

 

ww2 inmarathi

 

जर्मनी आणि सोव्हिएत युनियन यांच्या मध्ये प्रामुख्याने झालेल्या या युद्धात जीव गमवावा लागणारे सैनिक हे चीन आणि सोव्हिएत युनियन या देशांमधले होते.

डेव्हिड रॉबिन्स यांनी लिहिलेल्या ‘वॉर ऑफ द रॅट्स’ या कादंबरी मध्ये एका स्टोरी च्या फॉरमॅट मध्ये रंगवून सांगण्यात आलं आहे.

जगातील प्रमुख ३० देश सामील झाल्याने या युद्धाला ‘ग्लोबल वॉर’ असं सुद्धा संबोधलं जातं. १ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ या ६ वर्ष १ दिवसाच्या काळात हे युद्ध सुरू होतं.

सर्व देशांनी त्यांची पूर्ण आर्थिक, औद्योगिक आणि वैज्ञानिक शक्ती पणाला लावली होती. मानवी इतिहासातील ही सर्वात मोठी लढाई होती.

कारण, फक्त या युद्धात अणुबॉम्ब चा वापर करण्यात आला होता आणि पूर्ण युद्ध हे एअरक्राफ्ट च्या माध्यमातून झालं होतं.

पोलंड वर जर्मनी ने केलेल्या आक्रमणाने या युद्धाची सुरुवात झाली होती. त्यानंतर फ्रान्स, इंग्लंड ने जर्मनी वर केलेलं आक्रमण आणि त्यानंतर जर्मनी ने युद्धावर मिळवलेलं कंट्रोल ह्या या महायुद्धाच्या प्रमुख घडामोडी मानल्या जातात.

१९४० मध्ये फ्रान्स च्या माघार घेतल्या नंतर युरोपियन पॉवर आणि ब्रिटिश पॉवर यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं.

१९४१ मध्ये जपान ने एशिया चं नेतृत्व करत युद्धात सहभाग घेतला आणि अमेरिकेवर त्यांना हल्ला केला. त्याचं प्रत्युत्तर अमेरिकेने जपान वर अणुबॉम्ब टाकून दिलं आणि युद्धाला एक वेगळंच वळण मिळालं.

 

japan nuclear attack inmarathi

 

१९४२ मध्ये जर्मनी आणि इटली यांचा सोव्हिएत युनियन मध्ये पराभव झाला.

आणि १९४३ ते १९४५ मध्ये जर्मनी ची सतत झालेली पीछेहाट आणि १९४५ मध्ये एडॉल्फ हिटलर यांनी केलेली आत्महत्या यानंतर जर्मनी ने पूर्ण शरणागती पत्करली आणि युद्ध समाप्त झालं आणि जपान, जर्मनी च्या लिडर्स विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धाने जागतिक राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं होतं. सध्या कायम चर्चेत असलेल्या UN – युनायटेड नेशन्स ची स्थापना या युद्धानंतरच झाली होती.

त्याचा मूळ उद्देश हा भविष्यातील अशी युद्ध रोखणे असा होता. या युद्धानंतर सिक्युरिटी कौन्सिल ची स्थापना झाली ज्यामध्ये चीन, फ्रांस, सोव्हिएत युनियन, इंग्लंड आणि अमेरिका हे पर्मनंट मेंबर झाले.

सोव्हिएत युनियन आणि अमेरिका हे या युद्धानंतर सुपरपॉवर म्हणून ओळखले जाऊ लागले.

‘वॉर ऑफ द रॅट्स’ या कादंबरी ची कथा ही दोन snipers भोवती फिरते. त्यापैकी एक रशियन आहे तर एक जर्मन आहे. दोघांनाही एकमेकांना मारायचं आहे. निकी मोंड यांच्यापासून कथेला सुरुवात होते.

 

war of the rats inmarathi

 

तो एका सैनिकाशी बोलताना अचानक त्या सैनिकाला अचानक गोळी लागते. त्यानंतर स्टोरी मध्ये तानिया या sniper ची एन्ट्री होते.

तानिया ला एका अवघड परिस्थिती मध्ये युद्धातून पळ काढावा लागतो आणि Zaitsev या आर्मी चीफ ने सुरू केलेली शाळा जॉईन करावी लागते. ३ दिवसांच्या शिक्षणानंतर तानिया ला एका मिशन वर नेण्याचं Zaitsev ठरवतो.

दुसऱ्या भागात जर्मन Throvald या बेस्ट जर्मन sniper ला Zaitsev या रशियन आर्मी चीफ ला मारण्यासाठी आमंत्रण देतात. Throvald हे त्यांच्या प्रवासात येणाऱ्या कित्येक रशियन सैनिकांना मारतात.

काही दिवस ही मिनी वॉर चालू असते आणि नंतर Zaitsev हे ती मिनी वॉर संपवण्याचा निर्णय घेतात. Throvald ने त्याच्या विश्रांतीसाठी एक जागा तयार करून ठेवलेली असते.

Zaitsev हे तिथे Danilov ला सोबत घेऊन येतात. या चकमकीनंतर दोघेही लपून बसतात आणि दुसऱ्या दिवशी Zaitsev ला मारण्यासाठी Throvald एक प्लॅन बनवतो. पण, त्यात तो अयशस्वी होतो आणि स्वतःच मारला जातो.

तिसऱ्या भागात निकी मोंड यांची परत वापसी होते. त्यावेळी जर्मन सैन्याला रशियन फौजांनी घेरलेलं असतं. शरण येण्याशिवाय कोणताही पर्याय निकी यांच्यासमोर नव्हता.

या सर्व घडामोडींना निकी मोंड हे या शब्दात सांगतात,

“कर्तव्य हे तुम्हाला आंधळं करत असतात. एकदा तुमच्या खांद्यावरून कर्तव्याचं ओझं निघून जातं तेव्हा तुम्हाला कोण खरं आणि कोण खोटं बोलतं हे स्पष्ट दिसायला लागतं.

हिटलर, स्टॅलिन, चर्चिल, मुसोलिनी, रुसवेल्ट, हिरोहितो यांच्यासारखे लोक हे एका रेडिओ वर गाणं म्हणत असतात आणि त्यांचे खोटारडे साथीदार त्यांचं गाणं चुकत असलं तरी त्यांची वाहवा करत असतात.

 

leaders inmarathi

 

या युद्धात सहभागी होण्यासाठी या सर्वांनी त्यांच्या सैनिकांना काही मानधन दिलं असेल.

पण, त्या बदल्यात आपण सगळे मिळून मानवजातीचं किती मोठं नुकसान करत आहोत ह्याचा हिशोब कोणीच करत नाहीये. आपण सर्वांनी यांना साथ देणं म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे.”

‘वॉर ऑफ द रॅट्स’ ही कादंबरी वाचताना आपल्याला त्या काळातील युद्धजन्य परिस्थितीचा पूर्णपणे अंदाज येतो.

किती तो काळ भयानक असेल जेव्हा की रोज हजारो सैनिक मारले जात होते आणि पूर्ण जगात एक भीतीचं वातावरण होतं. तिसऱ्या भागात दिलेला मानवतेचा संदेश हा जगभरातील प्रमुख नेत्यांनी कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे.

युद्धाने कोणत्याही समस्येवर निघालेला तोडगा हा नेहमी तात्पुरता असतो. जगातील प्रत्येक देशाने विचारांनी एकमेकांची मनं जिंकून प्रगतीसाठी एकमेकांना मदत करावी इतकीच आपण सामान्य माणूस अपेक्षा करू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?