Site icon InMarathi

गोरं करणारं क्रीम विकणाऱ्या शाहरुखची मुलगी म्हणतेय #EndColourism

shahrukh khan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“गोरे गोरे” मुखडे पे काला काला चष्मा, ये काली काली आँखे- “गोरे गोरे” गाल…..”गोरा रंग” असा शब्द जरी तुम्हाला कोणी सांगितला, तर तुम्हाला अशी असंख्य गाणी सापडतील.

एखाद्या सुंदर स्त्रीचं वर्णन करायला सांगितलं, तर सर्वसामान्य माणूस कसं करेल? गौर वर्ण, लांबसडक केस, कमनीय बांधा… इत्यादी इत्यादी. म्हणजे “गौर वर्ण” हवाच.

गोऱ्या रंगाचे लोक म्हणजे उच्चवर्णीय आणि बाकीचे इतर असा समज खूप आधीपासून आपल्या समाजात आहे.

तसं पाहायला गेलं तर, भारतीय हे मुळात गव्हाळ वर्णाचेच असतात, पण तरीही गोऱ्या रंगाबद्दल आपल्याला कायम आकर्षण असतं.

अगदी मूल पोटात असल्यापासून ते जन्माला आल्यानंतर त्याची कांती गोरी असावी म्हणून निरनिराळे प्रयोग केले जातात. कुठे हळद लाव, कुठे महागडी औषधं घे, असे एक ना अनेक उपाय केले जातात.

काळ्या रंगाबद्दल लोकांना कायमच वावड आहे. “रंगावर काही नसतं”, असं म्हणणारी लोकं सुद्धा वेळ आली, तर गोऱ्या रंगालाच प्राधान्य देतात.

बॉलिवूडचे अनेक कलाकार आपल्याला “फेअरनेस क्रीम” च्या जाहिरातींमध्ये दिसतात. यामध्ये “किंग खान” शाहरुखचा देखील समावेश आहेच.

“फेअर अँड हँडसम” या क्रीमच्या अनेक जाहिरातींमध्ये शाहरुखचा चेहरा झळकलेला आपण पाहिला आहे.

 

 

नुकतंच शाहरुखची मुलगी सुहाना हिने वर्णभेदावर टीका करणारी एक पोस्ट केली आहे. लहानपणापासून गव्हाळ रंगावरुन तिची अनेकांनी अवहेलना केली, मात्र तिला या रंगाचे अजिबात दुःख नाही असं ती म्हणते.

“सध्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि अशा अनेक गोष्टींपैकी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपण बदलली पाहिजे. ही गोष्ट काही माझ्या एकटीच्या बाबतीत नाही. माझ्यासारख्या अनेक तरुण मुलामुलींना कारणाशिवाय वाटणाऱ्या न्यूनगंडाचा हा प्रश्न आहे.

आतापर्यंत माझ्या दिसण्यावरून अनेक जणांनी कमेंट्स केल्या आहेत. मी १२ वर्षाची असल्यापासून मला अनेकांनी माझ्या रंगावरून मी कुरूप दिसते असे सांगितले.

आपण सगळेजण भारतीय आहोत, आपला रंग हा निसर्गतःच गव्हाळ असतो. तुम्ही स्वतःच्या रंगापासून दूर जाऊ शकत नाही.

इंडियन मॅचमेकिंग, सोशल मीडिया किंवा तुमच्या कुटुंबीयांनीदेखील तुम्हाला आतापर्यंत जर सांगितलं असेल, की तुम्ही जर ५”७ आणि गोरे नाही आहात, तर तुम्ही सुंदर नाही.

मी स्वतः ५”३ आहे आणि माझा रंग गव्हाळ आहे आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे, जो तुम्हालाही असला पाहिजे.” असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

यावरून अनेक लोकांनी बॉलीवूडच्या या दुटप्पीपणावर भाष्य केले आहे. म्हणजे, मुलीने वर्णभेदावरुन आपल्याला किंवा लोकांना किती अवहेलना सहन करावी लागली हे सांगायचं, आणि वडिलांनी “फेअरनेस”क्रीमचीच जाहिरात करायची.

 

 

बॉलीवूडमध्ये अशा दुटप्पीपणाचे अनेक किस्से यापूर्वीही घडले आहेत. प्रियांका चोप्राने दिवाळीत फटाके उडवू नका असं सांगणं आणि स्वतःच्या लग्नातच फटाके उडवणं यासारखी अनेक उदाहरणं देता येतील.

हा दुटप्पीपणा पाहिल्यानंतर प्रश्न पडतो, की केवळ पैशांसाठी किंवा प्रसिद्धीसाठी कलाकार अशी विधानं करत असावेत का? आणि आता या रांगेत त्यांची पुढची पिढी पण सामील होतेय वाटतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version