Site icon InMarathi

रेणुका शहाणे यांचा ‘सुरभी’ टीव्ही शो एवढा सुपरहिट का झाला? वाचा त्याची रंजक गोष्ट!

Surabhi Tv Show InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सगळ्यांच्या हक्काचं मनोरंजनाचं साधन म्हणजे टीव्ही, घरातील वडीलधारी मंडळी आणि सिरीयल हे तर एक समीकरणच बनून गेलं आहे. श्रेयस तळपदे सारखा मराठमोळा चेहरा पुन्हा एकदा सिरीयलमध्ये दिसतोय, तसाच आणखीन एक चेहरा आता आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे रेणुका शहाणे, बऱ्याच वर्षांनंतर त्यांचे मराठीत पुरागमन होतेय, मात्र त्यांची ओळख खरी आहे ती सुरभी कार्यक्रमामुळे, आजच्या लेखात आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत…

 

 

९० चं दशक हे मनोरंजन क्षेत्रासाठी किती स्पेशल होतं हे आपण सगळेच जाणतो.

बॉलीवूड, संगीत क्षेत्र, टिव्ही प्रत्येक ठिकाणीच अश्या काही दर्जेदार कलाकृती तयार झाल्या ज्याबद्दल आपण आज ३० वर्षांनी सुद्धा चर्चा करतो आणि त्याच काळातील गाणी आजसुद्धा लोक ऐकतात.

आणि त्या काळात टीव्ही वर प्रसारित झालेल्या सिरियल्स आजही लोक आवडीने बघतात. मार्च ते जून २०२० चा ‘लॉकडाऊन’ काळ या सर्व जुन्या आठवणींना उजाळा देणारा होता.

रामायण, महाभारत या दोन लोकप्रिय सिरियल्स मुळे लोक एप्रिल महिन्यात कोरोना सारख्या भयंकर आजाराला विसरु शकले आणि त्यात शिकवलेल्या जीवन मूल्यांचा अभ्यास करून स्वतःला समृद्ध करू शकले.

भारतीय संस्कृती बद्दल माहिती देणारा दूरदर्शन वर येणारा अजून एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘सुरभी’. १९९० ते २००१ या काळात या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

 

दर रविवारी रात्री ९.३० ला प्रसारित होणाऱ्या शो ची प्रत्येक जण अक्षरशः वाट बघायचे. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे हे दोघं मिळून हा शो होस्ट करायचे.

सिद्धार्थ काक हे ‘सुरभी’ चे निर्माते होते. रेणुका शहाणे यांचं स्माईल हे या शो चं आकर्षण होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सुरभी च्या प्रत्येक भागात प्रेक्षकांना भारतातील टॅलेंटेड लोकांची ओळख व्हायची आणि नवीन लागलेले शोध, भारताची परंपरा आणि देशभक्ती ही खूप निरागस पद्धतीने सादर केली जायची.

आणि माहिती अशी होती की जी कदाचित Google ला सुद्धा माहीत नसेल. सुरभी ने सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शो चा आणि सर्वात जास्त पब्लिक रेटिंग असल्याचा रेकॉर्ड सेट केला होता.

सुरभी बद्दल अजून एक लोकप्रिय गोष्ट म्हणजे त्यांनी विचारलेले प्रश्न आणि फक्त पोस्ट कार्ड ने उत्तर लिहून पाठवावं ही त्यांची सिस्टीम. सुरभी जोपर्यंत सुरू होतं तोपर्यंत पोस्ट ऑफिस चा बिजनेस खूप वाढला होता.

सिद्धार्थ काक यांना निर्माता म्हणून सुरभी मधून सहाजिकच आर्थिक फायदा झाला होता. पण, करिअर म्हणून सर्वात मोठा फायदा रेणुका शहाणे यांना झाला होता.

सुरभी मधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. त्यांची स्माईल आणि अँकरिंग मधील सहज वावर ही शो ची USP होती. रेणुका शहाणे या स्टार झाल्या होत्या.

आणि त्यांची हीच लोकप्रियता पाहता त्यांना हम आप कै है कौन (१९९४) या भारतीय फिल्म इंडस्ट्री च्या सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय सिनेमात महत्वाची भूमिका राजश्री बॅनर ने दिली होती.

 

सुरभी च्या आधी त्यांनी सर्कस या १९८९ मध्ये दूरदर्शन वर टेलिकास्ट झालेल्या सिरीयल मध्ये सुद्धा काम केलं होतं. पण त्यांना त्यांची ओळख दिली ती सुरभी ने हे त्या सुद्धा मान्य करतात.

सुरभी बद्दल बोलताना सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे सांगतात की,

“भारतीय लोकांना भारताबद्दल अभिमान आहे. पण, त्याकाळी त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. सुरभी मुळे त्यांना आपल्या देशाशी कनेक्ट होण्याची एक संधी उपलब्ध झाली होती.”

१९९३ मध्ये सुरभी च्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी निर्मात्यांना १४ लाख पत्र आली होती. या प्रतिसादामुळे सुरभी चं नाव हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं होतं.

पोस्ट कार्ड ची इतकी मोठी उलाढाल बघून भारतीय पोस्टाने contest post card हा नवीन प्रकार सुरू केला होता.

 

 

अमूल कंपनी ही ९ वर्ष सुरभी ची टायटल स्पॉन्सर होती. या नऊ वर्षात कधीही अमूल आणि सुरभी टीम मध्ये कधीच मार्केट रिस्पॉन्स, TRP बद्दल कधीच चर्चा झाली नाही.

सुरभी चं यश हे फक्त त्यांच्या कॉन्टेन्ट आणि प्रेक्षकांना काही तरी चांगलं देण्याच्या वृत्तीला दिलं जातं.

सिद्धार्थ काक यांनी तयार केलेल्या सुरभी च्या संकल्पनेला गरज होती ती एका चेहऱ्याची. त्यावेळी चाळीशी मध्ये असलेले सिद्धार्थ काक यांना एकटे शो होस्ट करणे हे काही संयुक्तिक वाटत नव्हतं.

त्यांना रेणुका शहाणे या रोल साठी कश्या भेटल्या त्याची पण एक स्टोरी आहे. हिंदी बोलण्यात पारंगत असलेल्या रेणुका शहाणे या ऑडिशन ला गेल्या तेव्हा त्यांना ‘ब्रिहादेश्वर मंदिर’ या विषयावर बोलायचं होतं.

हिंदी हे अस्खलित सोबतच संस्कृत ची झलक असलेलं असावं अशी अपेक्षा होती. सिद्धार्थ काक यांच्या पत्नी गीता या ऑडिशन घेत होत्या.

Action म्हंटल्या नंतर रेणुका शहाणे या पूर्ण स्क्रिप्ट विसरल्या होत्या.

पण, त्यांनी त्याचं टेन्शन घेतलं नाही आणि चेहऱ्यावर स्माईल कायम ठेवत त्यांनी ऑडिशन दिली आणि कदाचित ते प्रेझेंस ऑफ माईंड गीता यांना आवडलं असावं असं सांगितलं जातं.

पहिल्या वर्षी रेणुका शहाणे या फक्त प्रश्न विचारण्यापुरतं लोकांच्या समोर यायच्या. पण नंतर त्यांनी को-अँकर म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि सुरभी ला एक human touch त्यांनी दिला.

 

 

माहिती ही संवादाच्या स्वरूपात सुद्धा दिली जाऊ शकते हे सुरभी च्या या अँकर जोडीने पूर्ण जगाला दाखवून दिलं होतं.

अंदमान च्या जंगलात शुटिंग करत असताना त्यांना पूर्ण गावाने खूप चांगला आदर सत्कार केला. पूर्ण गाव सुरभी हा न चुकता बघायचं असा त्यांना प्रतिसाद मिळाला होता.

रेणुका शहाणे कुठेही गेल्यावर त्यांना कित्येक वेळेस सुरभी या नावाने हाक मारली जायची त्यांच्या सुरभी मधील हेअरकट बद्दल सुद्धा लोक नेहमी बोलायचे.

आज सुद्धा सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या नावाने मुंबई च्या भायखळा प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या वाघांना या दोन्ही अँकर ची नावं देण्यात आली होती.

एक काळ असा होता की भारताबाहेर शुटिंग करताना इंग्रजी मध्ये लिहिलेल्या संवादांना हिंदी डायलॉग मध्ये भाषांतर करण्यासाठी सुरभी टीम कडे बजेट नव्हतं आणि त्यामुळे रेणूका शहाणे या स्वतः भाषांतर म्हणून सुद्धा काम बघायच्या.

जसा प्रत्येक यशस्वी सिरीयल किंवा शो चा दुसरा भाग येतो तसं सुरभी बदललेल्या प्रेक्षकांमुळे पुन्हा टीव्ही वर येणं अवघड दिसत आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्म वर सुरभी ला सुरू करण्याचे प्रयत्न निर्माते सध्या करत आहेत.

त्यावेळी दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं आणि त्यामुळे लोकांसमोर खूप पर्याय नव्हते आणि ते सुद्धा सुरभी यशस्वी होण्याचं एक कारण मानलं जातं!

 

 

त्यासोबतच रिसर्च टीम आणि लेखन करणाऱ्या व्यक्तीमुळे शो इतका लोकप्रिय झाला हे निर्माते मान्य करतात.

सुरभी सारखा शो पुन्हा होणे नाही. भारताबद्दल माहिती हा टॉपिक घेऊन निर्माते प्रयत्न करू शकतील. पण, त्यापैकी कोणत्याच प्रोग्राम ला सुरभी ची सर येणार नाही हे मात्र नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version