Site icon InMarathi

शिकायला वयाची मर्यादा नसते, या २ आजींची प्रेरणादायक कहाणी वाचा, शिका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, एक वय असतं.’ हा आपल्याकडे प्रचलित असलेला एक समज आहे. या विचारामुळे किती तरी लोकांच्या आयुष्यात उगीच एक दडपण आलेलं असतं.

काहींना या वयातच लग्न व्हायला हवं हा कुटुंबातील व्यक्तींकडून आग्रह असतो. तर, काहींनी या वयात परदेशात जायचंच हे ठरवून स्वतःवर बंधन लादलेली असतात.

प्लॅनिंग करून गोष्टी ठराविक वेळेत साध्य करणं ही एक पद्धत आहे, पण कायम त्या दबावाखाली वावरायची गरज नसते. ट्रेन पकडण्यासाठी प्रयत्न पूर्ण करावेत. पण, नसेलच शक्य तर ती सोडून सुद्धा द्यावी.

तुमची इच्छाशक्ती दांडगी असेल तर तुम्हाला दुसरी संधी नक्की मिळते आणि तुम्ही तुमच्या इप्सित ठिकाणी नक्की पोहोचणार.

इच्छाशक्ती च्या जोरावर age is just a number हे सिद्ध करणारे काही प्रदिद्ध व्यक्ती म्हणजे KFC चिकनचे निर्माते सँडर् ज्यांनी त्यांच्या वयाच्या ६२ व्या वर्षी हा ब्रँड सुरू केला.

 

 

भारतीय लोकप्रिय व्यक्तींचं उदाहरण सांगायचं तर मराठी कलाकार डॉ. श्रीराम लागू, हिंदी कलाकार बोमन इराणी ज्यांनी की त्यांच्या चाळिशीत करिअर सुरू केलं.

‘जब जागो तब सवेरा’ हे सिद्ध करून दाखवणाऱ्या व्यक्तींमध्ये इथून पुढे केरळ च्या भागीरथी अम्मा आणि करर्थ्यायानी अम्मा यांचं नाव इथून पुढे अग्रस्थानी घेतलं जाईल.

कारण, भागीरथी अम्मा यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी चौथी ची परीक्षा दिली आहे आणि करर्थ्यायानी अम्मा यांनी वयाच्या १०० व्या वर्षी ७ वी ची परीक्षा दिली आहे.

इतकंच नाही तर या वयात या दोन्ही आजीबाई परिस्थिती ला नाव न ठेवता लॅपटॉप आणि मोबाईल वरून ऑनलाईन शाळेने त्यांच्या शिक्षणाची तहान भागवत आहेत.

करर्थ्यायानी अम्मा यांनी केरळ राज्याच्या साक्षरता मिशनच्या परीक्षेत १०० पैकी ९८ मार्क्स मिळवून पहिला क्रमांक पटकावला.

भागीरथी अम्मा या सकाळी आणि संध्याकाळी आपल्या नातवाला सांभाळत ऑनलाईन शाळा अटेंड करत आहेत. कुठून येते इतकी एनर्जी ?

दोन्ही आजी या फक्त अभ्यास करून थांबत नाहीत तर अभ्यासक्रमात दिलेल्या विषयांचे ऑनलाईन विडिओ सर्च करून ते विडिओ बघतात आणि स्वतःला एंगेज ठेवतात.

 

 

त्यांची जिद्द बघून ‘दहावी चा अभ्यासक्रम कोर्स’ सुद्धा शिकवण्याचा निर्णय स्थानिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

भागीरथी अम्मा आणि करर्थ्यायानी अम्मा यांचा हा जोश सध्याच्या सोशली कनेक्टेड जगात केंद्रसरकार पर्यंत लगेच पोहोचला.

काही दिवसांपूर्वीच भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फेब्रुवारी २०२० च्या ‘मन की बात’ या आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात दोन्ही आज्जींच्या उत्साहाचं कौतुक केलं होतं.

भागीरथी अम्मा आणि करर्थ्यायानी अम्मा या दोघींचीही २०२० च्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार त्या व्यक्तींना दिला जातो ज्यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे.

१९९९ पासून सुरू झालेला हा पुरस्कार केंद्रीय महिला आणि शिशु संवर्धन मंत्रालयाकडून दरवर्षी ६ संस्थांना आणि २ व्यक्तींना प्रदान करण्यात येतो.

भागीरथी अम्मा यांचा जन्म केरळ मधील कोल्लम या जिल्ह्यात झाला आहे. तरुण असतानाच त्यांना आई आणि नवरा या दोघांच्याही मृत्यू ला सामोरं जावं लागलं होतं.

१०५ व्या वर्षी त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करावी अशी इच्छा झाली आणि त्यांनी चौथी ची परीक्षा दिली आणि त्या रिझल्ट ची आतुरतेने वाट बघत होत्या. ७५ टक्के मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या होत्या.

या निकालाने त्यांनी पूर्ण देशाला एक प्रेरणा दिली होती की, अशक्य काहीच नाहीये. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यांना गणितात ७५ पैकी ७५ मार्क्स मिळाले होते.

 

 

भागीरथी अम्मा यांचा परिवार सुद्धा मोठा आहे. त्यांना ६ मुलं आणि १६ नातवंडं आहेत. त्या सध्या त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मदत घेऊन स्वतःला अपग्रेड करत आहेत.

करर्थ्यायानी अम्मा यांनी कधीच शाळा अटेंड केली नव्हती. मंदीराच्या सफाई कर्मचारी म्हणून त्या काम करायच्या.

३० व्या वर्षी लग्न झालेल्या करर्थ्यायानी अम्मा ला सुद्धा ६ मुलं आहेत आणि त्यांना शिक्षण घ्यायची प्रेरणा मिळाली ती त्यांच्या ६० वर्षाच्या मुलीकडून.

करर्थ्यायानी अम्मा यांची दहावी ची परीक्षा क्लिअर करण्याची खूप इच्छा आहे आणि त्यासाठी त्या कम्प्युटर सुद्धा शिकत आहेत.

 

 

भागीरथी अम्मा आणि करर्थ्यायानी अम्मा यांची निवड कॉमनवेल्थ गेम्स च्या Goodwill Ambassadors म्हणून सुद्धा झाली आहे.

भागीरथी अम्मा आणि करर्थ्यायानी अम्मा यांच्या इतका उत्साह आपल्यापैकी प्रत्येकात यावा आणि आपणही कायम शिकण्याची जिद्द मनात बाळगावी अशी आशा करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version