' संत्रीच नाही, तर “हे” सुद्धा आहे नागपुरातील एक वैशिष्ट्य… – InMarathi

संत्रीच नाही, तर “हे” सुद्धा आहे नागपुरातील एक वैशिष्ट्य…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संपूर्ण भारतात ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या बाबतीत पुष्कळ रंजक गोष्टी आहेत.

नागपूर शहर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे कारण या शहरात अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत. पेंच नेशनल पार्क, ताडोबा टायगर रिझर्व ही काही प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत.

 

tiger feature InMarathi

 

नागपूर शहराला झिरो माइलचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण याच शहरात देशाचे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेचे मार्ग जोडले आहेत.

नागपूर शहर त्याच्या प्रसिद्ध डायमंड क्रॉसिंग साठी देखील ओळखले जाते. डायमंड क्रॉसिंग हा शब्द काही जणांना परिचयाचा असेल तर, काही जणांना हा शब्द अनोळखी वाटला असेल. म्हणून, आज आपण नागपूरच्या प्रसिद्ध डायमंड क्रॉसिंग बद्दल जाणून घेणार आहोत.

डायमंड क्रॉसिंग म्हणजे नक्की काय?

डायमंड क्रॉसिंग रेल्वे कारभारात वापरली जाणारी संज्ञा आहे. डायमंड क्रॉसिंग म्हणजे अशी जागा जिथे दोन रेल्वे रूळ एकमेकांना छेदतात. त्यामुळे तिथे हिऱ्याचा आकार तयार होतो. म्हणूनच, अशा जागेला ‘डायमंड क्रॉसिंग’ म्हटले जाते.

नागपूर डायमंड क्रॉसिंग

 

diamond crossing inmarathi1

 

ही डायमंड क्रॉसिंग यासाठी प्रसिद्ध आहे, कारण येथे तीन रेल्वे मार्ग एकमेकांना छेदत असल्यामुळे दोन डायमंड क्रॉसिंग तयार झाल्या आहेत. म्हणूनच नागपूरच्या डायमंड क्रॉसिंग ला ‘डबल डायमंड क्रॉसिंग’ म्हटले जाते.

नागपूर जंक्शन मध्ये तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचा संगम होतो.

एक म्हणजे हावरा कडून येणारा गोंदिया रूर्केला रायपुर लाईन, दुसरा म्हणजे नवी दिल्लीकडून येणारा रेलमार्ग आणि तिसरा दक्षिणेकडे जाणारा रेल्वेमार्ग जो पुढे दोन भागांमध्ये विभागला आहे एक पश्चिमेकडे मुंबईच्या दिशेने जाणारा, तर दुसरा दक्षिणेकडे वर्धा पासून ८० किलोमीटर अंतर असलेल्या काझीपेठ येथे जाणारा.

नागपूर मध्ये अजून एक डायमंड क्रॉसिंग आहे. ज्याची निर्मिती नागपूरच्या फ्राईट मंडळाच्या सेवा विभागाच्या रेल्वे मार्गामुळे झाली आहे. जो रेल्वेमार्ग प्लॅटफॉर्मच्या समांतर दिशेत आहे, पण मुख्य रेल्वेमार्गाचा भाग नाही.

सेवा विभागाच्या रेल्वेमार्गाने दिल्लीकडे जाणाऱ्या प्रथम रेल्वे मार्गाकडे वळत असताना गोंदिया रेल्वेमार्गाला छेदले आहे, पण या डायमंड क्रॉसिंगचा समावेश भारताच्या मुख्य डायमंड क्रॉसिंग मध्ये होत नाही.

नागपूरच्या इटारसी बिलास्पुर भागात असणाऱ्या डायमंड क्रॉसिंग ची २००७ मध्ये पुनर्रचना करण्यात आली. ज्यामध्ये जुन्या लाकडी पट्ट्याऐवजी नवीन सिमेंटच्या पट्ट्या बसवण्यात आल्या आणि काही रेल्वेरूळसुद्धा बदलण्यात आले.

 

diamond crossing inmarathi

 

या पुनर्रचनेमुळे मार्गांवरील रेल्वेच्या गतीमध्ये वृद्धी झाली आहे आणि तसेच प्रवाशांची सुरक्षा पातळी वाढवण्यात रेल्वेला यश मिळाले आहे.

या नव्या डायमंड क्रॉसिंगमुळे नागपुर शहरातील प्रवास सुखकर होण्यात मदत मिळाली आहे. एवढेच नव्हे तर, नव्या रचनेमुळे मेन्टेनन्स साठी येणारा खर्च कमी झालेला आहे.

भारतामध्ये गणल्या जाणाऱ्या काही मोजक्या महत्वाच्या डायमंड क्रॉसिंग मध्ये अलाहाबाद म्हणजेच सध्याच्या प्रयागराज मधील डायमंड क्रॉसिंगचा सुद्धा समावेश होतो.

याशिवाय धनबाद येथे सुद्धा डायमंड क्रॉसिंग अस्तित्वात होते. मात्र आता या डायमंड क्रॉसिंगचा वापर करण्यात येत नाही.

९० अंशाच्या कोनात असणाऱ्या या डायमंड क्रॉसिंगचा वापर नव्या आणि जुन्या एरनाकुलम टर्मिनसकडे जाण्यासाठी होत असे.

वर दिल्याप्रमाणे तुम्हाला देशातल्या अन्य डायमंड क्रॉसिंग सुद्धा माहित असतील, पण तरीसुद्धा नागपूरच्या डायमंड क्रॉसिंगला विशेष महत्त्व आहे.

कारण हे संपूर्ण भारतातील एकमेव ‘डबल डायमंड क्रॉसिंग’ आहे. 

जर तुम्ही या शहरास भेट देण्यास गेलात तर, तुम्ही ही डायमंड क्रॉसिंग नक्कीच बघितली पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?