Site icon InMarathi

लग्न करून मूल जन्माला घालण्यासाठी मिळणार ४ लाख? वाचा, नेमकी भानगड काय?

intimate scene inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जपान, उगवत्या सूर्याचा देश अशी ख्याती असलेला हा देश!!

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेनं जपानवर केलेल्या अणुबाँबच्या हल्ल्यानं हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर मृत्यूचं तांडव केलं. बेचिराख झालेला जपान परत एकदा राखेतल्या फिनीक्स पक्षासारखी झेप घेऊन जगासमोर परत एकदा पाय घट्ट रोवून उभा राहिला.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अफाट प्रगती केली. कोडॅक, सोनी असे जगप्रसिद्ध आणि दर्जेदार ब्रँड जपाननं बाजारात आणले. अमेरिकेनं केलेल्या बाँबहल्ल्याचा निषेध म्हणून त्या देशानं अमेरिकेशी कसलेही आर्थिक संबंध ठेवले नाहीत.

जगात दादा असलेल्या अमेरिकेला बाजूला सारून आपलं दिमाखदार अस्तित्व निर्माण करणारा जपान सध्या एका वेगळ्याच समस्येनं ग्रासला आहे, घसरलेला जन्मदर आणि वाढलेली जेष्ठ नागरिकांची संख्या.

 

 

‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं आपण म्हणतो. झाडांची पिकलेली पानं गळून पडतात आणि नवी पालवी फुटते आणि झाडं वाढत राहतात. मानवी जीवनात पण असंच होतं. म्हातारी माणसं मरतात आणि नवी पिढी जन्माला येते.

आपल्या देशात अजूनही टिकून असलेली एकत्र कुटुंब पद्धती, चांगल्या- वाईट वेळी एकमेकांना दिला जाणारा मानसिक आधार, योग्य वयात मुला मुलींची होणारी लग्नं, पुढं टिकून राहणारं वंश सातत्य, मुला मुलींचा होणारा जन्म, आजी आजोबांचा त्यांना मिळणारा सहवास, होणारे संस्कार हे सारं‌ पिढ्यानपिढ्या चालू आहे.

या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशात लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी काही करावं लागलं नाही.

जपान हा विकसित देशांपैकी एक देश असून तिथं प्रगतीचे, तंत्रज्ञानाचे नवे नवे आविष्कार होत असतात, पण आज जपानमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे, तो मुलांचा जन्म न होणं किंवा कमी प्रमाणात नवीन मुलं जन्मणं.

याचं कारण असं, की तिथं तरुण पिढी लवकर लग्न करत नाही किंवा लग्नच करत नाहीत त्यामुळं जन्मदर घटला आहे. उशीरा लग्न केलं, की मुलं व्हायला अडचणी येतात किंवा मुलं होत नाहीत.

हे ही वाचा परिपूर्ण जोडीदार बनायचंय: कामसुत्रातील या १० टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील

 

जपानमधील तरुण पिढी लग्न करायला तयार नाही किंवा लग्न झालं तरी मुलं होऊ देत नाहीत.‌ योग्य वेळेत, योग्य वयात मुलं झाली, तर त्यांचं संगोपन व्यवस्थित करता येतं, पण जपान मधील तरुण पिढी या परंपरेला छेद देत आहे.‌

लग्नच करायचं टाळलं, की पुढचे प्रश्न आपोआपच निकालात निघतात, पण यामुळे देशासमोर लोकसंख्या कशी वाढवायची हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या शंभर वर्षांत हा दर सतत घटत चालला आहे. जपान सरकारसाठी ही एक डोकेदुखी ठरत आहे.

जपानमधील नागरिकांचं वाढतं आयुर्मान हा एक मोठा प्रश्नच आहे आणि घटलेला जन्मदर ही एक समस्या. जपानमधील कितीतरी जेष्ठ नागरिक शंभरीच्या घरात आहेत. तर २० ते ४९ वयोगटातील लोक अविवाहित आहेत.

 

 

याचं एक कारण बेकारी हेही आहेच. शिक्षण पूर्ण झाल्यावर पण जर नोकरी मिळत नसेल, तर मुलं लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार होत नाहीत.

नोकरी न मिळणं हे पण एक प्रकारे अपयशच समजलं जातं तिकडंही!!! तिकडं ही बरेच लोक तात्पुरती नोकरी करतात. पुरेसा पगार नसणं ही गोष्ट पण लग्नावर परिणाम करते.

यातच दुसरी गोष्ट एक परिणाम करते ती म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रीया बाळांचं संगोपन नीट करु शकत नाहीत.

कसरत करत काम करणं, लग्न करणं, मुलं बाळं जन्माला घालणं हे मोठ्या जिकीरीचं काम आहे असं वाटून ही पिढी लग्नाला समस्या मानून त्यापासून लांब पळते आहे.

मग जपान सरकारने या समस्येवर उपाय म्हणून कामाच्या तासांचं नियोजन आणि मुलांना पूर्व शिशुगट शिक्षण मोफत करायचा निर्णय घेतला.

इतक्यावरच हे थांबलं नाही, तर सरकारने चाळीस वर्षाच्या आत जी जोडपी लग्न करतील त्यांना काही रक्कम दिली जाणार आहे आणि ही काही थोडी थोडकी नाही, तर घसघशीत पाच हजार डाॅलर्सची असेल.

 

 

याचा वापर करून विवाहित लोक आपले प्राथमिक, पण अत्यंत महत्त्वाचे खर्च गरजा पूर्ण करू शकतील. जसं, रहायला जागा, जागेचं भांडं व इतर अनेक गोष्टी.

चाळीशीच्या आत लोकांनी लग्न करावं यासाठी ही अभिनव योजना सुरू केली आहे. नगरपालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या सिंगल आणि विवाहेच्छू लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, कुणी आहे का इच्छुक जपानला जायला?

===

हे ही वाचा “एक ‘किस’की किंमत तुम क्या जानो”… वाचा किसिंगचे ८ वाईट परिणाम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version