आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
निसर्ग हा आपल्या सर्वांचा जवळचा मित्र आहे. जसं आपल्याला कोणत्या प्रश्नांची उत्तरं सापडत नसतील तर आपण मित्रांशी बोलतो तसंच जेव्हा मित्रांना भेटणं शक्य नसतं तेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवतो.
आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप मिळतात. निसर्गाकडून काही प्रेरणा घेण्यासारख्या सुद्धा गोष्टी आहेत.
अथांग सागर बघितल्यावर आपल्याला सुद्धा मर्यादा असू नयेत असे वाटते. तर, उंच डोंगर बघितल्यावर आपले स्वप्न सुद्धा अशीच उंच असावीत असं वाटतं.
या सर्वांसोबतच माणसाची वृत्ती ही शांत असावी हे आपल्याला कडक उन्हातून चालून आल्यावर थंड सावली देणाऱ्या झाडाकडून आपण शिकायला पाहिजे.
पर्यावरण संवर्धनासाठी सध्या बऱ्याच सामाजिक संस्था पुढे सरसावत आहेत.
नुकत्याच युनिटेड नेशन्स च्या पर्यावरण प्रोग्राम (United Nation’s Environment Program – UNEP – Tunza Eco Generation (TEG)) ने सुरत मध्ये राहणाऱ्या खुशी चिंदलिया या १७ वर्षीय तरुणीचं पर्यावरण प्रेमाची दखल घेत तिला Green Ambassador म्हणून घोषित केलं आहे.
खुशी चिंदलिया हिला भारताची ग्रीन राजदूत बनवणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा खुशी ला कुठून मिळाली ? या बद्दल तिने सांगितलं आहे की,
“मी लहानपणी न्यू सिटी लाईट या भागात रहायचे. तिथे खूप झाडं होती. मी रोज त्यांच्या आसपास खेळायचे. काही दिवसाने ती झाडं म्हणजे माझे मित्र आणि जीवनाचा अविभाज्य घटक झाले होते.
या झाडावर आराम करण्यासाठी येणारे पक्ष्यांना सुद्धा मी ओळखू लागले होते.
काही वर्षांनी त्या झाडाची जागा नवीन बिल्डिंग घेताना बघत होते. झाडांच्या भोवती असण्याने मला जो आनंद मिळाला होता तो कदाचित माझ्या लहान बहिणींना मिळणार नाही असं मला नेहमी वाटायचं.
बस, तेव्हापासून मी ठरवलं की माझं आयुष्य मी पर्यावरण संवर्धनासाठीच व्यतीत करणार आहे.”
खुशी चिंदलिया जे लहानपणी ठरवलं होतं तेच केलं आणि आता ती TEG सोबत फेब्रुवारी २०२१ पर्यंत विविध पर्यावरण सतर्कता कार्यक्रमात ती सहभागी होणार आहे.
त्यासोबतच खुशी चिंदलिया हिला एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे जिथे की ती ‘जागतिक पर्यावरण संवर्धनात भारताचा रोल’ या विषयावर बोलताना भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
नैसर्गिक संपत्तीचं महत्व आणि त्यांना जपण्यासाठी काय करणं आवश्यक आहे या तिच्या आवडत्या विषयावर ती आता भाष्य करू शकणार आहे.
सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता काही काळासाठी हे सेशन्स खुशी चिंदलिया ऑनलाईन माध्यमाने घेणार आहे.
खुशी चिंदलिया ही या कार्यक्रमाची सुरुवात करताना प्रथम सध्याचं सरकार पर्यावरण संवर्धनासाठी काय करत आहे याचा रिपोर्ट सादर करणार आहे आणि त्याबद्दल शिक्षण दिल्यास कसा बदल होईल याचा अभ्यास करणार आहे.
आणि इतर Regional Ambassadors सोबत सद्यस्थिती बद्दल चर्चा करणार आहे.
कुटुंबाची साथ असल्या शिवाय ही achivement शक्य नाहीये हे आपण जाणतोच. खुशी चिंदलिया बद्दल सुद्धा तेच आहे. तिची आई बिनीता या निवडीबद्दल प्रचंड खुश आहेत.
खुशी च्या या प्रवासाबद्दल सांगताना त्यांनी सांगितलं आहे की,
“आमच्या घराजवळ खूप हिरवळ आहे. तिथे विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी नेहमी जमायचे. खुशी नेहमीच त्या ठिकाणी तिच्या लहान बहिणीला घेऊन जायची आणि आम्ही त्यांचं सुंदर खेळणं बाल्कनी मधून बघायचो.
पर्यावरण संवर्धन करावं हे मी माझ्या मुलींना नेहमीच सांगत आले आहे आणि स्वच्छतेचं सुद्धा महत्व सांगायचे. खुशी ला इतकी मोठी जवाबदारी देण्यात आली आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे.”
मागील काही वर्षात तरुण मुलींनी पर्यावरण या विषयात घेतलेली रुची ही कौतुकाची गोष्ट आहे.
या आधी २०१९ मध्ये रिद्धीमा पांडे या उत्तराखंड च्या १२ वर्षीय मुलीने युनायटेड नेशन्स ची climate action summit अटेंड केली होती.
या कार्यक्रमात तिच्यासोबत जगभरातून अजून १५ तरुण पर्यावरण संवर्धक सहभागी झाले होते.
२०१८ मध्ये Greta Thunberg स्वीडन च्या पर्यावरण संवर्धकाने सुद्धा जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं जेव्हा तिने शाळा सोडून स्वीडन संसदेच्या बाहेरच्या झाडाचं रक्षण केलं होतं.
या कामाची दखल नोबेल पारितोषिक समितीने देखील घेतली होती आणि तिला २०१९ आणि २०२० च्या नामांकनात स्थान देण्यात आलं आहे.
त्यासोबतच प्रसिद्ध टाईम मॅगझीन ने Greta Thunberg हिला २०१९ ची Person of the Year ने संबोधलं होतं.
नवीन पिढी ही जवाबदार नाहीये आणि त्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं अश्या लोकांनी ही बातमी वाचून नवीन पिढीबद्दल चं मत काही अंशी तरी बदलायला हवं असं आम्हाला वाटतं.
खुशी चिंदलियाला तिच्या या गौरवासाठी आणि पुढील कार्यासाठी आमच्या टीमकडून शुभेच्छा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.