Site icon InMarathi

“लायगर आणि टायगॉन” : वाघ सिंह यांची हायब्रिड प्रजात, वाचा शास्त्रज्ञांचा अनोखा प्रयत्न

Liger Tigon InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुम्ही नेपोलियन डायनामाईट हा चित्रपट पाहिला आहे का? नसेल तर नक्की पहा.. कारण विषय थोडा हटके आहे. वन्यप्राण्यांच्या प्रजातींचे ब्रिडिंग करुन एक नवाच वन्यजीव जन्माला घालणे आणि त्याची जोपासना करणे अशी याची साधारण संकल्पना आहे..

सोप्या भाषेत सांगायचं, तर नर वाघ आणि मादी सिंह यांचे ब्रिड तयार करुन ‘वाघ-सिंह संयुक्त’ असा एक नवाच जीव तयार करायचा.

यामध्ये अर्धे जीन्स वाघाचे आणि उर्वरीत अर्धे सिंहाचे असतात, त्यामुळे अंगावर पट्टे आणि मानेजवळ आयाळ असा काहीसा विचित्र हा हायब्रिड प्राणी दिसतो.

वर ज्या चित्रपटाचा उल्लेख केला त्यामध्ये अशाप्रकारे दोन अगदी भिन्न वन्यजिवांपासून एक नवा हायब्रिड जीव जन्माला कसा घातला गेला याची कथा आहे..

 

 

अर्थातच नर वाघ आणि मादी सिंह यांचे क्रॉस ब्रिड शास्त्रज्ञ तयार करतात आणि टायगॉन नावाचा एक प्राणी जन्माला घालतात असे कथानक आहे. त्याला किमया आणि जादूची किनार आहे.

काहीसे काल्पनिक वाटावे अशा दृष्टीने रचलेले हे कथानक पाहताना मजा येते, मात्र येथे एक लक्षात घेतले पाहिजे की खरोखरच असे क्रॉसब्रिड तयार करुन नवा जीव जन्माला घालता येऊ शकतो.

वाघ आणि सिंह ह्यांची हायब्रीड प्रजात लायगर आणि टायगॉन म्हणजे नक्की काय.. याविषयीच या लेखात आपण समजून घेणार आहोत.

 

 

सामान्यत: एकाच प्रजातीचे नर आणि मादी मिळून त्याच प्रजातीला जन्माला घालतात हा निसर्गनियम आहे, पण जर क्रॉसब्रिडचा प्रयोग करायचा असेल तर मात्र लॅबोरेटरी आणि शास्त्रज्ञांची गरज असते.

लायगर – नर सिंह आणि मादी वाघ यांच्या गुणसुत्रांच्या मिलनातून जी प्रजात जन्माला येते ती लायगर.

टायगॉन – नर वाघ आणि मादी सिंह यांच्या गुणसुत्रांच्या मिलनातून जन्माला घातली जाणारी प्रजात म्हणजेच टायगॉन.

लायगर हे टायगॉन्सपेक्षा मोठे असतात. त्यांच्या अंगावर ठिपके आणि पट्टे दोन्ही असतात. त्यांचा रंग तपकिरी-केशरी असतो. नर लायगरच्या मानेजवळ सिंहाप्रमाणे आयाळही असते. तर मादी आणि नर लायगर पाठीवर पट्टे असून, पोटावर ठिपके अर्थात स्पॉट्स असतात.

 

 

लायगरचे सरासरी वजन १००० पौंड इतके असते. या ब्रिडला पृथ्वीवरील सर्वात मोठ्या मांजरीची प्रजाती म्हणून ओळखले जाते. लायगर्स हे वाघाप्रमाणे पोहोण्याचा मनमुराद आनंद घेतात.

दुसरीकडे टायगॉन हे लायगरपेक्षा अगदीच भिन्न असतात. संकरीत केलेली ही प्रजाती खुपच दुर्मीळ आहे. या प्रजातीत नर वाघाची गुणसुत्रे असल्याने साहजिकच मादी वाघांपेक्षा नर वाघाचे गुण आणि अंगकाठी असते.

यांच्या अंगावर बहुतांश ठिकाणी स्पॉट्स आणि पट्टे आढळतात. जसे पूर्ण वाढ झालेल्या वाघाच्या अंगावर असतात. तर पांढरट-केशरी रंगाचे पट्टे हे पोटाजवळील भागावर असतात.

आकाराने टायगॉन हे लायगरपेक्षा लहान असतात, मात्र मादी सिंहिणीचे गुण असल्याने आसमंत दणाणून सोडणारी गर्जना ते करू शकतात.

हे देखील पोहोण्याचा आनंद लुटतात. मात्र सिंहिणीप्रमाणे एक शांतपणा हा देखील गुण त्यांच्यात असतो.

अलिकडे काही ठिकाणी मादी लायगर आणि नर सिंह तसेच नर टायगॉन आणि मादी वाघ यांनाही एकत्र ठेऊन नैसर्गिकरित्या त्यांच्यात प्रजनन घडवून आणण्याचे संशोधनही झाले आहे.

 

 

एकूणच लायगर आणि टायगॉन यांची सध्या जगात खूपच कमी संख्या आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्यविषयक प्रश्न आणि सामाजिक सवयी यांविषयी अजून बरेच संशोधन होणे बाकी आहे.

एकिकडे आपण पाहतोय, की जंगलांवर शहरीकरणाचा मारा होत असून जंगले नामशेष होत असल्याने वाघ, सिंह यांच्यासह अनेक वन्यप्राणी व पक्षांचे अधिवास धोक्यात येत आहेत. त्यातच शिकारींचे प्रमाण वाढत असल्याने वाघ-सिंहांची संख्याही कमी होताना दिसते.

त्यात अशाप्रकारे संकरीत प्रजातींच्या माध्यमातून मूळ प्रजाती जतन करण्याचा एक स्तुत्य मानवी प्रयत्न सध्या विविध ठिकाणी सुरू असल्याचे दिसते ही समाधानकारक बाब आहे असे म्हणूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version