' स्मार्टफोनच्या कॅमेरावर धूळ जमलीये? या ६ अफलातून युक्त्या वापरुन लेन्स करा स्वच्छ! – InMarathi

स्मार्टफोनच्या कॅमेरावर धूळ जमलीये? या ६ अफलातून युक्त्या वापरुन लेन्स करा स्वच्छ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या मोबाईलच्या एका हलक्या क्लिकवर इकडची दुनिया तिकडे होऊ शकते! त्यातून सोशल मीडिया आणि बऱ्याच गोष्टींमुळे मोबाईल हा आणखीनच प्रगत झाला आहे!

स्मार्टफोन मध्ये काय नाही? नुसता कॉल नव्हे तर चक्क इथे बसल्या बसल्या परदेशात सातासमुद्रापार बसलेल्या व्यक्तीशी व्हीडियो चॅट करू शकता!

स्मार्टफोन्सनी आपल्या सगळ्यांच आयुष्य व्यापून टाकलं आहे! आणि या स्मार्टफोन मध्ये आणखीन एक महत्वाचे फीचर आहे ते म्हणजे कॅमेरा! 

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आल्यापासून जो तो उठतोय तो फोटोग्राफर होतोय! त्याला कारणही तसंच आहे म्हणा!

या नवीन स्मार्टफोन मध्ये कॅमेरा हा इतका हाय टेक असतो शिवाय त्याचं ऑपरेटिंग सुद्धा अगदी सोप्पं असल्याने कॅमेरातून मस्त मस्त फोटो काढणं आता प्रत्येकालाच जमायला लागलं आहे!

 

cameras inmarathi
Android PIT

 

मेगापिक्सल म्हणू नका, पोर्ट्रेट मोड म्हणू नका, एका प्रोफेशनल कॅमेरासारखी फीचर्स या नवीन स्मार्टफोन मध्ये यायला सुरुवात झाली आहे!

पूर्वी मोबाईलफोन फक्त कॉलिंग साठी वापरला जायचा, म्हणजे फक्त फोन घ्यायचा किंवा गरज असेल तर दुसऱ्याला फोन करायचा.

पण हळूहळू काळासोबत मोबाईल बदलत गेला. त्यात नवनवीन गोष्टींची भर पडू लागली आणि मोबाईलचा स्मार्टफोन झाला. स्मार्टफोन का?

तर मनुष्याला हव्या असणाऱ्या बहुतेक सगळ्या वस्तू या स्मार्टफोनने मनुष्याच्या हातात उपलब्ध करून दिल्या.

आणि त्यात भर घातली या हायटेक डबल ट्रिपल कॅमेरा सेट अप असलेल्या स्मार्टफोन्सनी!

 

camera inmarathi
livemint

कॅमेरा नसलेला मोबाईल ही संकल्पनाच सहन करवत नाही. जीवनातले प्रत्येक आनंदी क्षण टिपण्यासाठी आणि सध्याचं सेल्फीचं खूळ सावरून घेण्यासाठी हा कॅमेरा अतिशय उपयुक्त ठरतो.

आता तर इतके जास्त मेगापिक्सलवाले कॅमेरे असणारे स्मार्टफोन बाजारात आले आहेत की DSLR वगैरेची गरजच भासू नये.

अश्या या बहुउपयोगी स्मार्टफोन कॅमेऱ्याची एक गोष्ट मात्र खटकते.

ती म्हणजे स्मार्टफोन जसजसा जुना होत जातो, तसतसा त्याचा परिणाम कॅमेऱ्यावर देखील दिसू लागतो. म्हणजे

धुरकट फोटो येणे. कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ जमा होणे. त्यावर ओरखडे पडणे – वगैरे वगैरे..!

पण तुम्हाला माहित आहे का जर वेळोवेळी स्मार्टफोनचा कॅमेरा साफ केला तर असं होणार नाही. काय म्हणता? तुम्हाला माहित नाही स्मार्टफोनचा कॅमेरा साफ करता येतो ते?

मग तर तुम्ही या पद्धती जाणून घेतल्याच पाहिजेत, ज्या सुरक्षित आहेत आणि रामबाण देखील – ज्या तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटीला खराब होऊ देत नाहीत पण लेन्स अगदी चकाचक स्वच्छ होते!

 

पहिली पद्धत:

 

camera-cleaning-method-marathipizza00

थोडीशी टूथपेस्ट घेऊन कॅमेऱ्याच्या लेन्सवर लावा. त्यानंतर थोडासा कापूस घेऊन ३-४ मिनिटे गोल गोल फिरवून साफ करून घ्या. त्यानंतर त्यावर एक-दोन थेंब पाणी टाकून कॉटनच्या /मऊ फडक्याने पुन्हा साफ करून घ्या.

 

दुसरी पद्धत:

 

camera-cleaning-method-marathipizza01

खोडरबर तर असेलच घरी! हा खोडरबर घ्यायचा आणि एकाच दिशेने जवळपास २-३ मिनिटे कॅमेऱ्याच्या लेन्सवर फिरवायचा मग बघा कशी सगळी घाण रबरावाटे निघून जाणून कॅमेरा कसा साफ होतो ते.

 

तिसरी पद्धत:

 

rubbing alchohol inmarathi

पाण्याच्या २० थेंबांमध्ये रबिंग अल्कोहोलचा एक थेंब टाका आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण मायक्रोफायबर क्लॉथ वर लावून कॅमेऱ्याची लेन्स नीट स्वच्छ करून घ्या.

कमीत कमी ५ वेळा केल्यास तुम्हाला कॅमेऱ्याची चकाकती लेन्स पाहायला मिळेल.

 

चौथी पद्धत:

 

camera-cleaning-method-marathipizza03

वॅसलीन देखील स्मार्टफोनचा कॅमेरा स्वच्छ करण्यामध्ये मदत करते. थोडसं वॅसलीन बोटांवर घेऊन ते कॅमेरा लेन्सच्या चारी बाजूला चोळा.

त्यानंतर मायक्रोफाईब्र क्लॉथने ते पुसून घ्या.

 

पाचवी पद्धत:

 

camera-cleaning-method-marathipizza04

 

स्मार्टफोनच्या कॅमेरा लेन्सवर जर स्क्रेचेस पडले असतील तर अश्यावेळेस स्क्रेच रिमूव्हरचा वापर करावा. बाजारात स्क्रेच रिमूव्हर सहज उपलब्ध होईल.

 

सहावी पद्धत:

 

camera-cleaning-method-marathipizza05

मोबाईल स्क्रीनची पॉलीश देखील कॅमेरा लेन्स अतिशय उत्तमरित्या साफ करू शकते.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या कॅमेराची काळजी घेऊ शकता, कॅमेरा प्रोफेशनल असो वा मोबाईलचा त्याला सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते!

डीएसएलआरची सफाई, त्याच्या लेन्स ची सफाई त्यांच्या विशिष्ट दुकानात होते, पण मोबाईलच्या कॅमेराची काळजी आपणच घ्यायला हवी ना!

तर मग लागा कामाला आणि अगदी चकचकीत करून सोडा तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?