लहानपणीचं आवडतं “रावळगांव” चॉकलेट… वाचा, त्याच्या लोकप्रियतेचं रहस्य!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवल्या, की आपल्याला नेहमीच आनंद मिळत असतो.
ती गोष्ट कुठे ट्रिप ला जाण्याची असो किंवा ‘गोट्यां’ सारखा एखादा खेळ असो किंवा ‘रावळगाव’ चॉकलेट सारखं एखादं चॉकलेट असो. या प्रत्येक गोष्टींनी आपलं बालपणाच्या सुखाच्या काळात वेगळेच रंग भरले होते.
त्यावेळी एक चांगलं असायचं की, या गोष्टी कुठे तयार होतात? त्या आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रोसेस आहे? किती पैसे लागतात? हे असले काहीच प्रश्न आपल्याला पडायचे नाहीत.
पण, आजची पिढी तशी नाहीये. त्यांना खूप प्रश्न पडतात. ते सतत प्रश्न करत असतात आणि पालक त्यांना उत्तर देण्यासाठी गुगल करून त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत असतात.
‘मँगो मूड’ आणि लाल भडक रंगाच्या ‘पान पसंद’ या दोन ‘रावळगाव’ या कंपनीत तयार होणाऱ्या चॉकलेट्सनी नाशिक जिह्यातील मालेगाव तालुक्यातील रावळगाव या छोट्या तालुक्याला पूर्ण जगात एक ओळख निर्माण करून दिली होती.
या चॉकलेट्सला मिळलेला प्रतिसाद आणि जगभरातून आलेली प्रचंड मागणी ही एक ‘चॉकलेट क्रांती’ म्हणता येईल.
या क्रांतीचे जनक होते सेठ वालचंद हिराचंद दोशी. ज्यांनी भारतात पहिल्यांदा ऊस उत्पादन आणि साखर कारखाना सुरू करून एका नवीन क्षेत्राची आपल्याला ओळख करून दिली. त्यांनी हे कसं साध्य केलं? जाणून घेऊयात.
हे ही वाचा –
===
१९२३ मध्ये सेठ वालचंद हिराचंद दोशी हे ध्येयवादी व्यावसायिक नाशिक जिल्ह्यातील जवळपास १५०० एकर इतकी जागा पडीक आहे, ही बातमी
कळल्यावर ती विकत घेण्यासाठी तिथे पोहोचले.
त्या जागेतील खडक त्यांनी बांधकाम व्यवसायातील अवजार वापरून काढून टाकले आणि त्या जागेत ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केलं.
खडक काढून जेव्हा सुपीक जमीन तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते तेव्हा त्यांनी इंजिनिअर, केमिस्ट आणि कृषितज्ञांची मदत घेतली आणि विविध प्रयोग केले.
ऊस उत्पादन त्या जागेत होऊ शकतं हे दहा वर्ष मेहनत केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि पहिला साखर कारखाना भारतात तयार झाला.
१९३३ मध्ये रावळगाव शुगर फार्म लिमिटेड ची स्थापना करण्यात आली आणि १९३४ मध्ये पुणे जिल्ह्यातील कळंब येथे दुसरा साखर कारखाना सुरू करण्यात आला. ज्यामुळे त्या भागाचा कायापालट झाला आणि त्या भागाला ‘वालचंद नगर’ हे नाव देण्यात आलं.
दोन्ही करखान्यांमुळे कित्येक लोकांना रोजगार मिळाला आणि शेतकऱ्यांना ऊस उत्पादन आणि विक्री साठी एक बाजारपेठ तयार झाली.
“रावळगाव या गावातील प्रत्येक घरातील निदान एक व्यक्ती तरी ग्रुप सोबत नोकरदार किंवा सप्लायर म्हणून जोडली गेलेली आहे.” हे सांगताना निहाल वालचंद यांना अभिमान वाटतो. त्यांनी ९ वर्षांपासून कंपनीची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे.
ISO 22000 सर्टिफिकेट असलेली ह्या कंपनी मध्ये १० प्रकारचे प्रॉडकट्स तयार होतात, जे की पूर्णपणे शाकाहारी पद्धतीने तयार केले जातात. यामध्ये कोणतंही केमिकल न वापरता फक्त आंब्याचा रस, दूध, कॉफी पावडर या गोष्टींचा वापर केला जातो.
हे ही वाचा –
===
शेतकऱ्यांना नवनवीन शेतीमधील टेक्निक शिकवून उत्कृष्ट उत्पादन तयार करून घेणे, हाच उद्देश रावळगाव ग्रुप ने कायम डोळयांसमोर ठेवलं आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा रावळगाव हा ग्रुप प्रयत्नशील आहे. उसाच्या आत असलेलं पाणी चॉकलेट तयार करण्यासाठी वापरलं जातं आणि त्यापासून वीज निर्मिती सुद्धा केली जाते.
ही वीज पूर्ण गावाला पुरवली जाते आणि फॅक्टरी मध्ये लावलेल्या हजारो झाडांमुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते.
“कंपनी मध्ये कार्यरत प्रत्येक व्यक्तीची सुद्धा इतकीच काळजी घेतली जाते आणि एक ‘फॅमिली कल्चर’ असल्याने लोक दहा, वीस वर्ष तिथे काम करतात”असा अनुभव कंपनीच्या CFO वैशाली कार्यकर यांनी सांगितला होता, ज्या रावळगाव मुंबई हेड ऑफिस मध्ये १९९९ मध्ये ज्युनियर अकाउंटंट म्हणून जॉईन झाल्या होत्या.
रावळगाव चेरी बाजारात आणताना कंपनी ने एक वेगळी strategy वापरली ती म्हणजे transparent पॅकिंग वापरायची आणि लोकांना प्रॉडक्ट चा original रंग दिसू द्यायचा, म्हणजे ती बघणाऱ्या व्यक्तीला पटकन घ्यावीशी वाटेल.
मिल्क कॅंडी, Laco हे सगळे अशा पॅकिंग मध्ये उपलब्ध करून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यांची पसंती मिळवली.
दुसरी stratgy म्हणजे चॉकलेटची किंमत न वाढवणे. ज्या कंपनी कडे लहान मुलांच्या चेरी पासून ते मोठ्यांच्या मँगो मूड सारखे चॉकलेट्स आहेत त्यांना हे सोपं नाहीये.
पण, तरीही त्यांनी चॉकलेटच्या वजनात बदल करून तीच किंमत वर्षानुवर्षे ठेवून आपला ‘मार्केट शेअर’ कायम ठेवला आहे.
खेड्यात राहणाऱ्या लोकांपर्यंत चॉकलेट पोहोवण्यासाठी ‘दूरदर्शन’ वर १० सेकंदाच्या जाहिराती तयार करून त्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
रावळगाव पान पसंदच्या गाजलेल्या जाहिरातींपैकी एक म्हणजे अर्चना जोगळेकर यांनी काम केलेली “शादी और तुमसे… कभी नही” ही जाहिरात ज्यामुळे ‘पान पसंद’ हे चॉकलेट लोकांच्या लक्षात राहिलं होतं.
त्यामागे जो मेसेज होता तो असा होता, की कितीही अप्रिय गोष्ट सांगायची असेल तरीही त्याला पान पसंद चा ‘शुगर कोट’ लावून सांगा. लोक ती गोष्ट लगेच मान्य करतील.
अजून एक यशस्वी झालेली ट्रिक म्हणजे ‘Wise mothers choose Ravalgaon Sweets’ ज्यामधून लहान मुलांच्या आईसोबत कनेक्ट तयार करण्यात आला आणि ‘लहान मुलांनी चॉकलेटचं अतिसेवन करू नये’ हे सुद्धा सांगून लोकांचा विश्वास कमावण्यात आला होता.
सेठ वालचंद हिराचंद दोशी हे फक्त या प्रॉडकट्स वरच थांबले नाहीत, तर त्यांनी १९४० मध्ये हिंदुस्थान एअरक्राफ्ट ही विमान बनवण्याची कंपनी ही आणि हिंदुस्थान शिपयार्ड ही जहाज बनवण्याची कंपनी सुद्धा त्यांनी सुरू केल्या.
या कंपनी मधून त्या काळची लोकप्रिय प्रीमियर ‘पद्मिनी’ ही कार भारतीयांना मिळाली होती.
या दोन्ही कंपनी काही वर्षांनी केंद्रसरकार च्या अखत्यारीत गेल्या आणि Hindustan Aeronautics Limited आणि Hindustan Shipyard Limited या नावाने आजही कार्यरत आहेत.
सध्या रोज बदल होणाऱ्या मार्केट मध्ये सुद्धा आपलं एक स्थान टिकवून ठेवणाऱ्या रावळगाव चॉकलेट्स या ग्रुप ला आपण लोकांच्या चेहऱ्यावर ‘स्माईल’ आणत राहण्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि विदेशी चॉकलेट्स पेक्षा हे चॉकलेट्स विकत घेऊयात. तोच सेठ वालचंद हिराचंद दोशी सरांच्या कार्याचा खरा गौरव असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.