Site icon InMarathi

अबब! २६ लाख जणांनी #CoupleChallenge मध्ये भाग घेतला! काय आहे हे? जाणून घ्या

couple challenge featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘सोशल मिडिया’ हे सध्याच्या काळातील अनेकांच्या मनोरंजनाचं साधन बनलं आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे या सोशल मीडियाचा वापर पूर्वीपेक्षा प्रचंड वाढला आहे.

सोशल मिडियावर अनेक जण त्यांच्या खाजगी किंवा सार्वजनिक आयुष्यातील घटना, प्रसंग, अनुभव आपापल्या भाषेत, स्वतःच्या शब्दात लिहित असतात.

अलिकडे त्याचं प्रमाण वाढत आहे. ओठांवर हसू येईल किंवा डोळ्यांमध्ये आसू येतील अशा सगळ्या प्रकारचं बरचं काही दररोज शेअर होत असतं.

कधी अनपेक्षितपणे एखादा छोटा-मोठा विषय व्हायरल होतो आणि ट्रेंडमध्ये येतो तर कधी अनेक महत्वाचे विषयही ट्रेंडमध्ये न येता निघून जातात.

ट्रेंडमध्ये येणाऱ्या विषयांमध्ये अनेकदा वेगवेगळे चॅलेंजेस असतात. सध्या #CoupleChallenge हे चॅलेंज ट्रेंडमध्ये किंवा चर्चेत आले आहे.

काय आहे #CoupleChallenge?

आपल्या जीवनसाथीबरोबरचा (पत्नीसोबतचा)) फोटो (किंवा व्हिडिओ) #CoupleChallenge असं लिहून अनेक युजर्स पोस्ट करत आहेत.

 

 

बघता बघता या हॅशटॅगद्वारे आतापर्यंत जवळपास २६ लाख युजर्सनी आपल्या जीवनसाथीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे अशा फोटोजना चांगला रिच (जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया) मिळत आहे.

फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीचे मित्र, नातेवाईक आणि अन्य युजर्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

त्यामुळे #CoupleChallenge हा विषय फेसबुकवर हीट ठरला आणि तो सध्या ट्रेंडमध्ये आला आहे. अनेकजण आपल्या जोडीदाराबरोबरचे फोटो शेअर करत आहेत.

तर अनेकजण या ट्रेंडसवर टीकाही करत आहेत.

कसे तयार होतात #CoupleChallenge सारखे ट्रेंडस?

फेसबुकवर किंवा इतर माध्यमात एकाच वेळी एकाच विषयावर अनेक जण चर्चा करत राहिले किंवा पोस्ट करत राहिले तर तो विषय ट्रेंडमध्ये येतो.

तांत्रिक भाषेत असे विषय पटकन लक्षात यावेत म्हणून ‘#’ या कॅरेक्टरसोबत त्या विषयाचं नाव लिहिलं जातं. जसं सध्या सुरु असलेल्या ट्रेंडमध्ये  #CoupleChallenge हा शब्द वापरण्यात येत आहे.

असा हॅशटॅग स्वत: युजर्सच तयार करतात. एखादा युजर सहजपणे आपल्या पोस्टमध्ये ‘#’ सोबत संबंधित विषय लिहून पोस्ट करतात.

 

 

नंतर पोस्टमधील विषय जर सर्वसमावेशक असेल तर हळूहळू त्या पोस्टचा आणि त्यातील हॅशॅटॅगसोबत वापरलेल्या शब्दाचा रिच वाटतो. तो विषय ट्रेंडमध्ये येतो.

असे हॅशटॅग वापरलेले ट्रेंडस नंतर एवढे प्रचंड व्हायरल होतात की पहिल्यांदा हॅशटॅग कोणी वापरला ते विस्मृतीत जातं. अशाच प्रकारे #CoupleChallenge हा ट्रेंड व्हायरल झाला आहे.

काय असतात चॅलेंजेस?

चॅलेंजेस चर्चेत येण्याचा हा काही प्रकार नवीन नाही. सोशल मिडिया नसताना ब्लॅक ॲण्ड व्हाईटच्या जमान्यात वेगवेगळ्या पैजा असायच्या.

एखाद्या समारंभाला किंवा सणावाराला एकत्र भेटायचे. गप्पा गोष्टी व्हायच्या. एकमेकांची विचारपूस केली जायची.

मग अशाच एखाद्या लग्नाच्या किंवा मुंजीच्या जेवणाच्या पंगतीत एक जण पैज लावायचा की जो कुणी १० मिनिटात अमुक इतके गुलाबजाम खाईल त्याला ५०० रुपये मिळतील.

किंवा अगदी लहानपणी आपण सगळ्यांनीच लावलेली पंज्याच्या युद्धाची पैज किंवा पूर्वीच्या काळात कबड्डी खेळताना लावली जाणारी पैज, अशा कित्येक पैज लावल्या जायच्या.

 

 

ही पैज म्हणजे काय तर चॅलेंजच असायचा. आणि त्या काळात ह्या अशा पैजा लावणे खूप किरकोळ आणि मनोरंजनाचे समजले जायचे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हे अनुभवले देखील असेल.

आजही गावाकडे गेलात तर गावजेवण किंवा समारंभाच्या पंगतीत अशा पैजा लावताना बघायला मिळतात.

आता आजचा काळ बदलला आहे. जसजसा शहरी भागांचा विकास झाला आणि इंटरनेट नामक गोष्टीने आपल्या सगळ्यांचं आयुष्य व्यापून टाकलं, तसतसं हे एकत्र भेटणं, समारंभ वगैरे प्रकार कमी होऊ लागले.

आज सामाजिक समारंभापेक्षा सोशल मिडियावरच सगळं काही साजरं होत आहेत.  सेलिब्रेट केलं जात आहे. कोरोनामुळं तर व्हर्च्युअल जगाला आपलसं करणं काळाची गरज बनत आहे.

आणि त्याबरोबरच ह्या पैजांचं रूपांतर ऑनलाइन चॅलेंजेस मध्ये झालं आणि हे चॅलेंजेस व्हायरल होऊन ट्रेंडमध्ये येऊ लागले.

ट्रेंड म्हणजे काय तर सोशल मिडियावरील युजर्सच्या चर्चेत असणारे किंवा एकाच वेळी खूप साऱ्या जणांना आकर्षित करणारे विषय.

मागील काही दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेंज (#CoupleChallenge) हा विषय व्हायरल होऊन ट्रेंडमध्ये आला आहे. सध्या आणि यापूर्वी ट्रेंडमध्ये आलेले चॅलेंजेस.

 

१. सिंगल चॅलेंज :

 

 

कपल चॅलेंज फक्त विवाहितांसाठी असल्याचं वाटणाऱ्या मंडळींनी केवळ स्वत:चाच फोटो शेअर करून सिंगल चॅलेंज तयार केलं आहे. आतापर्यंत या चॅलेंजमध्ये जवळपास ६ लाख ४२ हजार जणांनी सहभाग घेतला आहे.

 

२. स्माईल चॅलेंज :

 

 

ह्या कपल चॅलेंज सोबतच हे स्माईल चॅलेंज सुद्धा बऱ्यापैकी ट्रेंड होताना दिसत आहे.

हे हॅशटॅग वापरुन लोकं स्वतःचा एक हसमतमुख फोटो सोशल मीडिया वर शेयर करताना दिसत आहेत. ह्या चॅलेंज वर तसे मीम्स बनले नाही आहेत. 

पण त्यातल्या त्यात हा एक सोबर चॅलेंज पैकी एक मानला जात आहे. आतापर्यंत या चॅलेंजमध्ये ११ लाख युजर्सनी सहभाग घेतला आहे.

 

३. फोटोशिवाय लिहिलेली पोस्ट :

 

 

हे सुद्धा एक प्रकारचं चॅलेंज होतं. ह्यामध्ये कोणताही फोटो न टाकता एक भली मोठी लांब लचक पोस्ट लिहिली जायची.

खरतर ही पोस्ट करण्यामागचा उद्देश हाच असायचा की किती लोकं तुम्ही लिहिलेली पोस्ट फोटो नसेल तरी वाचतात!

ती पोस्ट वेगवेगळी असायची. पण ह्या चॅलेंज मधून सोशल मीडिया वर तुमच्या व्यक्त होण्याला किती रिस्पॉन्स मिळतोय हे बघण्यासाठी हे चॅलेंज ट्रेंड होत होतं!

 

४. डलगोना कॉफी चॅलेंज :

 

 

हा चॅलेंज तर हमखास प्रत्येकाला ठाऊक असेल. प्रत्येकाने ही कॉफी एकदातरी घरी बनवायचा प्रयत्न केला असेलच. लॉकडाउन जाहीर झाल्यावर ह्या विशेष कॉफीची रेसिपी ही सोशल मिडीया वर प्रचंड व्हायरल झाली.

खूप लोकांनी ही कॉफी बनवून त्याचे छान आकर्षक फोटो फेसबुक ट्विटर इनस्टाग्राम वर टाकले होते!

 

५. नथीचा नखरा चॅलेंज :

 

 

खासकरून महाराष्ट्रीयन मुलींमुळे हा चॅलेंज खूप व्हायरल झाला. ह्या हॅशटॅगचा वापर  करून मुली त्यांचे नथ घातलेले सुंदर सुंदर फोटो आपलोड करत होत्या.

अगदी इतर राज्यातल्या सुद्धा बऱ्याच मुलींनी हा चॅलेंज स्वीकारला.

बहुतांश मुली ह्या अगदी पारंपरिक वेशभुषेसकट नथीचा फोटो काढून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकत होत्या!

 

६. फेटा चॅलेंज :

 

 

मुलींचा नथीचा नखरा पाहून आपली मुलं थोडीच मागे राहणारी होती. मुलांनी सुद्धा फेटा चॅलेंज ची सुरुवात करून मुलींना चांगलीच कॉम्पिटिशन द्यायचा प्रयत्न केला.

कित्येक मुलांनी ह्या हॅशटॅगच्या खाली लग्नात किंवा इतर समारंभात फेटा घालून काढलेले आपले जूने किंवा नवे फोटो पोस्ट केले! 

हे चॅलेंज सुद्धा खूप लोकांनी फॉलो केलं!

 

७. जुन्या लहानपणीच्या फोटोजचं चॅलेंज :

 

 

ह्या चॅलेंज मुळे लोकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय कित्येकांनी त्यांच्या लहानपणीचे चित्र विचित्र फोटो टाकून लोकांच्या कमेंट्स मिळवल्या.

मध्यंतरी फेसबुक अल्बम मध्ये जाऊन सर्वात जुन्या फोटोवर कमेंट करण्याचा सुद्धा ट्रेंड चालू झाला होता.

ह्या चॅलेंज मधून लोकं आपल्या भूतकाळात किती रममाण होऊ शकतात हे दिसलं, आणि प्रत्येकात दडलेल्या लहान मुलाच दर्शन घडलं!

तर ह्या अशा असंख्य चॅलेंजेस नी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कायम भरलेलं असतं. त्यापैकी ही काही चॅलेंजेस जी गेल्या ५ ते ६ महिन्यात प्रचंड लोकप्रिय झाली!

शिवाय ही अशी चॅलेंजेस स्वीकारल्याने नकळत सोशल मीडिया कंपनी कायम चर्चेत राहते आणि ते हॅशटॅग जितकं व्हायरल होईल तितकाच त्या कंपनीला आर्थिक नफा सुद्धा होतो!

एकंदरच आर्थिक गणित आणि लोकांची एंगेजमेंट्स ह्यावर ही चॅलेंजेस व्हायरल होतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात.

ह्या लेखात आपण ह्या चॅलेंजेसचा जन्म कुठून झाला आणि नेमकी कोणती चॅलेंजेस व्हायरल झाली याबद्दल जाणून घेतलं.

पण याच्या पुढच्या भागात ह्या चॅलेंजेस मुळे होणारे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत ह्या लेखाच्या पुढच्या भागात!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version