कीटकनाशकापासून टॉयलेट स्वच्छतेपर्यंत असे कोका कोलाचे १३ उपयोग आजमावून बघा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पार्टी फंक्शन, हॉटेलमध्ये लंच/डिनर, मीटिंग किंवा तत्सम सेलिब्रेशनच्या वेळेस अल्कोहॉलिक असो वा नॉन अल्कोहॉलिक, प्रत्येकाच्या टेबलवर कोका-कोला किंवा तत्सम ब्रँडचं पेय असणार म्हणजे असणार.
असले तर काही अपवाद असतील, पण जगात सर्वात जास्त घेतलं जाणार सॉफ्ट ड्रिंक म्हणजे कोका-कोला.
१८८६ मध्ये जॉन पेमबर्टन यांनी तयार केलेलं हे पेय १९०० च्या नंतर अमेरिकेत जबरदस्त लोकप्रिय झालं. १८९२ ला ‘कोका कोला कंपनी’ स्थापन झाली आणि तिने जगभरात आपले हात-पाय पसरवायला सुरवात केली.
कोका कोला कंपनीचा बिझनेस आज एवढा वाढला आहे की, ती दिवसाला आपले १०८ करोड प्रॉडक्ट्स खपवते.
लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे हे शीतपेय आहे. पण सॉफ्ट ड्रिंक खेरीज याचे अजूनही काही फायदे असतील तर?
हे वाचल्यानंतर नक्कीच तुमची उत्सुकता वाढली असेल. या लेखात आपण असेच काही फायदे जाणून घेणार आहोत.
१. उत्तम कीटकनाशक :
कोका-कोलाचा उपयोग एक उत्तम कीटकनाशक म्हणून होऊ शकतो. जर तुमच्या अंगणात किंवा बागेत गोगलगाय मुंग्या यांसारख्या कीटकांचा अतिरेक झाला असेल तर यावर कोका-कोला उत्तम उपाय आहे.
जर तुम्ही अंगणात किंवा बागेत एखाद्या वाटीत किंवा प्लेटमध्ये कोका-कोला शिंपडून ठेवला तर मुंग्या गोगलगाय यांसारखे कीटक कोका-कोलाच्या गंधाकडे आकर्षित होऊन त्या वाटित जमा होतात.
जमा झालेले हे कीटक कोका-कोला मध्ये असलेल्या ऍसिडमुळे अथवा पेयात गुदमरून मरतात.
२. उंदरांच्या समस्येवर रामबाण :
कोका-कोला उपयोग ज्याप्रमाणे कीटकनाशक म्हणून केला जातो त्याचप्रमाणे उंदरांच्या समस्येवर देखील कोका-कोला रामबाण ठरू शकतो.
उंदरांना कोका-कोलाची चव आवडते. जर वाटीभर कोका-कोला घराच्या कोपऱ्यात ठेवला तर ते प्यायल्यानंतर घरातील उंदीर मरण पावतात.
३. गाडीच्या काचा पुसण्यासाठी :
जर तुमच्या गाडीच्या काचांवर चिकट डाग पडले असतील तर कोकाकोलाचा वापर गाडीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो.
एक स्वच्छ कपड्याला कोकाकोला मध्ये बुडवून गाडीच्या काचा पुसल्या तर त्यावर जमलेले डाग नाहीसे होतात.
४. गंजलेले नट बोल्ट काढण्यासाठी :
गंजलेल्या नट बोल्ट काढण्यासाठी त्यावर कोकाकोला शिंपडून थोडावेळ तसेच राहू द्यावे मग एका कापडाने ते पुसून घ्यावेत. थोड्या वेळानंतर त्यावर जमलेला गंज निघू लागतो जो कापडाने पुसून घ्यावा.
त्यानंतर गंजलेले नट बोल्ट सहज निघतात.
५. कॉपर आणि पितळेची भांडी पूर्ववत करण्यासाठी :
कॉपर किंवा पितळेची भांडी वापरणे पुन्हा सुरू झाले आहे. यात काहीच संशय नाही की ह्या भांड्यामुळे घराची शोभा वाढते.
पण या भांड्यांचा तोटा म्हणजे की, हवेच्या संपर्कात येऊन त्यांच्यावर गंज चढतो आणि ही भांडी लवकर काळी पडतात.
पण यावर सोपा उपाय म्हणजे कोकाकोला मध्ये तांब्या-पितळेची भांडी अर्धा तास बुडवून ठेवली आणि मग फॉइल पेपरचा वापर करून घासली तर त्यांच्यावरला गंज निघून ती पूर्ववत होतात.
६. कपड्यांवरील ग्रीजचे डाग मिटवण्यासाठी :
जर तुमच्या कपड्यांवर मोटर ऑइल सांडून कपडे खराब झाले असतील तर घाबरण्याचे काहीही कारण नाही.
कपड्याच्या डागांवर कोकाकोला लावून कपडे चोळून द्यावेत. सोडा झिरपण्यासाठी पंधरा मिनिटं कपडे तसेच राहू द्यावेत आणि मग डिटर्जंट ने धुऊन घ्यावेत.
हा उपाय केल्यानंतर तुमचे आवडते कपडे पुन्हा नव्यासारखे दिसतील.
७. जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी :
जेवण बनवताना जरा दुर्लक्ष झाले की भांडे करपते आणि भांडी काळी सुद्धा पडतात. हे काळे डाग काढेपर्यंत बऱ्याचदा गृहिणींच्या नाकी नऊ येतात.
पण ही भांडी कोकाकोला लावून रात्रभर तशीच ठेवून दिली आणि सकाळी लिक्विड क्लीनर ने घासली तर काहीच मेहनत न घेता जळलेली भांडी आरामात स्वच्छ करता येतात.
त्यामुळे कोकाकोला गृहिणींसाठी अत्यंत उपयोगाचा आहे.
८. टाइल्स स्वच्छ करण्यासाठी :
कोका-कोलामधील ऍसिड टाइल्स स्वच्छ करण्यासाठी सुद्धा मदत करतात. कोकाकोला वापरून टाइल्स पुसून घेतली तर थोड्याच वेळात टाइल्स स्वच्छ होतात.
९. टॉयलेट चे भांडे स्वच्छ करण्यासाठी :
भारी कष्ट न घेता कोका-कोलाचा वापर करून टॉयलेटचे भांडे स्वच्छ करता येते. टॉयलेटच्या भांड्यावर कोका-कोला टाकुन तासभर ठेवले असता कोका-कोला मधील ऍसिड भांड्यावर जमलेल्या डागांना नष्ट करतात.
तासाभरानंतर भांडे ब्रशने घासल्यावर फक्त एका फ्लशनंतर भांडे पुन्हा चकचकीत दिसू लागते.
टॉयलेट चे भांडे स्वच्छ होण्यामागे कारणीभूत असलेला घटक म्हणजे कोका-कोला मध्ये असलेले फॉस्फरिक ॲसिड.
१०. विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी :
बरेच पाश्चात्त्य पदार्थ बनवण्यासाठी कोका-कोलाचा वापर केला असता पदार्थ चविष्ट होतात.
११. बार्बेक्यु सॉस बनवण्यासाठी :
हल्ली पाश्चात्त्य पदार्थांचा देखील आपल्या आहारात समावेश झालेला दिसतो. या पाश्चात्त्य आहारामध्ये बार्बेक्यू चा सुद्धा समावेश आहे. हा बार्बेक्यू बनवण्यासाठी कोका-कोलाचा सुद्धा वापर करता येतो.
१२. कपड्यांवरील दुधाचे डाग काढण्यासाठी :
कपड्यांवर लागलेले दुधाचे डाग काढणे म्हणजे अजून एक कष्टाचे काम. पण कोका-कोलाचा वापर करून हे डाग सहज निघू शकतात.
डाग लागलेल्या ठिकाणी कोकोकोला लावून पाच मिनिटासाठी कपडे तसेच राहू द्यावेत आणि मग ते धुऊन घ्यावेत.
१३. चष्म्याच्या काचा स्वच्छ करण्यासाठी :
चष्म्याच्या काचांना कोका – कोला लावून त्या कापडाने पुसून घेतल्या तर त्यावर जमलेले चिकट डाग नाहीसे होतात.
वरील उपाय सुचवून नक्कीच तुम्हाला कोका-कोला चे बरेच फायदे समजले असतील पण, तरीही ही कोणताही उपाय प्रात्यक्षिक स्वरूपात करताना पुरेपूर दक्षता घ्यावी.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.