' कॉर्पोरेटमधील तरुणींची असुरक्षितता पुन्हा उजेडात – TVF च्या अरुनभ कुमारवर विनयभंगाचा आरोप! – InMarathi

कॉर्पोरेटमधील तरुणींची असुरक्षितता पुन्हा उजेडात – TVF च्या अरुनभ कुमारवर विनयभंगाचा आरोप!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

दिवसभर युट्युबवर पडीक असाल किंवा तुम्हाला वेबसिरीज पहायची आवड असेल तर TVF हे युट्युब चॅनेल तुम्हाला माहित असणारच. TVF ने आजवर अनेक हिट वेबसिरीज दिल्या आहेत, जसे की पिचर्स, पर्मनन्ट रूममेट्स आणि सध्या गाजलेली ट्रिपलिंग ई. रोजच्या जीवनातील घडामोडींवर देखील विनोदी अंगाने भाष्य करण्याचा प्रयत्न ते त्यांच्या व्हिडीयोच्या माध्यमातून करत असतात. तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हे युट्युब चॅनेल सध्या मात्र वेगळ्याच कारणाने कुप्रसिद्ध होतंय आणि त्याला कारण दुसरा तिसरा कोणी नसून चक्क TVF चा संस्थापक अरुनभ कुमार हा आहे.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza00

स्रोत

काही दिवसांपूर्वी ‘The Indian Uber- That is TVF’ या शीर्षकाखाली medium.com या ऑनलाईन कन्टेन्ट कंपनीतर्फे त्यांच्या वेबसाईटवर एक पत्र पोस्ट करण्यात आलं. हे पत्र ‘Indian Fowler’ या नावाखाली लिहिण्यात आलं होतं. अर्थात आपलं नाव जगासमोर उघड होऊ नये अशीच पत्र लिहिणाऱ्या त्या तरुणीची इच्छा असावी. या पत्रातून तिने थेट TVF चा संस्थापक अरुनभ कुमारवर गैरवर्तन, अश्लील चाळे आणि विनयभंगाचा आरोप केला आहे. या पत्रातून ती व्यक्ती म्हणते की,

पिचर्स वेबसिरीज पासून ते ट्रिपलिंग ही वेबसिरीज बनवण्यापर्यंत मी TVF सोबत काम करत होते. या संपूर्ण काळात मला अरुनभ कुमारच्या गैरवर्तनाचा त्रास सहन करावा लागला. पार्टीमध्ये असताना तो मुद्दाम माझ्या अंगावर स्वत:ला झोकून द्यायचं आणि असे नाटक करायचा की त्याला दारूची नशा चढली आहे. त्यामुळे मी ही त्याला काही बोलू शकत नसे, पण हळूहळू माझ्या लक्षात आले की तो माझ्याशी गैरवर्तन करतोय. त्याची मला इतकी भीती वाटू लागली होती की तो जाईपर्यंत ती बाथरूममध्ये लपून बसले. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या घरी सांगितली तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने थेट माझ्यावर आरोप करत मी काहीही खोट्या गोष्टी बनवून सांगतेय असं बोलून मला खोटे ठरवले.

तिची संपूर्ण पोस्ट तुम्ही येथे वाचू शकता.

हे पत्र व्हायरल झाल्यानंतर इतरही अनेक तरुणींनी स्वत:हून पुढे येऊन TVF फार्म मध्ये काम करण्याच्या कार्यकाळात आपल्याला देखील अश्याच काही प्रसंगाना तोंड द्यावे लागल्याची कबुली दिली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वांनीच अरुनभ कुमारवर आरोप केले आहेत.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza01

एका तरुणीने तर सरळ सांगितले आहे की,

TVF मध्ये काम करणे हा माझ्यासाठी सर्वात वाईट अनुभव होता आणि मी लवकरात लवकर तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतला.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza03

TVF सोबत काम करणाऱ्या एका फिल्म दिग्दर्शिकेने देखील आपली व्यथा सांगितली,

शूट सुरु असताना अरुनभ कुमार वाईट हेतूने मला स्पर्श करायचा. तो अजिबात माझी पाठ न सोडता मला स्पर्ध करायची संधी कधी मिळतेय याची वाट पाहत असायचा.

तरुण चित्रपट लेखक अपूर्व असरानी याने देखील या गोष्टीला दुजोरा देत अश्याच प्रकारचा अनुभव त्याच्या एका सहकारी मैत्रिणीला TVF मध्ये आल्याचे सांगितले.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza04
यावर प्रत्युत्तर म्हणून TVF ने एक अधिकृत पत्र जाहीर करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. पण त्यांचे पत्र म्हणजे एक प्रकारे ‘The Indian Uber- That is TVF’ पत्र लिहिणाऱ्या निनावी तरुणीला दिलेली धमकी वाटत आहे.

त्या मुलीला शोधून काढून तिने केलेल्या या कृत्याबद्दल तिला योग्य ती शिक्षा मिळवून देऊ

असा उलट सूर TVF च्या पात्रता पाहायला मिळतो.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza05

TVF’ च्या या पत्राचा देखील जागरूक तरुणाईने चांगलाच समाचार घेतला.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza06

या प्रकरणावर भाष्य करताना प्रसिद्ध युट्युब कॉमीडीयन्सनी देखील जर ही गोष्ट खरी असेल तर ती फारच लाजिरवाणी गोष्ट आहे असे म्हणत चिंता व्यक्त केली आणि याची निपक्षपणे चौकशी व्हावी अशी आशा देखील व्यक्त केली.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza07

TVF चे प्रमुख सहकारी निधी बिश्त आणि बिश्वपती सरकार यांनी मात्र TVF मध्ये अश्या कोणत्याही गोष्टी घडत नसल्याचे सांगून अरुनभ कुमारची बाजू घेतली आहे.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza08

स्रोत

तसेच या सर्व काल्पनिक गोष्टी असून TVF ची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय असेही म्हटले आहे.

TVF-CEO-Arunabh-Kumar-marathipizza09

स्रोत

या संपूर्ण नाट्यमय घडामोडींवर ज्याची प्रतिक्रिया आवश्यक होती त्या अरुनभ कुमारने अखेर मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली बाजू मांडली.

जर असं खरंच काही घडलं असेल तर त्या मुलीने पोलीस कम्प्लेंट करायला हवी होती किंवा तिने आमच्या HR डिपार्टमेंटमध्ये या विषयी तक्रार करायला हवी होती. जर मला एखादी मुलगी आवडली तर मी तिला स्वत:हून सांगतो की तू सुंदर आहेस. उगाच चुकीच वर्तन करून  स्वत:ची इमेज खराब करण्याचा माझा स्वभाव मुळीच नाही.

या सर्व प्रकरणामध्ये किती तथ्य आहे किंवा नाही, त्या मुली खरंच सांगत आहेत की हा फक्त TVF ला बदनाम करण्याचा डाव आहे ते येत्या काही दिवसांतच कळेल. यावर तुमच्या प्रतिक्रिया काय त्या आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?