Site icon InMarathi

लोकमान्यांची भूमिका करणारे सुबोध भावे घाबरले?! लोकांच्या एकाहून एक तिखट प्रतिक्रिया!

subodh bhave inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या लॉकडाऊनमध्ये “ऑनलाईनचा” जमाना आलाय. पूर्वीही लोकं फेसबुक, ट्विटरवर व्यक्त व्हायचे, पण हल्ली कोणत्याही छोट्या-मोठ्या गोष्टीवर सोशल मीडियावर व्यक्त होणं वाढलंय.

अशातच एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने एखादं ट्विट केलं, कि काही मिनिटांमध्येच लोकांच्या भरघोस, चांगल्या- वाईट प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पडतो.

सुशांत सिंग राजपुत प्रकरणानंतर तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चित्र-विचित्र घटना समोर आल्या. बॉलीवूडमधलं नेपोटीझम, नकारात्मक वातावरण, कलाकारांवरचा दबाव, नवोदित अभिनेत्रींवर होणारे अत्याचार या सगळ्याला नव्याने वाचा फुटली.

एखादा अभिनेता/अभिनेत्री व्यक्त झाली, की तिला प्रत्युत्तर म्हणून बाकीचे व्यक्त होणार, काहीजण पाठिंबा देणार, तर काही शिव्या घालणार….ही कुरघोडी अशीच कायम चालू राहते.

अनेक मराठी कलाकारसुद्धा सोशल मीडियावर मोकळेपणाने व्यक्त होत असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आपलं मत मांडत असतात.

सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे देखील सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याने अनेकदा विविध प्रकरणांवर आपली मतं मांडली आहेत.

 

 

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सुबोधने तिच्या विरोधात ट्विट केलं होतं. यावर देखील त्याला अनेक मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

 

 

आता ट्विटर अकाउंट डिलिट करण्याचा निर्णय सुबोधने घेतलाय. त्याने ट्विट करूनच हा निर्णय सांगितलाय.

सुबोध नेमकं कोणत्या कारणासाठी ट्विटर अकाउंट डिलिट करतोय याबाबत साशंकता आहे, मात्र सोशल मीडियावरच्या वाढत्या नकारात्मकेतमुळे, ट्रोलिंगमुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

 

आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद.
मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे.
काळजी घ्या ,मस्त रहा!
जय महाराष्ट्र
जय हिंद🙏🙏🙏

 

अचानकपणे त्याने हा निर्णय का घेतला? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे आणि त्यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अकाउंट डिलिट करणे ही एक पळवाट आहे, हा निर्णय योग्य नाही… अशा अनेक प्रतिक्रिया यावर आल्या आहेत. बघा अशाच काही तिखट प्रतिक्रिया :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सुबोधचा हा निर्णय ऐकून अनेक चाहत्यांनी खंत व्यक्त केली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version