आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
इरा सिंघल, केम्पा होनय्या, सतेंद्र सिंग, जयंत मकाले नाव ओळखीची वाटतात? बाकी नाव जरी आठवत नसतील तरी इरा सिंघल यांचं नाव कुठे ना कुठे ऐकलं असाल.
२०१४ च्या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळणाऱ्या त्या पहिल्या दिव्यांग व्यक्ती आहेत.
आणि वर जी इतर नाव आहेत त्यांनी देखील कोणत्या न कोणत्या शारीरिक व्याधींशी तडजोड न करता यूपीएससीमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे.
हे सांगायचे तात्पर्य काय तर या व्यक्तींनी आपल्या शारीरिक समस्यांवर मात करून हे यश संपादन केले.
यूपीएससी ही वर्षभर चालणारी प्रोसेस आहे. त्यामुळे वेळेचं, आर्थिक नियोजन वगैरे करून त्यात उतरता येत.
पण दहावी,बारावी नंतर हवं असलेलं कॉलेज, हवी असलेली स्ट्रीम यासाठी सुद्धा तुफान स्पर्धा असते.
खोट वाटत असेल तर जेईई एडव्हान्स मध्ये थोडक्यात आयआयटी हुकलेले विद्यार्थी पावला पावला वर मिळतील.
अकॅडमिक मध्ये सगळ्यांचे निर्णय सुरवातीला झालेले असतात असे कमीच मिळतील. दहावी नंतर लगेच बारावी, बारावी नंतर पुन्हा पदवी.
त्यात पण डॉक्टर,इंजिनिअरिंग आणि इतर तत्सम प्रोफेशनल कोर्सेस. त्यांच्यापुढे सुद्धा मॅनेजमेंट. मग त्यात पण टॉप आणि रेप्युटेड कॉलेज हवं.
असे नाना प्रकारचे टर्म्स आणि कंडिशन या असतातच असतात.
या स्पर्धेत मानसिक आणि शारीरिक ताण हा येतोच येतो. त्यावर मात करून या स्पर्धेत आपलं स्थान टिकवण्याची एक वेगळीच स्पर्धा सुरू असते.
तर, आपण आज अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्याने आपल्या शारीरिक व्याधींवर मात करत कॅट परीक्षेत अव्वल कामगिरी करून लखनऊच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये दाखल झाला आहे.
मुंबई स्थित यश अवधेश गांधी याला सेरेब्रल पाल्सी, डिस्लेक्सिया आणि डिसर्थिया हा लोकोमोटिव्ह डीसऑर्डर आहे.
या आजारामुळे व्यक्तीच्या बोलण्यासाठी जे मांसपेशी कार्यरत असतात त्याकमकुवत होतात. त्यामुळे लिहिणे, वाचणे सारख्या सामान्य कामांमध्ये सुद्धा ती व्यक्ती अपयशी ठरते.
या आलेल्या अडचणीशी सामना करून यश गांधी याने आयआयएमच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २१ साठी घेण्यात आलेल्या कॅट परीक्षेत ९२.५ गुण मिळवले.
कोरोनामुळे सध्या सगळे शैक्षणिक संस्था या ऑनलाइन चालू आहेत. तर यश सुद्धा आयआयएम लखनऊ च्या आपल्या वर्गात व्हर्च्युअली आपल्या घरातूनच सहभागी होत आहे.
दिलेल्या एका मुखातीत यश सांगतो,
संख्या आणि आकडेमोड करण्यासाठी त्याला अनेक समस्याना तोंड द्यावं लागत होत. त्यासाठी त्याला जास्त मेहनत घ्यावी लागली.
क्वांटीटेटिव्ह अँबिलीटी सारख्या प्रकारात पण तो इतरांच्या बाबतीत भरपूर मागे होता. त्यावर सुद्धा विशेष मेहनत घेतल्याने त्याला हे प्राविण्य मिळू शकले.
आपण इतरांच्या बाबतीत थोडे मागे आहोत हा न्यूनगंड मागे सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने हे यश मिळाल्याचे यश सांगतो.
यशला परीक्षेत लिहिण्यासाठी रायटरची मदत घ्यावी लागली. कारण या आजारामुळे शरीरावर पण त्याचा परिणाम दिसून येत होता.
तरी सुद्धा मुंबईच्या लोकल मधून प्रवास करण्याचे धाडस तो करत असे. यश व्यवस्थित बोलू नाही शकत. पण आपले विचार आणि भावना तो स्पष्टपणे जाहीर करू शकतो.
यशने मुंबई मधल्याच मिठीबाई कॉलेज मधून आपलं कॉमर्स मधून पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवीच्या दुसऱ्या वर्षात असल्या पासून त्याने कॅटच्या प्रिपरेशनला सुरवात केली होती.
त्याने घेतलेली जबरदस्त मेहनत वाया नाही गेली आणि त्याने कॅट क्रॅक केली.
लखनऊ, कोझिकोडे, इंदौर इथल्या आयआयएम मध्ये यशस्वीरित्या त्याने इंटरव्ह्यू दिले. परंतु आयआयएम लखनऊचे असलेले स्टेटस आणि रँकिंग बघता यशने आयआयएम लखनऊ निवडले.
प्रायव्हेट फर्म मध्ये काम करणाऱ्या यशच्या वडिलांना यशबद्दल विचारले असता ते सांगतात,
लहानपणीच त्याच्या या आजाराचे निदान झाले होते.पण त्याला विशेष शाळेत घालण्याऐवजी आम्ही त्याला सामान्य मुलांसोबतचं शाळेत पाठवले.
यामुळे स्पर्धेत इतरांच्या बाबतीत आपण कमी आहात हा न्यूनगंड त्याने मेहनत करून घालवावा अशी आमची अपेक्षा होती. आणि हे त्याने सिद्ध करून सुद्धा दाखवले आहे.
एक वेळ अशी आली होती की आपल्याने हे, होणार नाही या भीतीने यशने माघार घ्यायचे ठरवले. त्याच्या आईने त्याला तो पदवीधर होई पर्यंतची त्याची मेहनतीची आठवण करून दिली.
जर तो एवढ्यावर येऊ शकतो तर ही परीक्षा पण तो नक्की पास करू शकतो.
आईच्या या मोटिव्हेशनने तो पुन्हा अभ्यासाला लागला आणि यशस्वीपणे परीक्षा पास पण झाला.
यशचे शिक्षक हर्षित हिंदोचा सांगतात,
यश हा त्यांच्यासाठी विशेष होता. त्याच्या आजरामुळे नव्हे तर त्याच्या हुशारीमुळे. त्याचे मार्क्स बघून तुम्हाला वाटणार नाही की हा या आजाराने ग्रस्त आहे.
त्याचं हे यश म्हणजे धैर्य आणि कमीटमेंटची एक आदर्श कथा आहे. त्याने कधी हरणे स्वीकार नाही केले. आपली कमी पडती बाजू त्याने नेहमी जास्त मेहनत घेऊन भरून काढली आहे.
विशेष म्हणजे पदवी परीक्षेत यश हा टॉप पाच विद्यार्थ्यांमध्ये आहे. यावरून आपण त्याची पात्रता आणि गुणवत्ता पाहू शकतो.
आपल्याला काही जमणार नाही, ते आपल्याला अशक्य आहे यासारखे नकारार्थी विचार करणाऱ्यांसाठी यश गांधी हा नक्कीच प्रेरणा घेण्यासारखी व्यक्ती आहे.
‘आकांक्षे पुढती जेथे गगन ठेंगणे’ उगाचच असं म्हटलं जातं नाही. यशचे हे ‘यश’ अनेकांना प्रेरणा देईल हे नक्की!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.