चक्क हॉलिवूडने केला आहे ह्या ७ भारतीय चित्रपटांचा रिमेक… वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलीवूड सध्या खूप कठीण फेज मधून जात आहे हे आपण बघतच आहोत.
जी व्यक्ती नियमितपणे बातम्या बघत नसेल किंवा कधी हिंदी सिनेमा पण बघत नसेल त्याला सुद्धा सुशांत, रिया आणि कंगना हि नावं माहीत नाहीयेत असं होऊच शकत नाही.
१९९० चे दशक संपताना अशीच एक फेज आली होती जेव्हा की, बॉलीवूड मध्ये अंडरवर्ल्ड चा पैसा लागलेला असतो हे आरोप होत होते.
आणि त्यासाठी प्रसिद्ध निर्माते आणि हिऱ्याचे व्यापारी भारत शाह यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
२००१ हे वर्ष २०२० सारखंच होतं जेव्हा मुळ सिनेमा सोडून बॉलीवूड च्या ऑपरेटिंग सिस्टीम बद्दलच जास्त चर्चा सतत होत होती.
या सर्व चर्चा तेव्हा बंद झाल्या जेव्हा ‘दिल चाहता है’ सारखा चित्रपट आला आणि लोकांची बॉलीवूड सिनेमा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
त्याच वर्षी आलेल्या लगान, गदर ने लोकांना तिकीट काढून थिएटर मध्ये येण्यास भाग पाडलं.
असाच एखादा चमत्कार यावर्षी सुद्धा होईल आणि लोक पुन्हा थिएटर कडे वळतील अशी आशा बॉलीवूड प्रेमी, व्यवसायिक, थिएटर, मल्टिप्लेक्स, त्यावर अवलंबून सगळे लोक करत आहेत.
कारण, भारतात नेहमीच क्रिकेट किंवा राजकारण किंवा बॉलीवूड यासाठी प्रेक्षकांची कधीच कमी नसते.
बॉलीवूडप्रेमींना एका अजून गोष्टींचा सामना करावा लागतो. ती गोष्ट म्हणजे त्यांचा आवडता सिनेमा किंवा त्यांच्या आवडत्या स्टार चा सिनेमा हा कोणत्या तरी हॉलीवूड च्या सिनेमाची कॉपी असणे.
९० च्या दशकात जेव्हा एखादी व्यक्ती आमिर खान च्या ‘हम है राही प्यार के’ ची तारीफ करायचा किंवा शाहरुख खान चा फॅन जेव्हा ‘मोहोब्बते’ ची तारीफ करायचा,
तेव्हा एखादा हॉलीवूड सिनेमा चा फॅन लगेच म्हणायचा, “ही तर या हॉलीवूड च्या सिनेमाची कॉपी आहे.”
जे लोक त्यावेळी अश्या लोकांना उत्तर देऊ शकले नाहीत त्यांच्या साठी काही बॉलीवूड च्या सिनेमाची माहिती देत आहोत ज्यांची कॉपी हॉलीवूड ने सुद्धा केली आहे.
१. डर – Fear :
शिर्षका पासूनच कॉपी आहे. तो सिनेमा ज्याने ‘क्क क्क किरण’ हा फेमस डायलॉग बॉलीवूड ला मिळाला आणि शाहरुख खान हा एक सुपरस्टार जन्माला आला.
छातीवर ‘किरण’ नाव लिहिण्यापासून मार्क वॉलबेर्ग या हॉलीवूड कलाकाराने ने तीन वर्षांनी रिलीज झालेल्या Fear या हॉलीवूड च्या सिनेमात कॉपी करण्यात आली आहे.
अमेरिकेतील या सिनेमात आणि आपल्या बॉलीवूड च्या सिनेमात इतकाच फरक आहे की, त्या सिनेमाची हिरोईन ‘निकोल’ हिने थोड्या काळासाठी का होईना पण, मार्क वॉलबेर्ग ला ‘डेट’ केलं होतं.
शाहरुख खान मात्र शेवटपर्यंत जुही चावला ला दुरूनच बघत होता.
२. जब वी मेट – Leap Year :
‘गीत’ या पात्राने अजरामर करून ठेवलेल्या ‘जब वी मेट’ या सिनेमाची भुरळ हॉलीवूड ला सुद्धा पडली होती हे नक्की.
Amy Adams या पात्राने इम्तियाज अली या दिगदर्शकाने लिहिलेल्या गीत ची कॉपी करत त्याच मुलाला प्रपोज केलं जो तिला तिच्या बॉयफ्रेंड ला भेटवणार असतो.
बॉयफ्रेंड पर्यंत पोहोचताना तिला भेटलेल्या मित्राने तिला खूप साथ दिलेली असते.
Leap Year हा सिनेमा सुद्धा ‘जब वी मेट’ सारखाच बॉक्स ऑफिस वर यशस्वी झाला होता. प्रेक्षकांप्रमाणे दोन्ही सिनेमांच्या मांडणीत आणि सादरीकरणात थोडा फरक आहे. पण, थीम सारखीच आहे.
३. मैने प्यार क्यूँ किया – Just Go with It :
सलमान खान च्या फॅन साठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. त्याने काम केलेला ‘मैने प्यार क्यू किया’ हा सिनेमा हॉलीवूड मध्ये कॉपी झाला होता.
Adam Sandler यांनी सलमान खान सारखं डॉक्टर (प्लास्टिक सर्जन) चा रोल केला होता ज्याचं की एका मुलीसोबत अफेअर असतं हे सांगून की, मी माझ्या लग्नात खुश नाहीये.
हे खोटं लपवण्यासाठी तो त्याच्या असिस्टंट ला (जेनिफर अनिस्टन – सुश्मिता सेन ) बायको असल्याचं नाटक करायची विनंती करतो.
हे करत असताना असिस्टंट आणि डॉक्टर प्रेमात पडतात आणि लग्न करायचं ठरवतात. बॉलीवूड सारखी भावनिक गुंतागुंत नसली तरीही थीम मात्र तीच आहे.
४. विकी डोनर – Delivery Man :
जॉन अब्राहम ची पहिली निर्मिती आणि आयुष्मान खुराणा चा हिरो म्हणून असलेला हा पहिला सिनेमा त्याच्या वेगळ्या विषयामुळे हिट झाला होता.
‘स्पर्म डोनेशन’ इतका advanced विषय हॉलीवूड च्या सिनेमात बॉलीवूड मुळे आला याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
२०१३ मध्ये हॉलीवूड मध्ये रिलीज झालेल्या Delivery Man या सिनेमात Vince Vaughn यांनी आयुष्मान खुराणा ने केलेला रोल केला होता.
फरक असेल तो फक्त आयुष्मान खुराणा ने लिहिलेल्या आणि गायलेल्या ‘पानी दा रंग वेख के…’ या सुंदर गाणं हे ‘विकी डोनर’ मध्ये होतं.
५. A Wednesday – A Common Man :
नीरज पांडे यांच्या दिगदर्शनात तयार झालेला हा सिनेमा म्हणजे अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाने आणि दमदार विषयामुळे कायम सर्वांच्या लक्षात राहील हे नक्की.
२०१३ मध्ये हॉलीवूड मध्ये रिलीज झालेल्या कॉमन मॅन या सिनेमाने आपल्या हिंदी A Wednesday ची थीम वापरून बेन किंगसले यांना नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकेत समोर आणलं.
आणि ते सुद्धा त्याच प्रमाणे अतिरेकी ठेवलेल्या ठिकाणी बॉम्ब लावतात आणि त्यांचा खात्मा करतात. मूळ सिनेमा प्रमाणेच हा सिनेमा सुद्धा तितकाच प्रभावी आहे.
६. छोटीसी बात – Hitch :
आपल्या मराठमोळ्या अमोल पालेकर यांचा हा नितांत सुंदर चित्रपट हॉलीवूड मध्ये Hitch या नावाने कॉपी करण्यात आला होता.
विल स्मिथ यांनी अमोल पालेकर यांच्यासारखीच एका लाजाळू तरुणाची व्यक्तिरेखा उभी केली होती.
ज्यांना अशोक कुमार प्रमाणे एक गुरू भेटतात आणि प्रेम कसं व्यक्त करावं याबद्दल मार्गदर्शन करतात आणि एक अर्धवट राहू शकणारी प्रेमकथा पूर्ण करतात.
७. मधुमती – The Reincarnation of Peter Proud (1975) :
दिलीप कुमार आणि वैजयंती माला यांच्या अभिनयाने गाजलेला मधुमती हा बॉलीवूड साठी खूप स्पेशल सिनेमा आहे.
त्यातील गाणी, स्टोरी सांगण्याची पद्धत आणि पुनर्जन्माचा धागा हा हॉलीवूड ला सुद्धा खूप आवडला होता.
१९७५ मध्ये रिलीज झालेल्या The Reincarnation of Peter Proud या थ्रिलर सिनेमात मधुमती प्रमाणेच पुनर्जन्म आणि एक गूढ वातावरण लोकांना बघायला मिळालं जे की लोकांना खूप आवडलं.
ज्याप्रमाणे बॉलीवूड चा सिनेमा हा matured होत आहे ते पाहता अजून बरेच सिनेमे हे हॉलीवूड मध्ये कॉपी होतील असं वाटत आहे.
बॉलीवूड सिनेमा सुद्धा आता टिपिकल हिरो, हिरोईन यांच्या प्रभावात न राहता कन्टेन्ट वर फोकस करणारा आहे त्यामुळे या गोष्टीला जगभरात मागणी असणार हे नक्की.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.