आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ब्रिटिश आणि अमेरिकन झक मारतील असली फाडफाड इंग्रजी बोलणारे एक सो एक भारतीय आपण पाहिले असेल.
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणजे चालती बोलती ऑक्सफर्ड डिक्शनरी. त्यांचे ते शब्द ऐकून भलेभले लोक हक्केबक्के होऊन जातात. तिथे सामान्यांची गय काय?
तर, असाच एखादा नॉन भारतीय, पाश्चिमात्य अँकसेंट असलेला व्यक्ती हिंदी बोलला तर काय आठवत?
लगान मधला ब्रिटिश कर्णधार अँड्र्यू रसेलचा ‘डूगना लगैन भरना परेगा’ हा डायलॉग झटकन डोळ्यासमोर येतो. बरोबर ना?
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तर, पाश्चात्य देशातील नागरीकांना हिंदी येत नाही, त्यांची हिंदी बोलण्याची पद्धत आणि टोन वेगळाच असतो अशी जवळपास सर्व भारतीयांची धारणा असेल.
पण याला छेद दिला आहे तो अमेरिकन मूळ असलेले आणि ऑस्ट्रेलियात राहणारे इयान वुलफर्ड यांनी. ट्विटर वर त्यांच्या हिंदी ट्विट्सने तर धुमाकूळ घातला आहे.
तर झालं असं की हिंदी दिनाच्या दिवशी एका गोऱ्या माणसाची हिंदी दिनाच्या शुभेच्छाची अस्खलित हिंदी व्हिडीओ ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला.
प्रथमदर्शनी दिन विशेष असेल म्हणून त्याने तो व्हिडीओ टाकला असावा असा समज झाला, पण नंतर त्याची ट्विटर प्रोफाइल पाहिली आणि तोंडात बोट घालायची वेळ आली.
या महाशयांनी कवयित्री महादेवी वर्मा, केदारनाथ सिंह यांच्या कविता न चुकता रेकॉर्ड करून ट्विटरवर अपलोड केल्या आहेत.
आणि बहुतेक करून याचे सगळे ट्विट हे हिंदी मध्ये होतेच. हिंदी साहित्य संबंधित ट्विट त्यांनी रिट्विट केलेलं बघायलामिळालं.
त्यांच्या ट्विटरच्या बायो मध्येच बघायला मिळेल, ‘हिंदीचे प्राध्यापक’. तर बघूया अमेरिकन असून भारतीय भाषेत रुची असलेल्या या अमेरिकन प्राध्यापकाबद्दल!
मूळचे अमेरिकन असलेले इयान वुलफोर्ड ऑस्ट्रेलियाच्या लाट्रोब युनिव्हर्सिटीमध्ये हिंदीचे प्राध्यापक आहेत. त्यांचं ट्विटर हँडल @iawoolford वरूनच ते हिंदी मधून ट्विट करतात.
जवळपास साडे अकरा हजार त्यांचे ट्विटर वर फॉलोवर आहेत. हिंदीचे प्रसिद्ध लेखक फणीश्वरनाथ रेणू यांच्यावर त्यांचं पुस्तक सुद्धा प्रकाशित होत आहे.
कधी कधी ते अकबर अलाहाबादी यांच्या जन्मदिनी त्यांचे काही शेर ट्विट करतात तर कधी हरिवंशराय बच्चन यांच्या पंक्ती.
त्यांचे बरेच ट्विट हे हिंदी साहित्य संबंधीच असतात. भारतीय डिशेज आणि राजकारणावर सुद्धा एखाद दुसरं ट्विट करून वाहत्या प्रवाहात हात धुवून घेतात.
त्यांचे ट्विट पाहिले की त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर कमालीचा आहे ते समजतं.
–
- प्राध्यापक असूनही ट्रेनमध्ये भीक मागितली, स्वतःसाठी नव्हे, तर…
- मुलांना शिकवण्यासाठी, दररोज नदी पार करणाऱ्या कष्टाळू शिक्षिकेचा खडतर प्रवास…
–
इयान यांच्या हिंदी बद्दलच्या या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या हिंदी प्रोफेसर पर्यंतच्या प्रवासाबद्दल विचारले असता ते सांगतात,
हिंदी बद्दल त्यांना लहानपणापासूनचं आकर्षण होतं. त्यांची आई हेलन मायर्स हे संगीतात संशोधन करतात. त्याच निमित्ताने त्यांनी प्रवासी भारतीय लोकसंगीता वर रिसर्च केला.
लहानपणी त्यांच्या सोबत इयान त्रिनिदाद, फिजी आणि मॉरिशस येथे प्रवास केलेला.
आपल्याला माहीतच आहे की त्रिनिदाद येथे भारतीय मूळचे नागरिक मोठ्या संख्येत आहेत. (चंद्रपॉल, सरवान, गंगा, नरेन या विंडीजच्या संघात असणाऱ्या मूळ भारतीय क्रिकेटपटू वरून आपण अंदाज बांधू शकतो.)
त्रिनिदादच्या शाळेत त्यांचा वयाच्या बाराव्या वर्षी दाखला झाला. तिथल्या हिंदी भाषिक आपल्या मित्रांसोबत भजन, लोकगीत म्हणत म्हणत इयानने हिंदी शिकायला सुरवात केली.
कॉर्नल युनिव्हर्सिटी दरम्यान त्यांनी हिंदीचा औपचारिक अभ्यास सुरू केला. संगीत आणि आशियायी विषय त्यांच्या पदवी दरम्यान प्रमुख विषय होते.
आईमुळे संगीतात निर्माण झालेली त्यांची आवड ते आजही जपत आहेत. संगीत वरच्या प्रेमामुळे आधी त्यांनी ऑपेरा गायक व्हायचं ठरवलं होतं.
ऑस्ट्रेलियाला यायच्या आधी इयान यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये काही काळ भारतीय संगीतकार वनराज भाटिया यांच्या सोबत काही काळ काम केलं होतं.
संगीतामुळेच हिंदीमध्ये त्यांची आवड वाढत गेली. त्यांच्या मते भारतात कविता या फक्त म्हणून दाखवण्यासाठी नाही तर गाण्यासाठी आहे.
हे ते कॉर्नल युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर मेहेर फारुकी कडून शिकले.
हिंदी भाषा आणि साहित्य मध्ये एमए आणि पीएचडी त्यांनी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस मधून केली.
इथेच सर्वप्रथम त्यांची भेट झाली ती फणीश्वरनाथ रेणू यांनी रचलेल्या रचनांशी झाली. उदाहरण द्यायचे म्हणजे,’तिसरी कसम’,’मैला आंचल’ इत्यादी.
जयपूरच्या अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन स्टडीजच्या हिंदीच्या कार्यक्रमा निमित्त इयान भारतात आले आणि बराच काळ राहिले.
तिथे ते डॉ. ए एन सिंह, विधु चतुर्वेदी, सईद आयुब, नीलम बोहरा यांच्यामुळे ते खूप चांगली हिंदी शिकू शकले. आज ते जिथे आहेत त्याच सगळं श्रेय हे या हिंदी विद्वानांना देतात.
इयान यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस, कॉर्नल युनिव्हर्सिटी, सिराक्यूज युनिव्हर्सिटी येथे त्यांनी हिंदी शिकवली आहे.
दोन वर्षांपूर्वी ते ऑस्ट्रेलियाला आले आणि मेलबर्नच्या लाट्रोब युनिव्हर्सिटी मध्ये हिंदी प्रोग्रामचे निर्देशक आणि व्याख्याते पद त्यांनी मिळवलं.
ऑस्ट्रेलिया मध्ये आल्यावर त्यांना कळू लागले आहे की जगात राहण्यासाठी फक्त इंग्रजीच पुरेशी नाही, तर अनेक भाषा शिकल्या पाहिजे.
इयान वुलफर्ड यांना त्यांच्या येणाऱ्या पुस्तकाबद्दल विचारले असता ते सांगतात, फणीश्वरनाथ रेणू यांच गाव हे उत्तर पूर्व बिहार भागात येत, त्यावर त्यांनी आपलं पीएचडीचे थिसिस लिहिले होते.
रेणू यांच्या लोकगीता प्रति असलेलं डेडीकेशन याने ते जबरदस्त मोहित झाले. ‘मैला आंचल’ वाचल्या नंतर तर त्यांना त्यांच्या गावाला भेट देण्याची इच्छा होऊ लागली.
बिहार मध्ये त्यांचं जे स्वागत झालं ते अविस्मरणीय होत. आजही ते तिथल्या कलाकारांसोबत काम करण्यासाठी जात असतात.
आवडते लेखक, कवी, शायर बद्दल विचारले असता इयान सांगतात, त्यांची या बाबतीत आवड ही नेहमी बदलत राहते. पण रेणू हे त्यांच्या लिस्ट मध्ये नेहमीच पहिले असतात.
रेणू यांच्या नंतर जर कोण आवडत असेल तर ते म्हणजे हरिशंकर प्रसाद. ते इतके महान व्यंगकार होते की त्यांच्या कथा आजही तंतोतंत लागू होतात.
फक्त भारतातच नव्हे तर इतर देशात सुद्धा.त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रसाद यांच्या कथा आवडतात. जसे ‘चुहा और मै’, ‘भेड और भेडिया’.
आणि ऑस्ट्रेलियाच्या राजकीय परिस्थिती वर त्यांची तुलना सुद्धा तंतोतंत लागू पडते.
भारत आणि भारताबद्दल आवड याबद्दल ते सांगतात, बॉलिवूडचे लगान, कुछ कुछ होता है, श्री ४२०, रंग दे बसंती हे त्यांचे आवडते सिनेमे आहेत.
नुकताच त्यांनी मसान पाहिला. रेखा,आमिर खान हे त्यांचे आवडते कलाकार आहेत.
लिट्टी चोखा हे उत्तर प्रदेश-बिहार मधलं प्रसिद्ध खाद्यपदार्थ ते आवडीने खातात.गोड पदार्थात त्यांना खीर जास्त आवडते.
ते स्पष्ट हिंदी बोलायला कसे शिकले हे तर सांगितले पण हिंदी लिहिण्याबद्दल ते म्हणतात, यावर त्यांनी एक वेगळी ब्लॉग पोस्ट सुद्धा लिहिली आहे.
तस ते पेनाने हिंदी व्यवस्थित लिहितात. पण मोबाईल सारख्या डिव्हाईस मध्ये ते बिल्ट इन हिंदीचाचं वापर करतात. गुगलच्या हिंदी इनपुट कीबोर्ड वर लिहायला सुद्धा ते आता शिकत आहेत.
इयान यांच्या मते जगात हिंदी कडे लक्ष वेधण्याचे काम केले आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बोलताना ते हिंदीचा वापर जास्त करतात.
त्यांनीच जगाला सांगितलं की हिंदी ही सुद्धा जगात सर्वाधिक बोलली जाणारी एक भाषा आहे, जी भारताबाहेर सुद्धा करोडो लोक बोलतात.
मोदींच्या हिंदी वापरामुळे हिंदी भाषा आणि तिची वाढ यांच्यात संबंध निर्माण होत आहे. आणि त्यामुळेच हिंदीचं जगात एक वेगळं स्थान निर्माण होत आहे.
एकूणच एखाद्या विषयात आवड निर्माण झाली की ती कशी जपावी याच मूर्त उदाहरण म्हणजे इयान वुलफर्ड. आवडीलाच त्यांनी आपलं करियर मानून त्यांनी त्यात काम केलं आणि यशस्वी सुद्धा झाले आहेत.
इच्छा आणि आवड या प्रति डेडिकेशन असलं की काहीही अशक्य नाही हे त्यांनी इथे अधोरेखित केले आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.