आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आखाती राष्ट्रातले राजे आणि युवराज म्हणजे एक सो एक नवाबी आणि चित्र-विचित्र शौक पाळणारी हस्ती.
कोण वाघ-चित्ता गळ्यात पट्टा बांधून फिरवत आहेत तर कोण गरुड हातावर घेऊन फोटो काढत आहेत तर कोण ससाणे.
भारतात प्राण्यांना जशी वागणूक मिळते तशी इतर राष्ट्रात क्वचितच बघायला मिळेल.
रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांच्या तर घरातच जंगली प्राण्यांचा संचार आहे. आमटे कुटुंबातील व्यक्ती सारखाच त्यांना तिथे वागणूक मिळते.
भारतात सगळेच प्रकाश आमटे नाहीत. पण प्राण्यांना शोभेची वस्तू म्हणून तरी आपल्याकडे कोण मिरवत नाही. हौस म्हणून पाळतात ती वेगळी गोष्ट पण तिथे सुद्धा त्यांना कमी दर्जाची वागणूक मिळत नाही.
मुळात भारतीय संस्कृती प्राण्यांना किंवा पक्ष्यांना इजा करू नये आणि त्यांच्याशी सुद्धा सौहार्दाचे वागणूक असावी अशी प्रेरणा देते.
याच उलट आखातातील अरब राष्ट्रात पाहायला मिळते. जंगली श्वापदं खासगी पिंजऱ्यात कैद असतात. हिंस्त्र जनावरांना पाळीव प्राण्यासारखे पाळले जाते.
पक्षांच्या सोबत पण काही वेगळी अशी वागणूक दिली जात नाही. एकूणच पाळीव प्राणी आणि जंगली हिंस्त्र प्राणी यांमधला फरक त्यांना ठाऊकच नाही.
याच अरबांच्या गाड्यांचा ताफा तर विचारूचं नका. म्हणतात दुबईचे पोलीसच बुगाटी, फेरारी सारख्या गाड्या आपल्या सर्व्हिस मध्ये वापरतात.
तर किंग आणि क्राऊंन प्रिन्स कोणत्या गाडया वापरत असतील हे न विचारलेलचं बरं. तेलाच्या विहिरी असलेल्या राष्ट्रात पेट्रोल – डिझेल वर गाड्यांची कमी तरी काय असणार आहे?
तर, काही दिवसांपूर्वी असेच दुबईचे क्राऊन प्रिन्स हे सध्या चर्चेतआले होते.
शरियाचे नियम, पाश्चिमात्य देशांबद्दलचे संबंध, तेलाच्या विहिरी आणि तेलाचे चढते उतरते भाव यामुळे चर्चेत असणं त्यांना काही नवीन नाही.
पण यावेळेस काही चुकीच्या कारणाने नाही तर उलटपक्षी भूतदयेमुळे.
जगाचा एक अलिखित नियम आहे की, जर तुमच्या आसपास किंवा घराजवळ कोणा पक्ष्याने घरटे बांधले असेल तर त्याला विनाकारण त्रास देऊ नये.
कारण पक्ष्यांची पिल्लं वाढली की ते स्वतःहुन ते घरटे सोडून निघून जातात. मानवी मूल्य आणि भूतदयेचं प्रमाण म्हणून याकडे बघितलं जातं.
तर, दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांनी अशाच एका भूतदयेचं प्रमाण जगा समोर निर्माण केलं.
जेवढं मोठं नाव आहे तेवढं मोठं मन असल्याचं त्यांनी दाखवून दिले आहे.
दुबईच्या या राजकुमाराच्या आलिशान मर्सडीस एसयुव्हीच्या विंडशिल्ड वर काही दिवसांपूर्वी दोन पक्ष्यांनी आपली घरटी बांधली आणि त्यात अंडी दिली.
राजकुमाराचे यावर लक्ष जाताच त्याने ही गाडी वापरायचीच बंद केली. शिवाय त्या पक्ष्यांना आणि त्यांच्या घरट्याला काही त्रास होऊ नये म्हणून तिथे लाल टेप बांधून ती जागा निर्बंधित केली.
हल्ली मोठमोठे प्रतिष्ठित हस्ती सुद्धा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. दुबईचे हे युवराज सुद्धा आहेत.
अंड्यातून बाहेर येणार्या पिल्लांसाठी घरटे बांधणार्या त्या पक्ष्यांच्या संपूर्ण प्रक्रियेचा आणि शेवटी एक पक्षी आपल्या नवजात पिल्लांना खायला घालत आहे असा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टग्राम अकाउंटवर शेअर केला.
‘Sometimes the little things in life are more than enough’ या कॅप्शनने टाकलेला व्हिडीओ आपण त्यांच्या faz3 या ऑफिशियल अकाउंटवर बघू शकतो.
या पोस्टला २४ तासात १० लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.
युवराजांच्या या कृत्याने बरेच नेटिझन्स प्रभावित झाले आणि त्यांनी युवराजांवर स्तुती सुमने उधळायला सुरवात केली.
खलीज टाइम्स ने ही इंस्टाग्राम पोस्ट शेअर केल्यावर मात्र त्यांच्या पोस्ट वर कमेंटचा पाऊस पडायला लागला.
जगात फक्त माणूसच प्रेमाचा भुकेला नाही. प्राणी पक्षी सुद्धा भुकेले असतात. ते सुद्धा प्रेम समजतात त्याची जाण ठेवतात.
दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांनी ठेवलेला हा मापदंड नक्कीच प्रेरणदायी आहे. पक्ष्यांप्रति त्यांनी दाखवलेली दया आणि प्रेम स्तुतीचे हकदार आहे.
शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम हे दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांचे द्वितीय पुत्र आहेत.
विशेष म्हणजे शेख हमदान हे दुबईच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.