Site icon InMarathi

हा धातू खाणींतून नव्हे, तर चक्क झाडांमधून मिळतोय, वाचा अगदी नवं संशोधन!

nickel inmarathi5

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं खनिज मिळवण्याची आपल्याला माहीत असलेली पद्धत म्हणजे “मायनिंग”. आपण सगळ्या खाणीच पाहून आहोत व त्यावरच अवलंबून आहोत. कारण सगळे खनिज व धातू पृथ्वीच्या गर्भातच दडून असतात.

निकेल धातू मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला माहीत असलेली हीच प्रक्रिया आहे, पण पारंपरिक मायनिंग व्यतिरिक्त अजून एका पद्धतीने आपण निकेल धातू मिळवू शकतो. ती आहे “फोटोमायनिंग” किंवा “मेटल फर्मिंग”. म्हणजेच झाडांमार्फत धातू मिळवणे.

आता हे ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल, पण निसर्गाची ही किमया माणसासाठी किती उपयुक्त ठरू शकेल याची कोणालाच कल्पना नाही.

निकेल धातू स्वतःमध्ये भरपूर प्रमाणात साठवून ठेवणाऱ्या झाडांना “निकेल हायपर अॅक्युमुलेटर” असे म्हणतात.

 

 

जसे प्रत्येक झाडाला आपली वाढ पूर्ण करण्यासाठी, जमिनीतील विविध मिनरल्सची गरज असते तशीच या झाडांना सुद्धा असते. याच गरजेतून, या झाडांनी स्वतःला मोठ्या प्रमाणात निकेल साठवून ठेण्यासाठी तयार केले आहे.

याबद्दलचे संशोधन १९८० साली अमेरिकेत सुरू झाले. पुढे कैक शोध लागले, ज्यात खालील दिलेल्या काही प्रजातींचा पण शोध लागला.

Alyssum murale या इटलीच्या एका प्रजातीत १ ग्रॅम वाळलेल्या पानात ३0,000 मायक्रोग्राम इतका निकेल साठा असू शकतो. आत्तापर्यंत जगात एकूण ४५० हायपर अॅक्युमुलेटर झाडाच्या प्रजातींचा शोध लागला आहे.

यातील क्युबा येथे १३० प्रजाती, दक्षिण युरोप येथे ४५ प्रजाती, न्यू कॅलेडोनियात ६५ तर मलेशिया येथे २४ प्रजाती आढळून आल्या आहेत.

 

 

निकेल हा असा धातू आहे ज्याचं मातीतील प्रमाण वाढलं, तर तो विषाप्रमाणे काम करतो व यामुळे मातीतील पोषक तत्त्वांचा नाश होतो आणि पुढे ती माती कुठल्याही प्रकारच्या झाडांसाठी अयोग्य बनते, तिथली जमीन उजाड होते.

 ही झाडं मातीतील अत्यावश्यक निकेल स्वतः मध्ये साठवून त्यातील मिनरल्सचा समतोल राखून, मातीला शेतीसाठी सुपीक बनवतात व निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करतात.

हा निकेल धातू आपल्याला घरातील नळांपासून तर कारच्या बॅटरी पर्यंत सगळ्यात उपयोगाचा असतोच.

इंडोनेशिया, जगातील सगळ्यात जास्त निकेलचे उत्पादन करणारा देश, जो संपूर्ण जगाच्या ५% निकेल धातूचे निर्यात करतो, तिथेच फोटोमायनिंगचा शोध लागला.

सॉईल बायोलॉजिस्ट व Tadulako University in Central Sulawesi, च्या प्राध्यापिका Aiyen Tjoa या १६ वर्षांपूर्वी इंडोनेशयातील Sorowako येथे तिथल्या निकेलयुक्त मातीत झाडे कशाप्रकारे वाढतात आहे ह्याचे परीक्षण करण्यासाठी आल्या.

पारंपरिक धातू मिळवण्याच्या पद्धतीमुळे तिथली जमीन अतिशय रुक्ष व उजाड झाली असून, जवळपास सगळीच झाडे मायनिंग करता नष्ट करण्यात आली होती, पण यातही काही झाडे अशी होती जी इथल्या भरपूर प्रमाणात निकेल असलेल्या मातीतही, स्वतःवर काहीच वाईट परिणाम न होता वाढत होती.

 

 

Tjoa या झाडांबद्दल ऐकून होत्या. त्यांनी या झाडांबद्दल बोलताना त्यांना “सुपर प्लांट्स” संबोधिले. ही झाडं १ ग्रॅम वाळलेल्या पणात जवळपास १००० ग्रॅम निकेल साठवून शकत होती.

यामुळे या हायपर अॅक्युमुलेटर्सची शेती करून त्यातून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता, यातून निकेल धातू मिळवता येऊ शकतो का याचा शोध लावणे त्यांनी सुरू केले.

पण समस्या ही होती, की त्या झाडांचा शोध लावण्याआधीच, निकेलच्या खाणीमुळे जंगलंच्या जंगलं साफ केली जात होती.

Tjoa यांनी तब्बल ४ वर्षे स्वतःच खर्च करून संशोधन सुरूच ठेवले. अनेक समस्यांपैकी एक समस्या अशी होती, की ही झाडे लगेच ओळखणे अत्यंत कठीण होते. कारण प्रत्येक झाड इतर झाडांसारखच, प्रथमदृष्ट्या अतिशय सामान्य दिसत असे.

क्वीन्सलँडचे Antony van der Ent यांची पेपर टेस्टची पद्धत वापरून त्यांनी शोधमोहीम सुरूच ठेवली. या टेस्टनुसार, डीटेक्शन पेपरवर झाडाचं पान ठेवलं आणि त्या झाडात निकेल असेल तर पेपरचा रंग गुलाबी होतो.

 

 

यावरून ते झाड एक हायपर अॅक्युमुलेटर आहेच असे नाही. कारण तेथील सगळ्याच झाडांमध्ये थोड्याफार प्रमाणात निकेल धातू आढळतो.

हायपर अॅक्युमुलेटर च्या चाचणी करता त्या पानांना लॅब मध्ये नेऊन, वाळवून, त्यांची राख एक्सरे मध्ये टेस्ट करणे अनिवार्य आहे.

४ वर्षांच्या कठोर परिश्रमाने २००८ साली Tjoa ना हायपर अॅक्युमुलेटरच्या दोन प्रजाती सापडल्या – Sarcotheca celebica आणि Knema matanensis.

 

 

यांचे परीक्षण केल्यानंतर असे आढळून आले, की ह्या झाडांमध्ये १ ग्राम वाळलेल्या पानात १०००-५००० मयक्रोग्राम ऐवढे निकेल साठवण्यची क्षमता असते, पण त्यांना या मात्रेहून अधिक प्रमाणात निकेल साठवणारी प्रजाती शोधायची होती.

कारण फोटो मायनिंग जर आर्थिक दृष्ट्या नफा होण्यासाठी प्रत्येक ग्राम वाळलेल्या पानात १०,००० ग्राम निकेलचा साठा असणे आवश्यक होते.

Tjoa व Antony यांच्या संशोधनावर प्रभावित होऊन, व फोटोमायनिंगच्या या विषयाबद्दल कुतूहल असल्यामुळे Bandung Institute of Technology चे रॉक मॅग्नेटिझमचे प्राध्यापक Satria Bijaksana, यांनी ही दोघांना सहाय्य करण्याचे ठरविले.

हायपर अॅक्युमुलेटर मध्ये सर्वाधिक धातू असल्यामुळे यात चुंबकीय लहरी आहेत का? हे शोधण्यासाठी Bijaksana नी Tjoa व Antony यांच्याबरोबर मिळून एक प्रयोग करणे सुरू केले.

निकेल धातुसोबतच झाडांमध्ये लोहाचे प्रमाण ही जास्त असते का? हे शोधण्याचे काम त्यांनी सुरू केले व Sulawesi आणि Halmahera या दोन ठिकाणच्या हायपर अॅक्युमुलेटर प्रजाती Alyssum murale and Alyssum corsicum व इतरही १० प्रकारच्या झाडांचे परीक्षण सुरू केले.

या प्रयोगातून असे समजून आढळून आले, की निकेल बरोबरच लोहाचे प्रमाणही या झाडात अधिक असते व मॅग्नेटिझमची ही पद्धत हायपर अॅक्युमुलेटरचा शोध लावण्यात अजून फायदेशीर ठरेल.

२०२० मे मध्ये प्रकाशित झालेल्या यांच्या एका रिपोर्ट मध्ये अजून दोन झाडांचा शोध लागला.

 

 

Antony van der Ent नुसार हे मलेशियाच्या सबाह प्रदेशात २०१४ पासून फोटोमायनिंगचे प्रयोग करतात आहे. त्यांच्या संशोधनानुसार, हे शक्य असून पर्यावरणासाठी फायदेशीरही आहे.

अर्थात ७३ मिलियन टन निकेल निर्यात करणाऱ्या इंडोनेशिया साठी फोटोमायनिंग जरी प्राथमिक पर्याय नसला, तरी पारंपरिक पद्धतीने निकेल खणून झाल्यावर, त्या खराब झालेल्या जागेत ही झाडे लावली, तर निकेल पण मिळेल व मातीची पोषकतत्व सुद्धा पुन्हा सुधारली जातील व माती सुपीक बनेल.

पर्यावरण पूरक असून सुद्धा फोटोमायनिंग प्रती इंडोेशियातील लोकांची नाराजी आहे असे Tjoa यांचे म्हणणे आहे.

Sulawesi and Halmahera या शेजारच्याच बेटांवर ultramafic बेडरॉक आहे, जे जगात सगळ्यात जास्त निकेलचा साठा असलेले ठिकाण असण्याची दाट शक्यता आहे.

जिथे २३४०० हेक्टर इतका निकेलचा साठा असण्याची शक्यता आहे. तिथे फोटोमायनिंगचा प्रयोग करता येऊ शकतो.

निकेल मायनिंगमुळे १०%  ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर पडतात व या खाणींमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात हानी होते व पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो कारण निसर्गाचा समतोल साधला जात नाही.

फोटोमायनिंग या सागळ्यावराच एक रामबाण उपाय असेल व यामुळे मुळ निवास्यांन सुद्धा शेतीमर्फत रोजगाराची संधी प्राप्त होईल असे Tjoa यांना वाटते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version