Site icon InMarathi

PVR Multiplex मध्ये का नसतात “I” आणि “O” रांगा?

theatre final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

Multiplex मध्ये तर आपण नवीन किंवा आवडत्या कलाकाराचा चित्रपट लागला की आवर्जून जातो. PVR Multiplex मध्ये देखील बऱ्याच वेळा गेला असालं. अश्यावेळी तुमच्यापैकी किती जणांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे माहित नाही, पण आपल्या सीट्सच्या रांगांमध्ये तुम्हाला “I” आणि “O या दोन रांगा दिसणार नाहीत.

स्रोत

तुम्ही म्हणालं, एकतर आधीच त्या काळोखात सीट्स शोधताना नाकी नऊ तेव्हा बाकी कुठे लक्ष देत बसणार? तुमचं हे म्हणण देखील बरोबर आहे, पण विश्वास नसेल तर पुढच्या वेळेस गेलात की आवर्जून लक्ष द्या आणि या गोष्टीची खात्री करून घ्या. तुमच्या लक्षात येईल की H नंतर थेट J ही रांग सुरु होतेय आणी N नंतर थेट P ही रांग सुरु होतेय. किंवा ऑनलाईन बुकिंग करताना सीट्स अरेंजमेंट पहा.

 

स्रोत

असो, ज्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल त्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असणार की “I” आणि “O या दोघांनी नेमकं काय घोडं मारलंय की त्यांच्या नावे या Multiplex मध्ये रांगा नसतात. याचचं उत्तर आज आम्ही तुमच्यासमोर उलगडणार आहोत.

 

स्रोत

फक्त PVR Multiplex च नाही तर देशातील बहुतांश Multiplex मध्ये तुम्हाला “I” आणि “O” रांगा दिसणार नाहीत. याचं कारण हे आहे की इंग्रजीमधील ही दोन्ही मुळाक्षरे गणिती अंकांप्रमाणे भासतात.

===

म्हणजे I हा गणितातला 1 वाटतो, तर O हा गणितातला 0 वाटतो. हाच घोळ प्रेक्षकांना त्रासदायक ठरू नये म्हणून “I” आणि “O” रांगाच न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्रोत

या युक्तीमुळे होतं की काय अंधारात चाचपडणारा प्रेक्षक हा आधीच आपली सीट्स मिळत नाही म्हणून वैतागलेला असतो त्यात जर पुन्हा त्याचं I म्हणजे 1 आणि O म्हणजे 0 हे कन्फ्युजन झालं तर तो अजून चिडचिड करेल आणी गोंधळात पडेल, मग त्याचा त्रास इतरांना देखील!

स्रोत

म्हणून एकप्रकारे Multiplex मध्ये शांतता राहावी म्हणून हा उपाय केला असावा असा निष्कर्ष निघतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version