नाना पाटेकर आणि अनुराग कश्यप : बॉलिवूडच्या निर्लज्ज दुटप्पीपणाचा बुरखा पुन्हा फाटलाय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अनुराग कश्यप आणि वाद हे समीकरण तसं आपल्याला नवीन नाही. अनुराग कश्यपच्या करियरची सुरुवातच वादांपासून झाली आहे असं म्हंटल तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही!
मुंबईत फिल्ममेकर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या अनुरागने ते शक्य करून दाखवलं आणि आज बॉलिवूड मधल्या काही ए लिस्टर्स दिग्दर्शकांमध्ये अनुरागचं नाव घेतल जातं!
पण ह्याच अनुरागचा सुरुवातीचा काळ बराच कठीण होता. त्याचे सलग २ सिनेमे सेन्सॉरच्या कात्रीत अडकले. त्यापैकी पांच हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही.
आणि १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्ब ब्लास्ट वर काढलेला ब्लॅक फ्रायडे हा सिनेमा सुद्धा खूप उशिरा सिनेमागृहात रिलीज केला गेला ते सुद्धा बरीच कात छाट करून!
एकंदरच ह्या दोन्ही सिनेमांचे विषय हे खूप सेन्सिटिव्ह असल्याने अनुराग ला अशा सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण तरीही अशा कित्येक controversies नी अनुरागची पाठ काही सोडली नाही!
सेन्सॉर बोर्डची गळचेपी असो, मी टू मुव्हमेंट असो किंवा CAA विरुद्ध पेटलेलं वातावरण असो. दर वेळेस अनुराग एखादा स्टॅन्ड घेऊन वादात अडकल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे!
पण गेल्या २ दिवसांपासून अनुराग वर आणखीन एक गंभीर आरोप होत आहे.
पायल घोष ह्या अभिनेत्रीने अनुराग वर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला असून त्याबाबतीत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि PMO ह्यांना ट्विट करत या प्रकरणाची दखल घ्यायची विनंती केली आहे!
या एका ट्विट नंतर सोशल मीडिया वर पुन्हा चर्चा चालू झाल्या त्या मी टू मुव्हमेंट बाबत.
साधारण वर्षभरापूर्वी मी टू मुव्हमेंट ला परदेशात सुरुवात झाली आणि तिचे पडसाद हळू हळू भारतात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी उमटू लागले!
भारतात सुद्धा ह्या मुव्हमेंट च्या अंतर्गत कित्येक महिलांनी पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराविषयी उघडपणे भाष्य केले!
बहुतांश प्रत्येक क्षेत्रात ह्या बाबत चांगलीच चर्चा झाली. पण बॉलिवूड मधल्या बऱ्याच अभिनेत्रींनी यावर भाष्य केलं. आणि बॉलिवूडचा खरा चेहेरा लोकांसमोर येऊ लागला!
आज अनुराग वर तसाच आरोप लागल्याने पुन्हा ह्या सगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पण सध्या होणाऱ्या चर्चांमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळंच चित्र दिसेल!
एकतर सुशांत सिंग मृत्यू प्रकरण, बॉलिवूड मधलं नेपोटीझम आणि ड्रग माफिया हे सगळं जनतेसमोर येऊ लागलं आणि त्यात उडी घेतली बॉलिवूड मधली whistle blower कंगना रणौत हिने!
कंगना ने छेडलेलं बॉलिवूड माफिया विरुद्ध युद्ध आणि महाराष्ट्र सरकारशी घेतलेला पंगा यामुळे ती प्रचंड चर्चेत होती. शिवाय तिच्या ऑफिस वर झालेल्या कारवाईमुळे ती आणखीनच उघडपणे बोलू लागली.
आणि आता पायल घोष चं हे ट्विट पाहून तिने सुद्धा तिच्यावर झालेल्या शोषणाबद्दल सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन च्या माध्यमातून मांडलं!
पण बॉलिवूड मध्ये कंगना एकीकडे आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटीज एकीकडे असं चित्र सध्या बघायला मिळतं आहे.
कारण पायल घोषच्या ह्या आरोपानंतर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी अनुरागच्या बाजूने स्टॅन्ड घेत #istandforanuragkashyap हे हॅशटॅग चालवलं!
तापसी पन्नू, सैयामी खेर, राधिका आपटे, रिचा चड्ढा, सयानी गुप्ता अशा काही बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी सोशल मीडिया वर अनुरागची बाजू घेतली!
म्हणजे अनुराग कसा चांगला आहे, त्याच्यासोबत काम करताना सुरक्षित वाटतं अशा प्रकारची स्टेटमेंट ह्या अभिनेत्रींनी केली!
तापसी पन्नू ने अनुराग हा एकमेव फेमिनिस्ट दिग्दर्शक असून कशाप्रकारे तो महिलांना आदर देतो हे सांगितलं.
तर सैयामी खेर हिने सुद्धा त्याच्याविषयी एक घटना सांगत असाच एक खुलासा केला. शिवाय राधिका आपटे हिने सुद्धा इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेयर करत अनुरागसाठी स्टॅन्ड घेतला!
ह्या प्रत्येक अभिनेत्रीने अनुराग बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे एक कलीग किंवा मैत्रीण ह्या नात्याने त्यांची हि प्रतिक्रिया सहाजिक आहे!
प्रश्न अनुरागची बाजू घेण्याचा नाहीये. कारण अनुराग ने हे सगळे आरोप खोटे असल्याचं स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे. पण बॉलिवूड कशाप्रकारे सोयीस्करपणे स्टॅन्ड घेतं ह्याचं उदाहरण आज पुन्हा बघायला मिळालं!
Me Too मुव्हमेंट जेंव्हा चालू होती तेंव्हा सुद्धा बॉलिवूडच्या मोठमोठ्या फिल्ममेकर्स पासून अभिनेत्यांपर्यंत कित्येकांवर हे आरोप लागले!
काहींवर हे आरोप लागले आणि सिद्ध देखील झाले. पण काही अभिनेत्यांना ह्यात कारण नसताना मनस्ताप सहन करायला लागला. त्यांची प्रतिमा जाणून बुजून खराब केली गेली!
त्यांच्यापैकीच एक मोठं आणि प्रतिष्ठित नाव म्हणजे आपले मराठमोळे नाना पाटेकर. ह्या मी टू मुव्हमेंट मध्ये सर्वात जास्त चर्चिलं गेलेलं प्रकरण म्हणजे तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर प्रकरण!
त्या वेळेस तनुश्री ने नाना यांच्यावर कित्येक गलिच्छ आरोप लावले. अगदी नानांच्या वयाचा त्यांच्या कामाचा काहीही विचार न करता तिने त्यांच्यावर खूप भयंकर असे आरोप केले!
आज नाना पाटेकर हे मराठी जरी असले तरी बॉलिवूड मध्ये सुद्धा तितकंच प्रतिष्ठित असलेलं व्यक्तिमत्व म्हणून नानांची ओळख आहे.
स्वतःच्या कर्तृत्वावर इतकं यश मिळवलं तरी नानांनी कधीच त्याचा गर्व केला नाही, उलट त्यांचं समाजकार्य आणि सामाजिक बांधिलकी हि सर्वश्रुत आहे.
नाना आणि मकरंद ह्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एवढं मोठं समाजकार्य पाहता अशा माणसावर इतके गलिच्छ आरोप लागून सुद्धा त्या वेळेस नानाच्या बाजूने हे कुणीच सो कॉल्ड बॉलिवूड सेलिब्रिटीज उभे राहिले नाहीत!
खुद्द अनुराग कश्यप याने सुद्धा नानासोबत काम केलं आहे तरी तो देखील ह्या बाबतीत काहीच बोलला नाही!
उलट हे प्रकरण नाना यांनी जितकं उत्तमरीत्या हाताळलं तितकं कुणालाच जमलं नसतं. नाना ह्यांनी ह्या विषयावर मीडिया समोर बोलणं टाळलं. अगदी स्वतःचा बचाव सुद्धा करायचा त्यांनी प्रयत्न केला नाही!
पण तरीही त्या वेळेस सगळं बॉलिवूड मूग गिळून गप्प होतं. असं का तर नाना आणि बॉलिवूडची विचारधारा वेगळी म्हणून?
हा एक प्रकारे सिलेक्टिव्ह अप्रोच आहे. म्हणजे जी लोकं तुमच्या विचारधारेशी सहमत असतात किंवा जे तुमच्या हो ला हो म्हणतात त्यांनाच तुम्ही सपोर्ट करता.
आणि जे तुमच्याशी सहमत नाही, जे त्यांचे स्वतंत्र विचार मांडतात किंवा जी लोकं ह्या hypocrisy बद्दल उघडपणे बोलतात त्यांना वाळीत टाकलं जातं.
हा बॉलिवुडचा “तू मेरी खुजा मैं तेरी खुजाता हूँ” अप्रोच काही नवीन नाही.
जेंव्हा संजय दत्त ला टाडाच्या अंतर्गत अटक केली तेंव्हा हेच सगळं बॉलिवूड पोस्टर्स घेऊन संजय दत्तच्या बाजूने रस्त्यावर उतरलं.
पण जेंव्हा सुशांतच्या रहस्यमयी मृत्यूची बातमी समोर आली तेंव्हा एक्का दुक्का लोकं सोडून सगळं बॉलिवूड गप्प बसलं.
आज अनुरागची बाजू घेऊन सोशल मीडिया वर भाष्य करणाऱ्या प्लॅकार्ड गॅंग मधले सेलिब्रिटी नानांच्या केसच्या वेळी कुठे होते?
आता एकंदरच बॉलिवूडची hypocrisy लोकांसमोर यायला लागली आहे.
त्यामुळे आता असले सोयीस्कर स्टॅन्ड घेणाऱ्या आणि दुजाभाव करणाऱ्या सगळ्या सेलिब्रिटीजनी हे लक्षात ठेवावं कि “ये पब्लिक हे सब जानती है!”
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.