' करियरच्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ती किंमत मोजणाऱ्या तरुणीची प्रेरणादायक कथा! – InMarathi

करियरच्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ती किंमत मोजणाऱ्या तरुणीची प्रेरणादायक कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यशस्वी होण्यासाठी तुमची काय करण्याची किंवा काय सोडण्याची तुमची तयारी आहे? प्रत्येकाला इच्छा असते की मला माझ्या आयुष्यात काही तरी मोठं करायचं आहे.

पण, त्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे आपल्याला माहीत नसतं. “चांद तारे तोड लाऊ, सारी दुनिया पर मै छाऊ…” हे गुणगुणत प्रत्येक जण असतो.

 

chand taare inmarathi

 

पण जागेपणी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी फार कमी लोक मेहनत करत असतात. आपली स्वप्न सत्यात उतरवणं यासारखं दुसरं सुख नाही.

हे सुख काही दिवसांपूर्वी बघायला मिळालं आहे उत्तर प्रदेश मधील मेरठ च्या संजू राणी वर्मा यांना.

पब्लिक सर्विस कमिशन – PSC 2018 च्या परीक्षा क्लिअर करण्यात संजू राणी वर्मा यांनी यश मिळवलं आहे.

संजू राणी वर्मा या लवकरच कमर्शियल टॅक्स ऑफिसर म्हणून पदभार सांभाळणार आहेत. ही परीक्षा अजूनही काही लोकांनी क्लिअर केली असेल.

पण संजू राणी वर्मा यांचं यश हे का विशेष आहे? जाणून घेऊयात.

२००४ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेज मध्ये जाण्यापासून संजू राणी वर्मा यांचा संघर्ष सुरू झाला होता.

घरात टिपिकल वातावरण, मुलींनी शिकायची गरज काय? असे विचार असलेले लोक होते. संजू राणी वर्मा यांना एक मोठी बहीण आहे ज्यांना शाळा सोडल्यावर लगेच लग्न करावं लागलं होतं.

 

sanu raani varma inmarathi

 

तरीही प्रत्येकाचा रोष ओढवून त्यांनी पदवी चं शिक्षण पूर्ण केलं आणि PG साठी सुद्धा ऍडमिशन घेतली. घरच्यांचा विरोध वाढतच होता.

२०१३ मध्ये PG चं शिक्षण सुरू असताना संजू राणी वर्मा यांच्या आईचं निधन झालं आणि त्यांच्या स्वप्नांना साथ देणारं कोणीच घरात राहिलं नव्हतं.

घरातील वरिष्ठ मंडळींच्या शिक्षण सोडून लग्न करण्याच्या दबावाला बळी न पडता संजू राणी वर्मा यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

मेरठ मध्ये राहणाऱ्या मुलींसाठी हा निर्णय म्हणजे खूप मोठी गोष्ट मानली जाते. घर सोडून त्यांनी ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली आणि स्वतः एकट्या राहून पब्लिक सर्व्हीस परीक्षेचा अभ्यास करू लागल्या.

‘अभिषेक शर्मा’ यांच्या रुपात संजू राणी वर्मा ला एक गुरू भेटले ज्यांनी की या ७ वर्षांच्या प्रवासात तिला योग्य मार्गदर्शन केलं आणि “Yes, you can do it.” हा विश्वास संजू यांना वेळोवेळी दिला.

PSC च्या यशावर न थांबता UPSC परीक्षा सुद्धा क्लिअर करण्यासाठी आणि एक दिवस कलेक्टर बनण्यासाठी अभिषेक शर्मा हे संजू यांना गाईड करत आहेत आणि महिलांना कमी समजणाऱ्या व्यक्तींना एका प्रकारे उत्तर देत आहेत.

वयाच्या २८ व्या वर्षी घराबाहेर पडलेल्या संजू राणी वर्मा या दिल्ली युनिव्हर्सिटी मधून पोस्ट ग्रॅज्युएट चं शिक्षण घेत होत्या.

ते सुद्धा त्यांना घरच्या ‘सेटल डाऊन’ होण्यासाठी सोडावं लागलं होतं. मागच्या आठवड्यात जाहीर झालेल्या यादीत स्वतःचं नाव बघून संजू राणी वर्मा यांना किती आनंद झाला असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.

घरातून बाहेर पडेल आणि यशस्वी होऊनच घरी परतेल असं त्यांनी स्वतःला प्रॉमिस केलं होतं जे की त्यांनी पूर्ण केलं आहे.

शिक्षण घेणं आणि लग्न करणं हे टिपिकल आयुष्य त्यांना मान्य नव्हतं आणि आयुष्यात काही तरी ध्येय असावं हे त्यांचं आधीपासूनच मानणं होतं.

 

sanju rani inmarathi

 

“मेहनत करणाऱ्या व्यक्तीला नशीबाची सुद्धा साथ मिळते” असं म्हणतात ते उगीच नाही.

पब्लिक सर्विस परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी संजू राणी वर्मा यांना कांजण्या (चिकन पॉक्स) हा आजार झाला होता.

डॉक्टरांनी संसर्ग वाढू नये म्हणून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता.

त्यावेळी काही सरकारी कारणांमुळे मेन परीक्षा ही १८ दिवस पुढे ढकलली गेली आणि संजू राणी वर्मा या व्यवस्थित झाल्यावर परीक्षा देऊ शकल्या आणि ती त्यांनी क्लिअर सुद्धा केली.

स्पर्धा परीक्षा क्लिअर करणं यासाठी खरंच एक वेगळीच शक्ती माणसात असावी लागते.

कारण, वाचताना हे ७ वर्ष तयारी हे पण पटकन वाचतो. पण, ७ वर्ष एकाच दिशेने प्रयत्न करत राहणं आणि त्यासाठी आपलं व्यक्तिगत आयुष्य पुर्णपणे बाजूला ठेवणं हे आजकालच्या पदोपदी distraction असणाऱ्या जगात सोपं नाहीये.

मुली या मुलांपेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात याचा प्रत्यय संजू राणी वर्मा यांच्या या प्रवासातून आपल्याला नक्कीच मिळतो.

 

sanju rani featured inmarathi

 

समाजाला गरज आहे ती त्यांचे स्वप्न ओळखून त्यांना एक संधी देण्याची आणि त्यांना टिपिकल चूल आणि मूल या नजरेतून न बघता त्यांच्या स्वप्नांना सुद्धा मान देण्याची.

आपण हा बदल आपल्यापासून नक्की सुरू करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?