Site icon InMarathi

ड्रीम ११ – फॅन्टसी गेमिंग… वाचा एका यशस्वी स्टार्टअपची घोडदौड!

dream 11 featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट हा भारतीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय! काही दिवसांपूर्वीच IPL सुरु झालं आहे. CSK, KKR, Mumbai Indians, इत्यादी अनेक संघांची आता चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. क्रिकेटचे चाहते आता टिव्हीला डोळे लावून बसतील यात काही शंकाच नाही.

कोणताही खेळ हा माणसाला जिंकण्याचं महत्व आणि हार पचवण्याची कला शिकवत असतो.

आपला राष्ट्रीय खेळ हॉकी असला तर आपल्या सर्वांवर क्रिकेट ने गारुड कोणत्या गोष्टीने घातलं आहे? याचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असं नाही की, भारतीय टीम ही पहिल्यापासून फक्त विजेती आहे. आपण सर्व फेज बघितल्या आहेत. तरीही, आपण आपल्या टीम आणि क्रिकेट या खेळाचे फार मोठे फॅन आहोत हे सत्य आहे.

 

 

भारताने जगाला सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर सारखे विक्रमवीर खेळाडू दिले आहेत आणि भारतीय क्रिकेट बोर्ड ला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यात आपला हातभार लावला आहे.

मागे दक्षिण आफ्रिका या देशाची क्रिकेट टीम ही त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष करत होती.

IPL मुळे भारताची ओळख जगभरात झाली आहे, हे जितकं खरं आहे तितकीच एक गोष्ट फेमस झाली ती म्हणजे काही वर्षांपूर्वी क्रिकेट मध्ये झालेली ‘फिक्सिंग’.

 

 

श्रीशांत या खेळाडू च्या नॅपकिन ठेवण्याच्या इशाऱ्याने केलेल्या त्या फिक्सिंग च्या कृत्याचा कोणत्याही सच्च्या क्रिकेटप्रेमीला कधीच विसर पडणार नाही.

काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला हिंदी सिनेमा ‘जन्नत’ हा बघताना तो अतिशयोक्ती वाटला असेल.

पण, त्या सिनेमात दाखवल्या सारखी पर बॉल, पर ओव्हर बेटिंग होत असते हे आता सर्वांना माहीत झालं आहे.

आता सुरू होणाऱ्या IPL साठी सगळे बुकी सज्ज झाले असतील यात शंकाच नाही.

बेटिंग किंवा ‘गेसिंग’ करणे हे आता फक्त बुकीचं काम राहिलेलं नसून सामान्य माणूस सुद्धा ‘ड्रीम 11’ सारख्या माध्यमातून या कामात ओढला गेला आहे.

भलेही त्यात पैश्याची उलाढाल होत नसेल, पण भारतीय लोकांना आपल्या आवडीचे खेळाडू एकत्र करून virtual cricket चा एक चस्का या app ने लावला आहे हे नक्की.

लोकसंख्या खूप असल्याने भारतात कोणत्याही गोष्टीला ‘मार्केट’ आहे हे या app च्या यशाने आपल्या लक्षात आलं असेल. कशी झाली या app ची सुरुवात? त्याबद्दल एक आढावा.

 

 

Dream11 कोणत्याही दोन व्यक्तींना आपल्या आवडीचे ११ खेळाडू निवडून सुरू असलेल्या मॅच मधील खेळाची स्थिती बघून विजेता ठरवते.

१८६७ च्या public gambling act नुसार खरं तर हा एक गुन्हा आहे.

पण, क्रिकेट या खेळात काही स्किल्स लागतात म्हणून त्या सदराखाली Dream11 वर अजून कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाहीये.

Dream11 ही BCCI ची ऑफिशियल पार्टनर आहे. Dream 11 वर भारतातील पाच राज्यांनी बंदी घातली आहे. तरीही, त्याच्या लोकप्रियतेत कोणतीही कमी झालेली नाहीये.

मॅच मध्ये Live खेळणाऱ्या व्यक्तीचा स्कोर predict करणे आणि तो नोंदवणे या फॉरमॅट ने Dream 11 खेळणाऱ्या व्यक्तींना रिवॉर्ड पॉईंट्स मिळत असतात.

 

 

सध्या Dream 11 आणि BCCI यांच्यामध्ये फक्त IPL साठी १२० करोड रुपयांचा करार झाला आहे. IPL च्या काही संघ मालकांनी यावर २०१८ मध्ये objection घेतलं होतं.

पण, तरीही Dream 11 च्या निर्मात्यांना त्यांचं प्रपोजल मान्य करवून घेण्यात यश आलं.

भावीत शेठ हे Dream 11 चे निर्माते आहेत. Dream11 वर घेतलेला आक्षेप हा हरियाणा कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ने २०१७ मध्ये फेटाळून लावला होता.

स्पोर्ट्स आणि गेम्स या क्षेत्रात कार्यरत असलेले वकील श्री. विदुष्पत सिन्हा यांनी,

“सुप्रीम कोर्टाने आर्टिकल १४१ नुसार हरियाणा हायकोर्ट च्या निर्णयासोबत राहून Dream11 च्या डिटेल्स मध्ये न जाऊन ही याचिका फेटाळली आहे असं सांगितलं आहे.”

Dream11 मध्ये भाग घेण्यासाठी हे app तुमच्याकडून PAN नंबर आणि फीस घेते आणि त्यासोबतच तुमच्या कार्ड चे आणि बँकेचे डिटेल्स सुद्धा save करून ठेवते.

सध्या भारतात एकूण ७० असे स्पोर्ट्स वर आधारित apps आहेत आणि या सर्वात Dream 11 ही ८ करोड व्यक्तींचा डेटा असलेली प्रथम क्रमांकाची कंपनी समजली जाते.

या विश्वासाचं कारण म्हणजे, एम एस धोनी ला Brand ambesedor करणं हे सुद्धा मानलं जातं.

 

 

आसाम, ओडिशा, तेलंगणा आणि सिक्कीम या राज्यात त्या राज्य सरकारच्या जुगार विरोधी कायद्यामुळे Dream11 ला अजून तरी शिरकाव करता आला नाहीये.

जुगार किंवा gambling मध्ये आकडेवारी, किंमत आणि लक या तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो.

त्यापैकी ‘लक’ म्हणजे नशीब नसून स्किल आहे हा दावा सुप्रीम कोर्टात मांडून Dream11 ने हा खेळ लोकांपर्यंत पोहोचवला आहे.

इतर app आणि या खेळात हा फरक आहे की, इथे प्लेयर्स हे कॅप्टन आणि वाईस कॅप्टन बद्दल अंदाज बांधून जास्त पॉईंट्स मिळवतात आणि आपली कमाई वाढवतात.

फॅन्टसी स्पोर्ट्स गेम्स ही अमेरिकेतील कंपनी सुद्धा एकदा अश्या वादाला सामोरी गेली होती आणि न्यूयॉर्क मधील त्यांचं काम २०१६ मध्ये थांबवण्यात आलं होतं.

२०१९ मध्ये अमेरिकेत ‘बेटिंग’ हे कायदेशीर केल्याने आता फॅन्टसी स्पोर्ट्स गेम्स चा बिजनेस परत दणक्यात सुरू आहे.

हर्ष जैन आणि भावीत सेठ या दोघांनी मिळून २००८ मध्ये Dream11 ची सुरुवात मुंबईत केली होती. २०१८ मध्ये Tencent या चायनीज कंपनी ने त्यात गुंतवणूक केली आहे.

 

 

EPL या इंग्लिश फुटबॉल लीग च्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या फॅन्टसी फुटबॉल हा खेळ २००१ पासून खेळणाऱ्या हर्ष जैन ला असंच काहीतरी भारतीय क्रिकेट फॅन्स साठी बनवण्याची होती आणि त्यांनी ती पूर्ण केली.

गेम ऑफ स्किल हे नाव देऊन सुप्रीम कोर्टाने Dream11 ला एक ‘नियमित टॅक्स भरणारी आणि कोणताही गैरव्यवहार न करणारी कंपनी’ असं एक सर्टिफिकेट दिलं आहे.

त्यामुळे निर्माते निर्धास्त आहेत आणि रोज हजारो लोकांना त्यांच्या app वर रजिस्टर करत आहेत.

आणि app हे जास्तीत जास्त user friendly आणि पैशांचा व्यवहार हा जास्तीत जास्त transparent करण्यावर सध्या Dream11 भर देत आहे.

२०१८ मध्ये Dream11 चा टर्न ओव्हर हा १०० करोड इतका होता. भारतातील ९०% मार्केट शेअर घेऊन आज ही कंपनी टॉप वर आहे.

फॅन्टसी गेम ही संकल्पना भारतीयांना पटत आहे असं सध्या दिसत आहे आणि तसं झालं तर भारत या क्षेत्रात अमेरिकेला सुद्धा मागे टाकेल असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत.

आर्थिक रित्या कितीही यशस्वी झाली तरीही Dream11 ही लोकांना खेळाच्या निखळ आनंदापासून लांब करत आहे.

 

 

क्रिकेट नावाच्या कायम गरम असलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत आहे हे तुम्हाला सुद्धा जाणवलं असेलच.

खेळणाऱ्या लोकांनी फक्त ‘कुठे थांबायचं’ हे निर्धारीत करूनच Dream11 कडे जावं असा आमचा सल्ला असेल. बाकी तुमचं तुम्ही ठरवा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version